Current Affairs | चालू घडामोडी | 03 JUN 2024
1) 3 जून 2024
1.1) माउंटबॅटन योजना घोषित = 3 जून 1947
- भारत आणि पाकिस्तान या 2 नवीन राष्ट्रांची निर्मितीची घोषणा
1.2) SNDT विद्यापीठाची स्थापना = 3 जून 1916
- भारतातील पहिले महिला विद्यापीठ
- संस्थापक = म. धो. के. कर्वे
- ठिकाण = मुंबई
2) पुणे येथे होणार साहिवाल गायीचे हब
- महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा राज्यातील पहिला उपक्रम
- हा देशातील चौथा तर महाराष्ट्रातील पहिलाच साहिवाल गायींचा प्रकल्प असेल
4) अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीमध्ये रालोआ (NDA) चीच सरशी
- अरुणाचल प्रदेशात ६० पैकी ४६ जागा मिळवून भाजपने एकतर्फी विजय मिळविला
- नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) पाच, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल पक्षाने दोन जागा जिंकल्या
- अरुणाचल प्रदेशात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस चे सुद्धा तीन उमेदवार विजयी झाले
- अरुणाचल प्रदेश मुख्यमंत्री = पेमा खांडू
- सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) पक्षाने ३२ पैकी ३१ जागा जिंकून निर्भेळ यश मिळविले.
- तेथे भाजपचे सर्व १२ आमदार पराभूत झाले असले, तरी निकालानंतर एसकेएमचे नेते व मुख्यमंत्री प्रेम सिंह तवांग यांनी आपण राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबरच (NDA) असल्याचे म्हटले आहे
- सिक्कीम : एकूण जागा ३२
- SKM = ३१ ● SDF = १
- २०१९ पर्यंत सलग २५ वर्षे सत्तेत राहिलेल्या सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटला (एसडीएफ) केवळ एकच जागा मिळाली.
- सिक्कीम मुख्यमंत्री = प्रेम सिंह तवांग
5) केवळ जातीचा उल्लेख ‘ॲट्रॉसिटी’ अंतर्गत गुन्हा नाही. उद्देश महत्त्वाचा असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे (नागपुर खंडपीठ) मत
- एखाद्या व्यक्तीने केवळ जातीचा उल्लेख केला तर तो ‘ॲट्रॉसिटी’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा ठरू शकत नाही. अपमानकारक पद्धतीने जातीचा उल्लेख केला असल्यास तो गुन्हा ठरतो.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel