Current Affairs | चालू घडामोडी | 30 JUN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 30 JUN 2024

1) संथाळ बंड = 30 जून 1855

  • स्थळ = राजमहाल टेकड्या (झारखंड)
  • नेते = कान्हो मूर्मु, सिद्धो मूर्मु

2) T – 20 world cup 2024

  • भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून T-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले आहे.
  • टीम इंडियाने दुसऱ्यांदा T-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे. या पूर्वी ही स्पर्धा टीम इंडियाने 2007 मध्ये जिंकली होती.

3) भारत ऑलिम्पिक संशोधन आणि शिक्षण केंद्र’चे उद्घाटन : गांधीनगर येथे

  • भारत ऑलिंपिक संशोधन आणि शिक्षण केंद्र (BCORE) चे 23 जून रोजी राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ, गांधीनगर, गुजरात येथे उद्घाटन करण्यात आले.
  • भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा : पीटी उषा

4) अर्थसंकल्पात ‘एसटी’ची झोळी रिकामीच

  • अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे व नवी मुंबई या महापालिकांच्या क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर २४ टक्क्यांवरून २१ टक्के प्रस्तावित केला आहे. 
  • मागील अर्थसंकल्पात स्थानकांचे नूतनीकरण, एलएनजीमध्ये गाड्या परावर्तित करणे, त्याचप्रमाणे विद्याुत वाहनांसाठी चार्जिंग सेंटर उभारणे व इतर बाबींसाठी एसटीकरिता साधारण २ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
  • शासनाने त्यापैकी फक्त ३९० कोटी रुपये एसटीला दिले. त्यामुळे एसटी महामंडळाची सातत्याने फसवणूक करण्यात येत आहे, असा आरोप महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

5) इराणमध्ये अध्यक्षपदासाठी फेरमतदान 

  • इराणमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये चारपैकी कोणत्याही एका उमेदवाराला आवश्यक किमान ५० टक्के मते न मिळाल्यामुळे तिथे पुन्हा एकदा आघाडीच्या दोन उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.
  • इराणमध्ये मंदावलेली अर्थव्यवस्था, राजकीय व सामाजिक अस्थैर्य, सततची निदर्शने आणि पश्चिम आशियामधील तणावाची स्थिती यामुळे त्रस्त झालेल्या मतदारांनी शुक्रवारी सुधारणावादी नेते मसूद पेझेश्कियाँ यांना सर्वाधिक तर सईद जलिली या कट्टर, पुराणमतवादी नेत्याला दुसऱ्या क्रमांकाची मते दिली.
  • या मतदानाच्या माध्यमातून इराणच्या जनतेने आपण नेते आणि व्यवस्थेला नाकारत असल्याचा संदेश दिला असल्याचे मत चॅथम हाऊसच्या पश्चिम आशिया व उत्तर आफ्रिकेच्या संचालक सनम वकील यांनी व्यक्त केले.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment