Current Affairs | चालू घडामोडी | 21 MAY 2024
1) दहशतवाद विरोधी दिन
- राजीव गांधी यांची हत्या = 21 मे 1991
- स्थळ = श्रीपेरुंबुदुर (तामिळनाडू)
2) सात्त्विक-चिराग या जोडीने थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील (सुपर ५०० दर्जा) पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले.
- चीनच्या जोडीवर मात; भारतीय जोडी यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा अजिंक्य
- जागतिक टूर स्पर्धेत कारकीर्दीतील नववे जेतेपद ठरले. त्यांनी मार्चमध्ये फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे (सुपर ७५० दर्जा) जेतेपद मिळवले. तसेच या जोडीने यंदा मलेशिया खुल्या (सुपर १००० दर्जा) आणि इंडिया खुल्या (सुपर ७५० दर्जा) बॅडमिंटन स्पर्धेतही अंतिम फेरीचा टप्पा गाठला होता.
3) ‘प्रधानमंत्री’ नाही, ‘पंतप्रधान’च शब्द योग्य!
- ‘देशाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला ‘पंतप्रधान’ असे संबोधले जाणेच योग्य आहे,’ अशी शिफारस भाषा सल्लागार समितीने राज्य सरकारला केली आहे.
- त्यामुळे ‘प्रधानमंत्री’ या शब्दाऐवजी शासकीय परिपत्रकांमध्ये ‘पंतप्रधान’ या शब्दाचा वापर करावा, अशी विनंती शासनाला करण्यात आली आहे
- शासन व्यवहार कोशात प्रधानमंत्री असे वापरले असले, तरी मराठी विश्वकोशात पंतप्रधान शब्दाचा वापर केला आहे.
- ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये पंतप्रधान हा शब्द होता. भाषेतील शब्दाला परंपरा असते, अर्थ असतो, हे ध्यानात घेऊन पंतप्रधान या योग्य शब्दाचा वापर करावा, अशी शिफारस केली आहे,’ याकडे भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी लक्ष वेधले.
4) हेलिकॉप्टर कोसळून इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्रमंत्री अब्दुल्लाहिया यांचा मृत्यू
- इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूची घोषणा झाल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी नियमाप्रमाणे प्रथम उपाध्यक्ष मोहम्मद मुखाबिर यांची निवडणूक होईपर्यंत देशाचे काळजीवाहू अध्यक्ष म्हणून नियुक्ती करत असल्याची घोषणा केली.
- अध्यक्षपदाची निवडणूक ५० दिवसांच्या आत होईल
- भारताकडून दुखवटा जाहीर
- इराणच्या अध्यक्षांप्रती आदर दाखवताना भारताकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
- देशभरात ज्या ज्या इमारतींवर राष्ट्रध्वज नियमितपणे फडकावला जातो तिथे तो अर्ध्यावर उतरवला जाईल
5) ‘ट्रान्सिशनल अरेंजमेंट’ म्हणजे काय?
- ‘परदेशी व्यापार धोरण २०२३’ १ जुलै २०२३ पासून लागू झाले आहे. या धोरणांतर्गत ‘ट्रान्सिशनल अरेंजमेंट’ ची तरतूद करण्यात आली आहे.
- त्यानुसार, एखाद्या वस्तूवर बंदी आणण्याचा आदेश निघण्यापूर्वी निर्यातदारांनी अपरिवर्तनीय व्यावसायिक करारपत्र केले असल्यास त्यांना त्या कराराची पूर्तता करण्याची संधी दिली जाते.
- केंद्र शासनाने २०२२ मध्ये गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणताना निर्यातदारांना ही संधी दिली होती, मात्र तांदळाच्याबाबतीत कुठलेही कारण न देता ही संधी नाकारण्यात आली.
6) देशात ‘हर घर जल’ योजनेचे ७६ टक्के काम!
- आठ राज्यात ही योजना १०० टक्के पूर्ण झाली. परंतु, राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये निम्मीही कामे झाली नाही.
- महाराष्ट्रात मात्र ८५ टक्के कामे पूर्ण झाली आहे.
- जलशक्ती मंत्रालयाच्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे.
- ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून केंद्र सरकारने ऑगस्ट २०१९ मध्ये ‘हर घर जल’ ही योजना सुरू केली. २०२४ पर्यंत ही योजना पूर्णत्वास न्यायची होती.
7) देशातील पहिली ॲडव्होकेट अकादमी रायगडमध्ये
- वकीलांना येथे विधी प्रक्षिक्षण मिळणार
8) सीरमकडून आफ्रिकेसाठी हिवतापाची लस
- हिवतापावरील = आर २१/ मॅट्रिक्स एम लस
- ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, नोव्हाव्हॅक्स यांच्या सहकार्याने निर्मिती; आफ्रिकन देशांना पुरवठा
- हिवतापाचा प्रादुर्भाव असलेल्या देशांमध्ये लहान मुलांना ही लस देण्यास परवानगी मिळालेली आहे. अशा प्रकारची परवानगी मिळालेली ही दुसरी लस आहे.
9) इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धा
- मँचेस्टर सिटीने वेस्ट हॅमचा ३-१ असा पराभव करताना विक्रमी सलग चौथ्यांदा इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलच्या जेतेपदावर मोहोर उमटवली.
- अशी कामगिरी करणारा सिटी हा पहिलाच संघ ठरला आहे. सिटीला यंदा आर्सेनलकडून आव्हान मिळाले. मात्र, अखेरीस आर्सेनलला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel