Current Affairs | चालू घडामोडी | 29 JULY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 29 JULY 2024

अनुक्रमणिका

1) 29 जुलै दिनविशेष

1.1) ईश्वरचंद्र विद्यासागर पुण्यतिथी = 29 जुलै 1891

  • विधवा पुनर्विवाह कायदा संमत होण्यासाठी प्रयत्न

1.2) आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था स्थापना (IAEA) = 29 जुलै 1957

  • मुख्यालय = व्हिएन्ना

2) राष्ट्रपतींनी काही राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

  • महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थान च्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली आहे.
  • झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • राधाकृष्णन हे रमेश बैस यांच्या जागी पदभार स्विकारणार आहेत. सध्या ते झारखंडचे राज्यपाल आहेत.
  • तर झारखंडच्या राज्यपालपदाची जबाबदारी संतोषकुमार गंगवार यांच्याकडे सोपविण्यात येईल

3) शेखर कपूर ‘इफ्फी’चे नवे संचालक

  • कपूर यांनी ‘मासूम’, मिस्टर इंडिया, बँडेड क्वीन या लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली आहे.
  • ज्येष्ठ चित्रपट निर्माते शेखर कपूर यांची भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
  • कपूर यांच्या नेतृत्वाखाली गोवा येथे 55वा व 56वा चित्रपट महोत्सव होणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली.

4) सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना खनिज उपकर आकारण्याची परवानगी दिली.

  • सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाने सांगितले की, राज्यांना खाणी आणि खनिजे असलेल्या जमिनींवर कर लावण्याचा घटनात्मक अधिकार आहे.
  • खाण कामगारांनी केंद्र सरकारला दिलेली रॉयल्टी हा कर नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.
  • या निकालामुळे खनिज उत्पन्न करणाऱ्या राज्यांच्या महसुलात वाढ होईल. (मुख्यतः पूर्व भारतातील.)
  • सुप्रीम कोर्टाच्या निकालाने खनिजांवर कर लावण्याबाबत राज्ये आणि केंद्र यांच्यातील सत्तेच्या विभागणीबाबतही स्पष्टता दिली आहे.

5) गेल्या पाच वर्षांत भारतात ६२८ वाघांचा मृत्यू झाला आहे.

  • दर महिन्यात आमच्यातील दोघांचा जातो जीव
  • आंतरराष्ट्रिय व्याघ्र दिन = 29 जुलै
  • सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत भारतात ६२८ वाघांचा नैसर्गिक तसेच इतर कारणांमुळे मृत्यू झाला आहे.
  • गेल्या पाच वर्षांत वाघांच्या हल्ल्यात ३४९ जणांचा मृत्यू झाला. एकट्या महाराष्ट्रात 200 जणांचा मृत्यू झाला आहे.
  • NTCA नुसार, 2019 मध्ये 96 वाघ, 2020 मध्ये 106, 2021 मध्ये 127, 2022 मध्ये 121 आणि 2023 मध्ये 178 वाघांचा मृत्यू झाला.
  • 2023 मध्ये वाघांच्या मृत्यूची संख्या देखील 2012 नंतर सर्वाधिक आहे.
  • उत्तर प्रदेशात वाघाच्या हल्ल्यात ५९ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात वाघाच्या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
  • भारतात वाघांची संख्या 3,682 आहे, जी जागतिक वन्य वाघांच्या लोकसंख्येच्या सुमारे 75% आहे.
  • 1 एप्रिल 1973 रोजी भारताने व्याघ्र संवर्धनाला चालना देण्यासाठी प्रकल्प टायगर सुरू केला.
  • भारतात 78,735 चौरस किमीपेक्षा जास्त व्यापलेले 55 व्याघ्र प्रकल्प आहेत.

6) जवाहरलाल नेहरू बंदरावर भारतातील पहिली एकात्मिक कृषी-निर्यात सुविधा

  • मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर , भारतातील पहिली एकात्मिक कृषी निर्यात सुविधा विकसित करण्यासाठी सज्ज आहे.
  • केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांनी मंजूर केलेल्या या प्रकल्पाचे मूल्य रु. 284.19 कोटी आहे.
  • हा प्रकल्प 67,422 चौरस मीटर क्षेत्रफळ कव्हर करेल.
  • या अत्याधुनिक सुविधेचा उद्देश लॉजिस्टिक्स सुव्यवस्थित करणे, अनेक हाताळणी कमी करणे आणि कृषी उत्पादनांचे शेल्फ लाइफ वाढवणे हे आहे.

7) कारगिल विजय दिवसाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त स्मरणार्थ टपाल तिकीट जारी

  • कारगिल विजय दिवसाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त टपाल विभागाने लडाखमधील द्रास, कारगिल येथे एक टपाल तिकीट प्रकाशित केले आहे.
  • ही विशेष आवृत्ती सशस्त्र दलांच्या शौर्य, दृढनिश्चय आणि बलिदानाची कबुली देऊन कारगिल युद्धात भारताच्या विजयाचा २५ वा वर्धापन दिन साजरा करते.

8) आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन 2024 ( संपूर्ण जगात)

  • 6 एप्रिल ला साजरा केला जातो
  • 2024 थीम : “Sport for the Promotion of Peaceful and Inclusive Societies”.
  • पहिल्यांदा 6 एप्रिल 2014 ला साजरा केला गेला
  • राष्ट्रीय क्रीडा दिवस ( संपूर्ण भारतात )
    • 29  ऑगस्ट ला साजरा केला जातो 
    • मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त ”राष्ट्रीय क्रीडा दिन” म्हणून साजरा केला जातो.
    • पहिला राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट 2012 रोजी साजरा करण्यात आला
  • राज्य क्रीडा दिवस ( फक्त महाराष्ट्र पुरता )
    • 15 जानेवारी ला साजरा केला जातो
    • खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनी
    • खाशाबा जाधव यांनी फिनलंडमधील हेलसिंकी येथे 1952 च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.( देशाला पाहिले ऑलिम्पिकमध्ये पदक भेटले)

9) ऑलिम्पिकमधील भारताचे यश

  • 🥇 स्वतंत्र भारताच्या पहिले वैयक्तिक पदक महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी मिळवले. १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधील कुस्तीत खाशांबांनी ब्राँझपदक मिळवले होते.
  • ८ – ऑलिम्पिकमधील हॉकी सर्वाधिक पदकांचा विक्रम भारताच्या नावावर, भारतीय पुरुष संघाने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत आठ सुवर्ण, एक रौप्य आणि तीन ब्राँझ अशी बारा पदके मिळवली आहेत.
  • ७ – भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकीपाठोपाठ सर्वाधिक पदके कुस्तीत मिळवली आहेत. कुस्तीत भारताने दोन रौप्य आणि पाच ब्राँझ अशी एकूण सात ऑलिम्पिक पदके मिळवली आहेत.
  • ४ – ऑलिम्पिकमधील नेमबाजीत भारताने आतापर्यंत चार पदके मिळवली आहेत. अभिनवने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पुरुषाच्या १० मी. एअर रायफलमध्ये सुवर्णवेध घेतला होता.
  • 🥇 ऑलिम्पिकमधील वेटलिफ्टिंगमध्ये भारताला कर्णम मल्लेश्वरीने पहिले पदक मिळवून दिले. तिने २००० सिडनी ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक मिळवले होते. त्यानंतर गेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूने रौप्यपदक मिळवले.

10) श्रीलंकेने 20 वर्षांतील पहिला महिला आशिया कप जिंकला

  • भारताने 9 पैकी 7 वेळा महिला आशिया कप जिंकला आहे.
  • 2004 नंतर सुरू असलेल्या महिला आशिया चषक स्पर्धेत श्रीलंका प्रथमच चॅम्पियन बनला.
  • श्रीलंकेने महिला आशिया चषक 2024 चे विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे.
  • या संघाने अंतिम फेरीत भारताचा 8 गडी राखून पराभव केला.
  • 2004 मध्ये सुरु झालेल्या महिला आशियामध्ये श्रीलंका प्रथमच चॅम्पियन बनला, याआधी हा संघ 5 वेळा उपविजेता ठरला होता.
  • यासोबतच भारत दुसऱ्यांदा महिला आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झाला. याआधी 2018 मध्ये बांगलादेशकडून संघाचा पराभव झाला होता.

11) पर्यटन विभागाच्या अधिनस्त असलेल्या ‘पर्यटन संचालनालय’ व HelloMTDC या दोन प्रमुख संस्थांच्या बोधचिन्ह, घोषवाक्यातील तफावत दूर करण्यात आली आहे.

  • आता ‘महाराष्ट्र टुरिझम’ हे बोधचिन्ह (लोगो) तर ‘महाराष्ट्र अनलिमिटेड’ हे घोषवाक्य (टॅग लाईन) असेल – पर्यटन मंत्री

12) ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेचा भाग म्हणून संरक्षण मंत्रालय येत्या स्वातंत्र्यदिनी, 2024 रोजी पंधरा लाख वृक्षांची लागवड करणार.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 जून 2024 रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमेची सुरुवात केली होती
  • 15 ऑगस्ट 2024 रोजी 78 व्या स्वातंत्र्य दिन समारंभाच्या निमित्ताने संरक्षण मंत्रालय देशभर 15 लाख वृक्षांची लागवड करण्याची मोठी मोहीम हाती घेणार आहे.
  • ही वृक्ष लागवड मोहीम, एक पेड माँ के नाम (आईच्या नावाने एक वृक्ष) मोहिमेचा एक भाग आहे

13) इंडोनेशियाचे माजी उपराष्ट्रपती हमजा हझ यांचे ८४ व्या वर्षी निधन झाले.

  • 2001 ते 2004 या काळात इंडोनेशियाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले.
  • अध्यक्ष मेगावती सोकर्णोपुत्री यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केले होते.
  • जकार्ता येथील रुग्णालयात निधन झाले.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment