Current Affairs | चालू घडामोडी | 31 JULY 2025

Current Affairs | चालू घडामोडी | 31 JULY 2025

1) ३१ जुलै दिनविशेष

१.१) १८६५ = नाना शंकरशेठ पुण्यतिथी

  • मुंबई चे शिल्पकार
  • किताब = Justice of peace
  • स्थापना कार्य = बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी (१८२२)
  • ग्रॅण्ट मेडिकल कॉलेज (१८४५)
  • विधी महाविद्यालय (१८५५),
  • डेव्हिड ससून ग्रंथालय
  • अधिक माहिती साठी 👇
    https://t.me/mpsc_library/2562

१.२) १९१२: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रिडमन यांचा जन्म

१.३) १९४०: भारतीय क्रांतिकारक उधम सिंग यांना ब्रिटिश सरकारने आजच्या दिवशी फाशी दिली

2) उमा कांजीलाल यांची इग्नूच्या (IGNOU) पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नियुक्ती

  • शिक्षण मंत्रालयाने त्यांची नियुक्ती केली आहे.
  • त्यांना मुक्त आणि दूरस्थ शिक्षणाचा ३६ वर्षांहून अधिक अनुभव आहे.
  • तसेच त्या स्वयंम आणि स्वयंप्रभा च्या राष्ट्रीय समन्वयक देखील आहेत.
  • जगातील सर्वात मोठ्या मुक्त विद्यापीठांपैकी एक असलेल्या इग्नूसाठी ही खूप महत्त्वाची बाब आहे. १९८५ मध्ये विद्यापीठाच्या स्थापनेनंतर या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
  • डिजिटल शिक्षणातील योगदानासाठी ओळखल्या जाणाऱ्या ओपन अँड डिस्टन्स लर्निंग (ODL) मध्ये तंत्रज्ञान-सक्षम शिक्षण वाढविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

3) IGNOU – इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ

  • स्थापना: 1985 (IGNOU Act द्वारे – संसदेतून विधीमंडळात मंजुरी)
  • मुख्यालय: नवी दिल्ली
  • घोषवाक्य: “People’s University” – लोकांचे विद्यापीठ
  • स्थापनेमागील उद्दिष्ट:
    • गरीब, ग्रामीण, महिला व काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण उपलब्ध करून देणे
    • “कुठेही, कधीही शिक्षण” या तत्वावर आधारित शिक्षणप्रणाली
  • कोर्सेस व अभ्यासक्रम:
  • 200 हून अधिक अभ्यासक्रम
  • प्रमाणपत्र, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी.
  • ऑनलाईन व दूरस्थ शिक्षण (Distance + Online Mode)
  • SWAYAM व e-GyanKosh सारखे प्लॅटफॉर्म उपलब्ध
  • विद्यार्थी संख्या:
    • 30 लाखांहून अधिक विद्यार्थी
    • जगातील सर्वात मोठं मुक्त विद्यापीठ
  • मान्यता:
    • UGC, AICTE, NAAC मान्यताप्राप्त
    • भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत

4) IRDAI चे नवे अध्यक्ष – अजय सेठ यांची नेमणूक

  • भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) या देशातील महत्वाच्या संस्थेच्या अध्यक्षपदी माजी आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ यांची नेमणूक करण्यात आली आहे.
  • कार्यकाळ – ३ वर्षे / वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत / पुढील आदेश येईपर्यंत – यापैकी जे लवकर असेल, तोपर्यंत ही नेमणूक लागू.
  • अजय सेठ कोण आहेत?
    • 1987 बॅचचे IAS अधिकारी
    • आर्थिक धोरणनिर्मिती, वित्त क्षेत्र आणि नियामक सुधारणा यामध्ये 30+ वर्षांचा प्रशासकीय अनुभव
  • हे पद देबाशिष पांडा यांच्या कार्यकाळानंतर 13 मार्चपासून रिक्त होते.
  • ही नियुक्ती मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मंजूर केली आहे.
  • महत्व – विमा क्षेत्राच्या नियमनासाठी IRDAI ही एक अत्यंत निर्णायक संस्था आहे, आणि अनुभवी अधिकाऱ्याच्या नेतृत्वामुळे धोरणात्मक बदलांना गती मिळणार!

5) ‘संसदरत्न 2024’ पुरस्कारात राज्यातील 7 खासदारांना संसदरत्न पुरस्काराने गौरव

  • संसदेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, श्रीरंग बारणे, वर्षा गायकवाड, नरेश मस्के, स्मिता वाघ (लोकसभा) व डॉ. मेधा कुलकर्णी (राज्यसभा) यांना ‘संसदरत्न 2024’ पुरस्कार मिळाला.
  • हे पुरस्कार संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
  • पुरस्काराचे हे १५वे वर्ष असून याची संकल्पना माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेतून २०१० मध्ये सुरू झाली.
  • पुरस्कारांची निवड माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली.
  • पुरस्काराचे निकष:
    • संसदीय उपस्थिती
    • प्रश्न विचारणे
    • चर्चेत सहभाग
    • विधेयकांवरील भूमिका
  • अन्य मानकरी खासदार – भर्तृहरी महताब, निशिकांत दुबे, विद्युत महतो, रवी किशन, पी. पी. चौधरी, दिलीप सैकिया, मदन राठोड, प्रवीण पटेल, सी. एन. अण्णादुराई, एन. के. प्रेमचंद्रन
  • वित्त व कृषी स्थायी समित्यांनाही पुरस्कार – अध्यक्ष अनुक्रमे भर्तृहरी महताब आणि चरणजितसिंग चन्नी

6) देशातील पहिली ‘एआय’ अंगणवाडी – नागपूर जिल्ह्यात!

  • नागपूरच्या वडधामना येथे देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अंगणवाडी सुरू करण्यात आली आहे.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो भवनात या अंगणवाडीचे लोकार्पण झाले.
  • AI चा वापर करून मुलांना बडबडगीते, चित्रकला, नृत्य शिकवले जाते.
  • व्हीआर सेटच्या माध्यमातून मुलांना आभासी शिकवणुकीचा अनुभव मिळतो, ज्यामुळे बौद्धिक व तार्किक विकास होतो.
  • प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीवर तंत्रज्ञानाद्वारे सतत लक्ष ठेवले जाते.
  • नागपूर जिल्हा परिषदेकडून पथदर्शी प्रकल्प म्हणून ही अंगणवाडी सुरू; पुढील टप्प्यात आणखी ४० अंगणवाड्या AI आधारित करण्याचा विचार.
  • भविष्यात जिल्हा परिषद शाळांमध्येही ‘AI शिक्षण’ देण्याचा जोर, अशी माहिती CEO विनायक महामुनी यांनी दिली.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment