Current Affairs | चालू घडामोडी | 30 SEPT 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 30 SEPT 2024

1) 30 सप्टेंबर दिनविशेष

1.1) 30 सप्टेंबर 1993 = किल्लारी (जि. लातूर) येथे भूकंप

  • तीव्रता = 6.4 रिश्टर स्केल

1.2) जागतिक भाषांतर दिन

2) प्रधान मंत्री किसान मानधन योजना (PMKMY)

  • 12 सप्टेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आलेली, प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) देशभरातील सर्व जमीनधारक लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना (SMFs) सामाजिक सुरक्षा प्रदान करत आहे.
  • ही वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना एक ऐच्छिक आणि योगदान देणारी पेन्शन योजना आहे.
  • प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) अंतर्गत, लहान आणि सीमांत शेतकरी पेन्शन फंडाची मासिक सदस्यता भरून नोंदणी करू शकतात.
    • 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांनी रु.55 ते 200 च्या दरम्यान 60 वर्षांचे होईपर्यंत योगदान देणे आवश्यक आहे.
    • या उपक्रमांतर्गत पात्र लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना निश्चित मासिक पेन्शन रु. वयाची 60 पूर्ण झाल्यावर 3,000 मिळतील.
    • लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) पेन्शन फंडाचे व्यवस्थापन करते आणि लाभार्थी नोंदणीची सुविधा कॉमन सर्व्हिस सेंटर्स (CSCs) आणि राज्य सरकारांमार्फत केली जाते.

3) मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

  • केंद्रीय सांस्कृतिक मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली माहिती

4) रेल्वेची देशात पहिली ‘कवच ४.०’ यंत्रणा सुरु

  • सात किलोमीटरवरील सिग्नल इंजिनमधील डिस्प्लेवर आधीच दिसणार
  • केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजस्थानातील सवाई माधोपूर ते सुमेरगंज मंडी प्रवासादरम्यान ‘कवच ४.०’ची चाचणी घेतली.
  • या मार्गावर देशातील पहिली ‘कवच ४.०’ यंत्रणा सुरू झालेली आहे.
  • असे काम करते ‘कवच ४.०’
    • इंजिनमध्येच बसवण्यात आलेल्या डिस्प्लेवर पुढील ७ कि.मी. वरील सिग्नल दिसतो.
    • दोन कि.मी. अंतरावर रेड सिग्नल असेल तर कवच स्वतः लोको पायलटला वेग कमी करण्याची सूचना देते.
    • पायलटने ब्रेक लावला नाही तर कवच स्वतःच ब्रेक लावेल आणि रेल्वेचा वेग कमी करेल.

5) महाराष्ट्र सरकारने ‘गायीला राज्यमाते’चा दर्जा दिला.

  • 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने ‘गायीला राज्यमाता’ म्हणून घोषित केले.
  • गायीला राज्यमाता घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील दुसरे राज्य बनले.
  • गायीला राज्यमाता घोषित करणारे पहिले राज्य उत्तराखंड (2018)
  • महाराष्ट्राची इतर मानचिन्हे :
    • राज्य माता = देशी गाय (सप्टेंबर 2024 ला जाहीर)
    • राज्य मासा = सिल्व्हर पॉम्फ्रेट, सरंगा (पापलेट)
    • राज्य फूल = जारूळ (ताम्हण)
    • राज्य प्राणी = शेकरू
    • राज्य पक्षी = हरोली ( हरियाल)
    • राज्य वृक्ष = आंबा
    • राज्य खेळ = कबड्डी
    • राज्य फुलपाखरू = राणी पाकोळी, नीलपरी (ब्ल्यू मॉरमॉन)
    • राज्य गीत = जय जय महाराष्ट्र माझा
    • राज्य कांदळवन वृक्ष = पांढरी चिप्पी (सफेद चिप्पी)
  • महत्वाचे मुद्दे
    • राज्य शस्त्र जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले.
    • राज्य कांदळवळ वृक्ष जाहीर करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र होय.
    • राज्य फुलपाखरू जाहीर करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र होय.

6) अटल पेन्शन योजना (APY)

  • सुरुवात= 9 मे 2015
  • वयाच्या 60 व्या वर्षापासून निश्चित लाभ मिळविण्यासाठी एपीवायमध्ये नियमित योगदान अनिवार्य आहे.
  • उद्देश
    • “बैंकिंग माहित नसलेल्यांना बँकिंग, निधी नसलेल्यांना निधी देणे आणि आर्थिकदृष्ट्या असुरक्षितांना सुरक्षित करणे या तीन बाबींवर सरकार लक्ष केंद्रित करते.
  • लाभ
    • आजीवन खात्रीशीर किमान मासिक पेन्शन (रु. 1,000 ते रु. 5,000)
    • सदस्याच्या मृत्यूनंतर आयुष्यभर त्यांच्या जोडीदारासाठी खात्रीशीर समान पेन्शन रक्कम
    • दोघांच्या मृत्यूनंतर वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत जमा झालेले कॉर्पस नॉमिनीला परत केले जातील.
  • आतापर्यंत 6.85 कोटी सदस्यांनी एपीवाय अंतर्गत नोंदणी केली आहे.
  • पात्रता : 18 ते 40 वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक ज्यांचे बँक खाते आहे ते अटल पेन्शन योजनेत सामील होऊ शकतात.

7) गोखले संस्थेतून डॉ. रानडे यांची नियुक्ती रद्द करणारे कुलपती डॉ. देबराय यांचा राजीनामा

  • डॉ. देबराय यांची गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलपतीपदी ५ जुलै रोजी नियुक्ती करण्यात आली होती.
  • विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) निश्चित केलेल्या निकषांची पूर्तता होत नसतानाही डॉ. अजित रानडे यांची गोखले संस्थेच्या कुलगुरूपदी निवड झाल्याचा आक्षेप घेऊन तक्रारी करण्यात आल्या होत्या.

8) नववीच्या विद्यार्थ्यांची मूल्यमापन चाचणी (PAT)

  • राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित शाळांतील तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी १ घेतली जाणार आहे.
  • 2024 पासून नव्याने समावेश
  • गेल्या वर्षी (2023) या परीक्षा तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जात होत्या. दहावीला राज्य मंडळाची परीक्षा असते. त्यामुळे केवळ नववीच्याच वर्गाचे मूल्यमापन बाकी राहत होते. त्यामुळे त्यांचा समावेश करण्यात आला.

9) राज्यातील पहिली महिला औद्याोगिक वसाहत नागपुरात

  • उद्योगात महिलांची संख्या वाढायला हवी, यासाठी राज्यातील पहिली महिला औद्याोगिक वसाहत (एमआयडीसी) नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरात उभारली जाईल, अशी घोषणा उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी केली.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment