Current Affairs | चालू घडामोडी | 18 JAN 2024
1) म. गो. रानडे यांची जयंती = 18 जानेवारी 1842
इंदुप्रकाश चे संपादक
- भारतीय सामाजिक परिषद मद्रास (1887) स्थापनेत पुढाकार
- विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापना (1865)
- वसंत व्याख्यानमाला सुरू केली
2) संविधानभान
श्रीमन नारायण अग्रवाल आणि संविधान
- एम. एन. रॉय यांनी जसे स्वतंत्र भारतासाठी संविधान लिहिले तसेच श्रीमन नारायण अग्रवाल यांनीही स्वतंत्र भारताकरता एक गांधीवादी संविधान लिहिले. १९४६ साली ते प्रकाशित झाले.
- श्रीमन नारायण अग्रवाल हे महात्मा गांधींचे अनुयायी होते. अर्थतज्ज्ञ होते. पहिल्या लोकसभेचे ते खासदार झाले. नागपूर विद्यापीठात अधिष्ठाता (डीन), गुजरातचे राज्यपाल अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.
- गांधींनी स्वत: या संविधानात काहीही लिहिले नसले, तरी या मसुद्याला गांधींची प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेत अग्रवाल यांच्या मांडणीला गांधींनी दुजोरा दिला आहे
- मूलभूत हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून ते सर्वांना मतदानाचा हक्क यांचा समावेश. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अगदी स्वसंरक्षणाकरता शस्त्र बाळगण्याचा हक्कही असला पाहिजे, असे या संविधानात लिहिले होते.
- शिक्षण हा अग्रवालांच्या आस्थेचा मुद्दा होता. त्यांनी गांधीजींच्या ‘नई तालीम’ या संकल्पनेशी सुसंगत असे पायाभूत शिक्षण घेण्याचा हक्क प्रत्येकाला असला पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन या संविधानात केले आहे.
- या संविधानाचे केंद्र होते गाव. ‘स्वयंपूर्ण खेडे’ ही संकल्पना गांधींनी अनेकदा मांडली होती. त्या आधारे अग्रवाल यांनी मांडणी केली होती.
- या संविधानात पंचायत राज व्यवस्थेवर भर होता. गावापासून केंद्राकडे असे सत्तेचे ऊर्ध्वगामी प्रारूप मांडले होते. ही सगळी रचना शंकूच्या आकाराची (पिरॅमिडल) आहे. त्यामुळे गावापासून केंद्र पातळीपर्यंत जाण्याचा रस्ता हे संविधान दाखवते.
- गाव पातळीवर प्रत्यक्ष निवडणूक तर तालुका आणि जिल्हा पातळीवर अप्रत्यक्ष निवडणुकांच्या माध्यमातून प्रतिनिधी निवडीची प्रक्रिया व्हावी, असेही त्यांनी सुचवले होते.
- भांडवलशाही आणि साम्यवाद या दोहोंना विरोध करत सत्तेच्या विकेंद्रीकरणातून अहिंसक लोकशाहीची प्रतिष्ठापना होऊ शकते, असे अतिशय मूलभूत विवेचन त्यांनी केले आहे.
- खेडे हे एकक मानून आर्थिक विकासाची एक पर्यायी दिशा दाखवण्याचा हा प्रयत्न होता.
- पं. नेहरू या मांडणीशी सहमत नव्हते. आधुनिक औद्याोगिक जगाची दिशा लक्षात घेता हे प्रारूप कितपत व्यवहार्य आहे, याविषयी ते साशंक होते.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही खेडे हे मुळातच जातीपातींचे डबके वाटत होते, त्यामुळे त्याला केंद्र मानून आर्थिक विकासाची दिशा निर्धारित करणे त्यांना नामंजूर होते.
- त्यामुळेच गांधीवादी तत्त्वांचा अंतर्भाव करण्याविषयी संविधान सभेत चर्चा सुरू झाली तेव्हा बाबासाहेबांनी गांधीवादी आर्थिक प्रारूपाला विरोध केला.
- या संविधानाने विकेंद्रीकरणाचे महत्त्व ध्यानात आणून दिले. पंचायत राज व्यवस्था लगेच लागू करता आली नसली तरी १९९३ पासून पंचायत राज व्यवस्थेतून झालेले बदल सर्वत्र अनुभवास येत आहेत. शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठीचा गांधीजींचा ‘अंत्योदयी’ रस्ता दाखवण्याचे काम या संविधानाने केले.
3) अंकीय, भौतिक, जैविक सीमा ओलांडणारी चौथी क्रांती
- हिला इंडस्ट्री ४.० नावानेही ओळखले जाते. क्लोस श्वाब या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या संस्थापक अध्यक्षाने हे नामकरण २०१६ साली केले.
- या क्रांतीत विविध तंत्रज्ञान शाखा एकेकट्या तसेच परस्पर सहकार्याने काम करतील. उदा.- अंकीय तंत्रज्ञान (यात आयसीटी अंतर्भूत आहे), कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्र-अध्ययन, रोबोटिक्स, मानव-यंत्र आंतरक्रिया, आभासी आणि आवर्धित वास्तव, थ्री-डी प्रिंटिंग किंवा समावेशक उत्पादन, अब्जांश तंत्रज्ञान, जैव-तंत्रज्ञान, पुंज गणन, वस्तूंचे आंतरजाल, अतिजलद संदेशवहन तंत्रज्ञान, महाविदा, संवेदक तंत्रज्ञान इत्यादी प्रगत शाखा यात सक्रिय आहेत.
- या क्रांतीत नाना प्रकारचे आणि मोठ्या प्रमाणावरील संवेदक, आयओटी इत्यादी मोठ्या प्रमाणावर विदा म्हणजे बिग डेटा निर्माण करतील आणि या महाविदेचे अध्ययन करून यंत्रमानव किंवा आधुनिक यंत्रे निर्णय घेऊन स्व-चलित (ऑटोनॉमस) रीतीने कार्य करतील.
- अशा स्व-चलित रीतीने काम करणाऱ्या बसगाड्या, ट्रक, मोटारगाड्या, बंदरांतील याऱ्या (क्रेन), कारखान्यांतील यंत्रे, साठवणकेंद्रांतील सामानाची हलवाहलव करणारे यंत्रमानव, अॅलेक्सा, सिरी यांच्यासारखे आभासी साहाय्यक, प्रथिनांची संरचना उलगडणारे, आपल्याला दिशादर्शन करणारे, तसेच आपल्या प्रश्नांची उत्तरे देणारी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अनेक अॅप्स, इत्यादी चतुर यंत्रणा आजच आपल्याला उपलब्ध आहेत
- या ज्ञानावर (नॉलेज) आधारित क्रांतीत आपण नक्की कोणत्या मुक्कामाला पोहोचू याचा अंदाज लावणे या घडीला तरी कठीण आहे.
4) ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बुधवारी पुरी येथील ८०० कोटी रुपयांच्या श्री जगन्नाथ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाचे उद्घाटन केले.
5) नवउद्यामींच्या पोषणांत गुजरात, कर्नाटक पुन्हा अव्वल
(स्टार्टअप रँकिंग, 2022)
- नाविन्यपूर्ण उपायांसह, अभिनव संकल्पनांवर आधारीत व्यवसाय उभारणाऱ्या नवउद्यामी अर्थात ‘स्टार्टअप्स’ना प्रोत्साहन आणि त्यांच्यासाठी पोषक वातावरण मिळवून देणाऱ्या राज्यांमध्ये गुजरात, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांनी सर्वोच्च कामगिरी
- त्यानंतरची दुसरी वर्गवारी, म्हणजे चांगली कामगिरी (Top Performer) करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान आणि तेलंगणा यांना वर्गीकृत करण्यात आले आहे.
6) इराणने मंगळवारी आपले शेजारी पाकिस्तान आणि इराकवर क्षेपणास्त्र हल्ले केले.
7) ‘असर’ चा १५ वा अहवाल
- ‘प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन’ने देशभर केलेल्या अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन (असर) या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर केले.
- शैक्षणिक प्रवाह, विद्यार्थ्यांचा शाखा निवडीसाठीचा कल याचीही पाहणी करण्यात आली असून कौशल्य विकास अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचे प्राधान्य नसल्याचे दिसते आहे.
- असर सर्वेक्षण नेमकं काय?
- Annual Status of Education Report (ASER)(असर)
- असर हा ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था आणि शालेय मुलांचं वाचन आणि अंकगणितातलं आकलन या विषयांवर देशपातळीवर घेण्यात येणारं हे एक वार्षिक सर्व्हेक्षण आहे.
- हे सर्व्हेक्षण ‘प्रथम’ या एनजीओकडून गेल्या 15 वर्षांपासून केलं जातं. यावर्षी हे सर्व्हेक्षण फोनच्या माध्यमातून घेण्यात आलं होतं. यात 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ग्रामीण भागांतील 52 हजार 227 घरांचा समावेश होता.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel