Current Affairs | चालू घडामोडी | 19 JAN 2024
1) 19 जानेवारी 1
- महाराणा प्रताप पुण्यतिथी = 19 जानेवारी 1597
- मेवाडचे राजे
- मुघलांविरुद्ध हल्दीघाटीचे युद्ध = 1576
- व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट रद्द = 19 जानेवारी 1882
- लॉर्ड रिपन द्वारे
2) राज्यसेवा 2022 परीक्षेत विनायक पाटील राज्यात प्रथम.
- धनंजय बांगर राज्यात दुसरा तर सौरभ गावंडे तिसरा
- मुलींमध्ये पूजा वंजारी राज्यात प्रथम
3) पाकिस्तानचे इराणवर प्रतिहल्ले.
- पश्चिम आशियातील संघर्ष पेटला
4) शालेय स्तरावर कोचिंग सेंटर बंद.
- केंद्र शासनाने इयत्ता दहावीच्या खाली किंवा सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग सेंटर मध्ये प्रवेश देण्यास मनाई केलेली आहे
- विद्यार्थी आत्महत्या, स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या तयारीच्या नावाखाली वाढलेली खाजगी शिकवण्यांची दुकानदारी आणि मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शिकवण्यांसाठीची नियमावली जाहीर केलेली आहे.
- नियमावली
- दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांनाच कोचिंग सेंटर मध्ये प्रवेश
- किमान पदवी उत्तीर्ण झालेले उमेदवारांची शिक्षक म्हणून नियुक्ती
- प्रत्येक कोचिंग सेंटर मध्ये समुपदेशाची नियुक्ती बंधनकारक
- नियमांचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा नोंदणी रद्द करण्याची कारवाई
- परीक्षेत अव्वल विद्यार्थी आपल्या सेंटरमध्ये शिकल्याचे फलक लावण्यास मज्जाव
- गुणवत्ता यादीत स्थानाचे आश्वासन देण्यास बंदी
- आठवड्याची सुट्टी तसेच सण उत्सवांच्या कालावधीत सुट्टी देणे आवश्यक
5) संजीवनी विद्यार्थी सुरक्षा योजना (2020) अर्थसाहाय्यात वाढ
- नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून संजीवनी योजना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी 2020 पासून राबवली जाते.
- संजीवनी योजनेअंतर्गत एखाद्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या पालकांना दोन लाख रुपयांची मदत दिली जाते.
- यात कमावत्या पालकाचा (आई-वडील) मृत्यू झाल्यास संबंधित विद्यार्थ्याला तेवढेच अर्थ सहाय्य देण्याचे निश्चित झाले.
6) संविधानभान
‘धर्मापलीकडे जाणारे संविधान’
- 1909 आणि 1919 च्या कायद्यात मुस्लिमांकरता स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद
- नेहरू अहवालामध्ये मुस्लिम लीगने स्वतंत्र मतदारसंघ नसल्याने त्याला कडाडून विरोध केला. यावेळी मोहम्मद अली जिना यांनी 14 मुद्दे असलेले निवेदन सादर केले
- या निवेदनामध्ये केंद्रीय कायदेमंडळात एक तृतीयांश मुस्लिम प्रतिनिधी असलेच पाहिजेत, मुस्लिमांकरिता स्वतंत्र मतदारसंघ हवेत तसेच सर्व धर्मसमूहांना स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद असली पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या केलेल्या होत्या.
- काँग्रेसने भारतीय समाजात फूट पाडणाऱ्या या मागण्यांना कडाडून विरोध केला
- 1946 च्या कॅबिनेट मिशनला मुस्लिम लीगने विरोध केला. संविधान निर्मिती प्रक्रियेतून काढता पाय घेत 16 ऑगस्ट 1946 हा ‘प्रत्यक्ष कृती दिवस’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आणि थेट हिंसेला आमंत्रण दिले.
- याचीच परिणीती म्हणून अखेरीस फाळणी झाली. मुस्लिम लीगचे सदस्यही संविधान सभेतून बाहेर पडले.
7) कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हर्बर्ट सायमन
- 1916 साली अमेरिकेत जन्म
- त्यांनी ‘ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर’ या त्यांच्या पुस्तकात निर्णय घेण्याची एक नवीन संकल्पनात्मक चौकट त्यांनी प्रस्तुत केली
- त्यामध्ये त्यांनी मानवी निर्णय प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी बंधनकारक तर्कशुद्धतेची संकल्पना मांडली. या प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी त्यांनी ‘सॅटिस्फाय’ (समाधान करणे) आणि ‘सफाईज’ (गरज भागवणे) या दोन शब्दांचा वापर करून ‘सॅटिस्फाइस’ ही संज्ञा तयार केली.
- हर्बर्ट सायमन आणि अॅलन नेवेल या दोघांनी मिळून लॉजिक थियरिस्ट (एलटी) हा पहिला यशस्वी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रोग्राम तयार केला.
- 1975 मध्ये बहुप्रतिष्ठित एएम ट्युरिंग पुरस्कार तसेच 1978 मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक सायमन यांना देण्यात आले.
8) महत्वाच्या कृषी विषयक संस्था
- नॅशनल इ्स्टिट्यूट ऑफ अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट
- माळेगाव (बारामती)
- सेंट्रल रिसर्च Rice इन्स्टिटयूट
- कटक
- Institute of Brackish water Aquaculture
- चेन्नई
- Institute of Freshwater Aquaculture
- भुवनेश्वर
- CIFE (Central Institute of Fisheries Education)
- मुंबई
- CIFT (Central Institute of Fisheries Technology)
- कोचीन
- Inland institute of Fisheries
- बराकपुर
- Marine institute of Fisheries
- कोचीन
- ICAR (Indian Council of Agriculture Research)
- दिल्ली
- 16 July 1929 स्थापना
- IARI (Indian Agriculture research institute)
- पुसा, दिल्ली
- IVRI (Indian Veterinary research institute)
- इझतनगर
- ICRISAT (International Crop Research Institute Semi Arid Tropics)
- हैदराबाद
- NBAGR (National bureau of Animal genetic resources)
- कर्नाल
- NBPGR (National bureau of Plant genetic resources)
- नवी दिल्ली
- CAZRI (Central Arid Zone Research Institute)
- जोधपूर
- CICR (Central Institute of Cotton Research)
- नागपूर
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel