चालू घडामोडी : 29 AUG 2023

*राष्ट्रीय क्रीडा दिन*

1) चंद्रयान 3 कडून तापमानचा पहिलं संदेश मिळाला.

  • इस्रो ने 27 ऑगस्ट रोजी चंद्रयान 3 ने जारी केलेला संदेश जाहीर केला.
  • चंद्रयान 3 च्या विक्रम लँडर मॉड्यूल वरील ‘चेस्ट’ पेलोडदवारे चंद्राच्या पृष्ठभागावरील तापमान फरकाचा आलेख इस्रो ने प्रसिद्ध केला.
  • ‘चेस्ट’ ( चंद्र सरफेस थरमोफिजिकल एक्सपरिमेंट ) याद्वारे हे मोजण्यात आले.

2) आनंदी समूह शाळा

  • आसपासच्या गावांतील कमी पटसंखेच्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा ( क्लस्टर ) सुरू करण्याची योजना ‘समग्र शिक्षा अभियानंतर्गत’ आखली जाते.
  • त्याचा पहिला प्रयोग पुण्यातील ‘पानशेत’ आणि नंदुरबारमधील ‘तोरणमल’ मध्ये शिक्षण विभागाकडून राबवण्यात आला आहे.

3) आदित्य L1 मिशन

  • इस्रो ची पहिली सौरमोहिम
  • प्रक्षेपण = 2 सप्टेंबर 2023
  • सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान असलेल्या ‘L1’ या बिंदुभोवती परिभ्रमण करून हे यान सूर्याचा अभ्यास करेल.
  • सूर्याच्या सर्वात वरील आवरणाचा म्हणजे कोरोंनाचा अभ्यास करण्यासाठी यानामध्ये सात विविध उपकरणे बसविण्यात आली आहेत.

सूर्याचा पृष्ठभाग 6000 अंश सेंटीग्रेडवर असताना कोरोनाचे तापमान सुमारे एक दशलक्ष  

अंशापर्यंत कसे पोहचले याची देखील माहिती मिळेल.

4 प्रमुख उद्दिष्ट

  • सूर्याच्या बाह्यपृष्ठाचे तापमान आणि सौरवादळांची स्थिति अभ्यासणे
  • सूर्यावरील वातावरणाचा तुलनात्मक अभ्यास करणे.
  • सौरवाऱ्यांची दिशा तापमानातील फरक अभ्यासणे.
  • सौरवादळांचा पृथ्वीवर होणारा परिणाम अभ्यासने.
L1 म्हणजे काय ?
  • अंतराळातील मोठे वस्तुमान असलेल्या दोन वस्तूंमध्ये ( तारे, ग्रह, उपग्रह, ) गुरुत्वाकर्षण असते.
  • या दोन वस्तूंमधील काही बिंदु असे असतात की तिथे दोन्हींचे गुरुत्वाकर्षण समतोल असते.
  • अशा बिंदुना ‘लँगरेंज पॉइंट’ म्हंटले जाते.
  • सूर्य व पृथ्वीमधील लँगरेंज पॉइंट ‘L-1’ हा बिंदु आहे.

4) शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार

  • जीवनगौरव पुरस्कार
  • 2019-20 = श्रीकांत वाड ( बॅडमिंटन संघटक )
  • 2020-21 = दिलीप वेंगुरकर ( माजी क्रिकेटपटू )
  • 2021-22 = आदिल सुमारीवला

5) राज्य क्रीडा दिन

  • खाशाबा जाधवांचा जन्मदिवस ’15 जानेवारी’ आता ‘राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जाणार.

Leave a Comment