पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षिका ‘मृणाल गांजाळे’ यांना प्रदान.
2) स्टेट ऑफ इंडियन बर्ड्स 2023’ अहवाल
25 ऑगस्ट 2023 रोजी अहवाल सादर.
भारतभरातील 30 हजारांहून अधिक पक्षीनिरीक्षक आणि संशोधनाकांच्या 30 पेक्षा अधिक दशलक्ष क्षेत्रीय निरीक्षणांवर हा अहवाल आधारित आहे.
महत्वाचे निरीक्षण
पक्ष्यांच्या चार प्रजातींच्या संख्येत 50 ते 80 टक्क्यांची घट झाल्याचा निष्कर्ष
माळढोक,तनमोर, या गवताळ प्रदेशातील पक्ष्यांच्या संख्येत मोठी घट.
पक्ष्यांच्या प्रजातीना धोका कशामुळे ?
सिंचन प्रकल्प, वाळू उत्खनन, वाहतूक,वाढलेला मानवी त्रास, घरगुती वापर, आणि कृषी व औद्योगिक प्रदूषण, तसेच या प्रदूषणाने होणारा नदीच्या परिसंस्थेचा ऱ्हास हे प्रमुख कारणे.
‘भारत’ हा जगातील चौथ्या क्रमांकाचा पवन उर्जेचा उत्पादक देश. ऊर्जेच्या पायाभूत सुविधांमुळे पक्ष्यांच्या अधिवासाना धोका.
3) जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा,बुडापेस्ट ( हंगेरी ) 2023
नीरज चोप्राने भालाफेकमध्ये 88.11 मी चा थ्रो करत सुवर्णपदक पटकावले.
जागतिक ॲथलेटिक्स मधील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे.
4*400 मीटर रिले मध्ये भारतीय चौकडी मूहम्मद अनस, अमोज जोकळ, मोहम्मद अजमल, राजेश रमेश, यांनी 2:59:05 ही वेळ नोंदवत आशियाई रेकॉर्ड आपल्या नावावर केला. अंतिम फेरीत त्यांना 5 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
‘पारूल चौधरी’ हिने महिलांच्या स्टीपलचेस इवेंटमधे राष्ट्रीय विक्रम मोडला. अंतिम फेरीत तिला 11 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.