Current Affairs | चालू घडामोडी | 23 MAY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 23 MAY 2024

1) 23 मे

1.1) समाचार दर्पण प्रकाशित = 23 मे 1818

  • भारतीय भाषेतील व बंगालीतील पहिले वृत्तपत्र

1.2) बचेन्द्री पाल कडून एव्हरेस्ट सर = 23 मे 1875

  • पहिली भारतीय महिला

2) रिझर्व्ह बँकेकडून २.११ लाख कोटींचा सर्वोच्च लाभांश मंजूर

  • लाभांशापोटी ही मध्यवर्ती बँकेकडूनस् सरकारला दिली गेलेली आजवरची सर्वोच्च रक्कम असून, वित्तीय तुटीवर नियंत्रण मिळवण्यासाठी झगडत असलेल्या केंद्रासाठी तो मोठा दिलासा ठरेल.
  • यापूर्वी आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये लाभांशापोटी रिझर्व्ह बँकेकडून केंद्राला १.७६ लाख कोटी रुपये असा उच्चांकी लाभांश दिला गेला होता
  • देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीच्या तुलनेत तुटीचे प्रमाण ५.१ टक्के या मर्यादेत ठेवण्याचे हे लक्ष्य साधण्यासाठी रिझर्व्ह बँकेची ही भरीव लाभांश रक्कम उपयुक्त ठरणार आहे.

3) युरोपमधील नॉर्वे, आयर्लंड आणि स्पेन या तीन देशांनी बुधवारी पॅलेस्टाईन राष्ट्राच्या अस्तित्वाला मान्यता दिली.

  • ही मान्यता प्रतीकात्मक असली, तरी यामुळे हमासविरोधात युद्धात गुंतलेला इस्रायल आणखी एकटा पडल्याचे मानले जात आहे.
  • हे देश २८ तारखेला पॅलेस्टाईनला अधिकृतरीत्या मान्यता देतील
  • परिणाम काय?
    • १९६७च्या युद्धानंतर पूर्व जेरुसलेम, वेस्ट बँक आणि गाझा पट्टी या भागांवर इस्रायलचा ताबा आहे.
    • पॅलेस्टाईन राष्ट्राच्या अस्तित्वाला आतापर्यंत १४० देशांची मान्यता असून नॉर्वे, आयर्लंड, स्पेनमुळे अन्य देशांवरही त्यासाठी दबाव वाढण्याची शक्यता आहे.
    • अमेरिका, ब्रिटनला स्वतंत्र पॅलेस्टाईनची संकल्पना मान्य असली तरी चर्चेतून हे राष्ट्र अस्तित्वात यावे, अशी त्यांची भूमिका आहे.
    • असे असले, तरी नकाराधिकार असलेल्या सर्व राष्ट्रांना मान्य होत नाहीत, तोपर्यंत इस्रायल-पॅलेस्टाईन द्विराष्ट्र ही केवळ संकल्पनाच असेल.

4) AEPS

  • Aadhar Enabled Payment System
  • ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी वापरात येणारी सुविधा

5) अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार रोहिणी हट्टंगडी, अशोक सराफ यांना जाहीर

  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने रंगभूमीवरील योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो

6) अभिनेता धर्मेंद्र यांना राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार

  • मध्य प्रदेश संस्कृती विभागा कडून सन्मानित
  • बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र देओल यांना मध्य प्रदेश सरकारचा राष्ट्रीय किशोर कुमार सन्मान 2022 जाहीर झाला आहे.
  • देओल यांनी अभिनय क्षेत्रात सातत्याने केलेले कार्य, उत्कृष्ट निर्मिती यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment