Current Affairs | चालू घडामोडी | 29 JULY 2025
1) २९ जुलै दिनविशेष
१.१) १८९१ = ईश्वरचंद्र विद्यासागर पुण्यतिथी
- विधवा पुनर्विवाह कायदा संमत होण्यासाठी प्रयत्न.
१.२) १९५७ = आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेची स्थापना (IAEA)
१.३) १९४६: टाटा एअरलाइन्सचे एअर इंडिया असे नामकरण झाले.
१.४) १९५८: नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (NASA) – स्थापना
१.५) १९०४: जे. आर. डी. टाटा उर्फ जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचा जन्म.
- भारतीय उद्योजग
- ते भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते
१.६) १९९६: स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफ अली यांचे निधन
१.७) २९ जुलै = जागतिक व्याघ्र दिन
2) अजय कुमार श्रीवास्तव यांची HAL (हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड) येथे अभियांत्रिकी व संशोधन (Engineering & R&D) संचालक म्हणून नियुक्ती
- यांनी 15 जुलै 2025 रोजी HAL मध्ये संचालक बनले
- या नियुक्तीपूर्वी ते HAL मध्ये कार्यकारी संचालक (Aircraft Research & Design Centre – ARDC) म्हणून कार्यरत होते.
- 1988 मध्ये HAL मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (तंत्रज्ञ) म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
- 37 वर्षांनंतर Engineering & R&D प्रमुख बनले
- त्यांना FASIA (French Aeronautics & Space Industry Award) — फ्रान्सच्या एरोनॉटिक्स उद्योगातील योगदानासाठी पुरस्कार मिळालेला आहे

3) SIMBEX – Singapore-India Maritime Bilateral Exercise
- आवृत्ती : 32 संस्करण (2025)
- ठिकाण: सिंगापूर
- सहभागी: भारतीय नौदल आणि रिपब्लिक ऑफ सिंगापूर नेव्ही (RSN)
- पूर्वी “Exercise Lion King” म्हणून ओळखला जात असे
- सुरुवात: 1994 पासून

4) बुद्धिबळाच्या रणांगणात मराठमोळी ‘महाराणी’ – दिव्या देशमुख!
- इतिहास घडवणारा क्षण!
- मराठमोळी बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने जॉर्जियाच्या बटुमी येथे झालेल्या महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेत विजेतेपद पटकावत भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी आपले नाव कोरले!
- अंतिम फेरीत दिव्याने भारताचीच दिग्गज खेळाडू फोनेरू हंपी हिला २.५ – १.५ अशा गुणांनी पराभूत करत महिला बुद्धिबळ विश्वविजेतेपद मिळवलं.
- एखाद्या भारतीय महिला खेळाडूने हे विश्वविजेतेपद जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे!
- दिव्याची कर्तबगारी – डबल धमाका!
- विश्वविजेतेपदासोबतच दिव्या भारताची ८८ वी ग्रँडमास्टर देखील ठरली आहे.
- महिलांमध्ये ग्रँडमास्टर होणारी ती चौथी भारतीय खेळाडू
- (हंपी, हरिका, वैशाली नंतर दिव्या)
- थोडकं इतिहासात डोकावूया:
- हंपीने २००२ मध्ये ग्रँडमास्टर पदक मिळवलं, तर त्याच्यानंतर २००५ मध्ये दिव्याचा जन्म झाला!
- हंपी सलग दोन वर्षे रॅपिड बुद्धिबळ विश्वविजेती राहिली होती.
- २०२३ मध्ये हंपीला हरवत दिव्याने रॅपिड प्रकारात पहिलं विजेतेपद मिळवलं होतं!

5) ‘ऑपरेशन महादेव’ – भारताचे शक्तिशाली प्रत्युत्तर
- दहशतवादाचा मुळापासून बंदोबस्त!
- जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराचा खात्मा करण्यासाठी भारतीय सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या कारवाईला ‘ऑपरेशन महादेव’ असे नाव देण्यात आले.
- या मोहिमेत तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, त्यातील दोन दहशतवादी पहलगाम हल्ल्यात सहभागी होते.
- प्रमुख दहशतवादी व लष्कर-ए-तैय्यबाचा म्होरक्या ‘सुलेमान शाह’ ठार.
- तसेच अबू हमजा व यासिर ही दोन दहशतवादी देखील ठार.
- संयुक्त कारवाईची झंझावाती योजनेत:
- भारतीय लष्कर, CRPF, आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी मिळून दाचीगाम जंगलाजवळील लिडवास-मारवान भागात अत्यंत वेगाने व अचूक कारवाई केली.
- ऑपरेशन सुरू का झाले?
- पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी श्रीनगरजवळील माऊंट महादेव परिसरात लपल्याची माहिती मिळाल्यावरच संयुक्त ऑपरेशनची आखणी करण्यात आली.
- ही कारवाई अजूनही सुरू असून उर्वरित दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.
- भारताची सुरक्षा यंत्रणा सदैव सज्ज!

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel
TelegramWhatsAppCopy LinkShare