Current Affairs | चालू घडामोडी | 30 JULY 2025
1) ३० जुलै दिनविशेष
१.१) १९५७ = Export Credit Guarantee Corporation of India स्थापना (ECGC)
- मुख्यालय = मुंबई
- मंत्रालय = वाणिज्य
१.२) २०१४: पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० ठार.
2) थायलंड-कंबोडियात भीषण संघर्ष पेटला
- थायलंड आणि कंबोडिया या दोन देशांमध्ये संघर्ष सुरू झाला असून, सीमेवर जोरदार गोळीबार झाला.
- थायलंड-कंबोडिया सीमारेषाही बंद करण्यात आली आहे. मे महिन्यात झालेल्या एका सशस्त्र संघर्षात कंबोडियाचा एक सैनिक ठार झाल्यानंतर या आग्नेय आशियाई शेजारी देशांमधील संबंध बिघडत गेले.
- प्राचीन प्रेह विहार शिव मंदिराच्या मालकी हक्कावरून दोन्ही देशांमध्ये गेली अनेक वर्षे वाद सुरू आहे.
- कंबोडिया आणि थायलंड हे दोन्हीही दक्षिण पूर्व आशियाई देश आहेत. तसेच दोन्हीही देश आसियान या संघटनेचे भाग आहेत.

3) राष्ट्रीय सहकार धोरण २०२५
- केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची घोषणा
- “समृद्ध भारतासाठी सहकार!”
- ५० कोटी नागरिकांना सहकारी संस्थांशी जोडण्याचा संकल्प
- ३०% वाढ – देशभरात सहकारी संस्थांची संख्या
- प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान एक सहकारी संस्था
- प्रत्येक तालुक्यात ५ मॉडेल सहकारी गावे
- धवलक्रांती २.० – महिलांना सहकारी उपक्रमांमध्ये सहभागी करून सशक्तीकरण
- इथेनॉल निर्मिती – सहकारी साखर कारखान्यांतून हरित इंधनाचा प्रचार
- शेतकरी स्वावलंबी – सौर/पवन ऊर्जा, सेंद्रिय शेती, कृषी वनीकरणाला चालना
- ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ – सहकारी संस्थांद्वारे निर्यातीस बळ
- सहकार क्षेत्राचे भविष्य तंत्रज्ञानाशी जोडलेले
- IoT, Blockchain, Digital Logistics वापरून Circular Economy चा विस्तार
- दुग्ध सहकारी संस्था – गावागावात बायोगॅस निर्मिती
- NPA जमीन फायद्यात – PACS मार्फत हरित क्रांती
- “एक राष्ट्र, एक बँड” – सहकार क्षेत्राला नवे रूप, नवे बळ!

4) जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीती कौशल्य अभ्यास केंद्राचे उद्घाटन
- दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) छत्रपती शिवाजी महाराज स्पेशल सेंटर फॉर सिक्युरिटी अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजचे (अभ्यास केंद्र) उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
- त्यांच्या हस्ते कुसुमाग्रज स्पेशल सेंटर फॉर मराठी लँग्वेज, लिटरेचर अँड कल्चरचेही उद्घाटन करण्यात आले.
- शिवाजी महाराजांच्या युद्धशक्ती प्रभुत्वाच्या अभ्यासासाठी हे केंद्र जेएनयूमध्ये उघडले आहे

5) सुलोचना गाडगीळ – ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ यांचे निधन
- त्यांचे पती हे ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ होते
- तसेच ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या त्या सून होत्या
- व्यवसाय: हवामानशास्त्रज्ञ (Meteorologist)
- विशेष कार्यक्षेत्र: मान्सून प्रणाली, हवामान बदल, कृषी हवामानशास्त्र
- संस्था: भारतीय उष्णदेशीय हवामान संस्था (Indian Institute of Tropical Meteorology – IITM), पुणे
- पत्नी: डॉ. माधव गाडगीळ (पर्यावरणशास्त्रज्ञ)
- भूषणावह कार्य:
- भारतीय मान्सूनच्या कार्यप्रणालीवर गहन संशोधन केल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली.
- हवामानशास्त्राचे कृषीशी संबंधित उपयोग समजावून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
- शेतीपूरक हवामान अंदाज प्रणाली विकसित करण्यात योगदान.
- सन्मान:
- अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार, संशोधन लेख प्रसिद्ध.
- भारत सरकार व विविध शैक्षणिक संस्थांकडून गौरव.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel