Current Affairs | चालू घडामोडी | 29 AUG 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 29 AUG 2024

1) ICC क्रमवारी जाहीर

  • अव्वल दहामधे तीन भारतीय
  • रोहित शर्मा ठरला भारतीय टॉपर – सहावा
  • यशस्वी जैस्वाल – सातवा
  • विराट कोहली – आठवा
  • अष्टपैलू क्रमवारीमध्ये रवींद्र जडेजा अव्वल तर आर आश्विन दुसरा क्रमांक वर
  • गोलंदाजी मध्ये आर अश्विन पहिल्या क्रमांकावर

2) केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय

  • रायगडच्या दिघीमध्ये नवी औद्योगिक वसाहत…

3) पुरस्कार आणि साहित्याची भाषा

  • साहित्य अकादमी:- 24 भाषा = 22 + इंग्रजी + राजस्थानी
  • ज्ञानपीठ :- 23 भाषा = 22 + इंग्रजी
  • सरस्वती सन्मान:- 22 भाषा (8 वी अनुसूची)(10 yr)
  • व्यास सन्मान:- फक्त हिंदी (10 yr)
  • बुकर:-  इंग्रजी (+ब्रिटन किंवा आयर्लंड मध्ये प्रकाशित)
  • आंतरराष्ट्रीय बुकर:- इतर कोणत्याही भाषेतून इंग्रजी मध्ये भाषांतरित.(+ब्रिटन किंवा आयर्लंड मध्ये प्रकाशित).

4) जनधन योजना झाली दहा वर्षाची

  • सुरुवात 28 ऑगस्ट 2014
  • उद्दिष्टे :- वित्तीय समावेशन
  • 53 कोटी खाते उघडली

5) ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन

  • कला क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्य शासनाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या सुहासिनी देशपांडे यांचा जन्म ९ डिसेंबर १९४२ रोजी पुण्यात झाला.
  • वयाच्या अकराव्या वर्षी बहुरूपी व्यवस्था कला झंकार नृत्य पार्टीच्या मेळ्यांमधून त्यांनी नृत्यांगना म्हणून कलेची सुरुवात केली.
    • लीला गांधी यांच्यासमवेत त्यांनी नृत्याचे अनेक कार्यक्रम केले.
  • पुण्यातील डेक्कन, प्रभात, नवयुग यांसारख्या स्टुडिओमधून त्यांनी नृत्य कलाकार आणि ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून कामही केले.

6) राज्यातील दोन शिक्षक राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी

  • गडचिरोलीतील मंताय्या बेडके, कोल्हापुरातील सागर बगाडे यांना पुरस्कार
  • केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 मध्ये 50 शिक्षक पुरस्कारप्राप्त ठरवले आहेत.
  • शिक्षक दिनी (५ सप्टेंबर) दिल्लीतील विज्ञान भवन येथे होणाऱ्या कार्यक्रमात शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
  • मंताय्या बेडके
    • गेली १४ वर्षे संवेदनशील, दुर्गम भागात कार्यरत
    • या काळात शाळेची पटसंख्या 8 वरून 138 पर्यंत वाढवण्यात यश मिळाले आहे.
    • ग्रामीण दुर्गम भागात शाळा असूनही लोकसहभागाच्या माध्यमातून शाळेत इव्हर्टर, स्मार्ट टीव्ही अशा सुविधा विकसित केल्या आहेत
  • सागर बगाडे
    • कोल्हापूर येथील एस. एम. लोहिया हायस्कूलमध्ये गेली तीस वर्षे चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
    • विद्यार्थ्यांना घेऊन देशविदेशात कार्यक्रम केले आहेत. दोन विश्वविक्रम नोंदवले गेले आहेत
    • दुर्गम भागातील मुले, शरीरविक्रय करणाऱ्या महिलांची मुले यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले

7) बाळाच्या नियमित लसीकरणासाठी ‘हॅलो व्हॅक्सी’. सर्व माहिती मोबाइलवर उपलब्ध होणार.

  • बाळांचे लसीकरण करताना अनेकदा गोंधळ उडतो, कधीकधी लसीकरणाची तारीख लक्षात राहत नाही. त्यामुळे राज्य सरकारने लसीकरणाची माहिती मोबाइलवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • त्यासाठी ‘हॅलो व्हॅक्सी’ हे व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरू करण्यात आले आहे.
    • सध्या हे चॅटबॉट इंग्रजी व हिंदीमध्ये उपलब्ध असून, लवकरच ते मराठीमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.
  • सार्वजनिक आरोग्य विभाग आणि ‘यूएसएड, मोमेन्टम रूटीन इम्युनायझेशन ट्रान्सफोर्मेशन अँड इक्विटी’ प्रकल्प यांच्या सहकार्याने हे चॅटबॉट तयार करण्यात आले आहे.
  • बाळाच्या लसीकरणाशी संबंधित सर्व माहिती देण्यासाठी आणि गैरसमज दूर करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

8) राष्ट्रीय क्रीडा दिन = 29 ऑगस्ट

  • हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.
  • थीम 2024 = स्पोर्ट फॉर द प्रमोशन: शांततापूर्ण आणि समावेशी समाज

9) भारतात टेलिग्रामचे सर्वाधिक वापरकर्ते

  1. भारत
  2. ब्राझील
  3. मेक्सिको
  4. झिम्बाब्वे
  5. स्पेन
  6. इटली
  7. जर्मनी
  8. फ्रान्स
  9. ब्रिटन
  10. अमेरिका
  11. जपान

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment