Current Affairs | चालू घडामोडी | 22 MAY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 22 MAY 2024

1) 22 मे

1.1) राजा राममोहन रॉय जयंती = 22 मे 1772

 • आत्मीय सभा = 1814
 • ब्राह्मो समाज स्थापना = 1828
 • वृत्तपत्रे = संवाद कौमुदी (बंगाली 1821) , मिरत उल अखबार (पर्शियन 1822)

1.2) International Day of Biodiversity

 • 2024 Theme : Be Part of the Plan

2) पर्यटनात भारत जगात 39 व्या स्थानी

 • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा ट्रॅव्हल्स अँड टुरीझम अहवाल
 • 2021 मध्ये भारत 54 व्या स्थानावर
 • दक्षिण आशियाई देशांत अव्वल
 • पहिले स्थान = अमेरिका

3) प्रख्यात लेखक, स्तंभलेखक ‘दादूमियाँ’ यांचे निधन

 • प्रख्यात स्तंभलेखक आणि लेखक डॉ. दामोदर नेने यांचे मंगळवारी गुजरातच्या बडोदा येथे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
 • ‘दलितांचे राजकारण’, ‘धास्तावलेले मुसलमान’सह अनेक पुस्तकांचे लेखन
 • १९३१ साली तत्कालीन बडोदा प्रांतात त्यांचा जन्म झाला. १९४९ साली त्यांनी बडोदा वैद्याकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९५३ साली पदवी प्राप्त केल्यानंतर १९५६ सालापासून त्यांनी वैद्याकीय व्यवसायात प्रवेश केला.
 • दररोज दोन वेळा आपल्या दवाखान्यात जाऊन डझनावारी रुग्णांवर उपचार करण्याचे काम त्यांनी अनेक वर्षे केले
 • रुग्णसेवेबरोबरच स्तंभलेखन आणि पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी साहित्यसेवाही केली. केसरी, सामना, सोबत, माणूस, धर्मभास्कर, कॅरावान, विकली अशा अनेक नियतकालिकांमधून त्यांनी लेखन केले
 • आपल्या एका मुस्लीम रुग्णाचे ‘दादूमिया’ हे टोपणनाव घेऊन ते स्तंभलेखन करीत असत. १९६६ साली ‘कॅन इंदिरा ॲक्सेप्ट धिस चॅलेंज’ हे त्यांचे पहिले पुस्तक ‘विजयानंद भारती’ या टोपणनावाने प्रसिद्ध झाले. या पुस्तकाची दखल खुद्द इंदिरा गांधींनी घेतली.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment