Current Affairs | चालू घडामोडी | 25 JULY 2024
1) 25 जुलै दिनविशेष
- कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याचा निर्णय = 25 जुलै 1917
- विधवा पुनर्विवाह कायदा अमलात = 25 जुलै 1856
2) महाराष्ट्रातील धुरंदर गाजवणार यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा
- प्रवीण जाधव -तिरंदाजी
- अविनाश साबळे -स्टीपलचेज
- सर्वेश कुशारे -उंच उडी
- चिराग शेट्टी -बॅडमिंटन
- स्वप्निल कुसळे- रायफल शूटिंग
3) बांगलादेश च्या मोंगला बंदर टर्मिनलवर आता भारताचा अधिकार
- हे बंदर धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे, कारण या बंद्राने बंगालच्या उपसागरात भारताला स्वतःचा विस्तार करण्यास मदत होईल
- बांगलादेशच्या मोंगला बंदरातील टर्मिनलचे अधिकार मिळवून भारताने मोठा विजय मिळवला आहे.
- हिंदी महासागरात चीनचा वाढता प्रभाव पाहता हा एक मोठा विजय मानला जात आहे.
- मोंगला बंदर हे बांगलादेशातील चितगाव बंदरानंतरचे सर्वात मोठे बंदर आहे.
- आतापर्यंत भारताला इराणमधील चाबहार, म्यानमारमधील सिटवे बंदरांचा अधिकार मिळाला आहे.
- आता या यादीत मोंगला बंदराचाही समावेश झाला आहे.
- हा प्रदेश भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक वाढीसाठी महत्त्वाचा आहे.
4) जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट 2024: सिंगापूर आघाडीवर
- भारत ८२व्या क्रमांकावर आहे
- सिंगापूरने हेनली पासपोर्ट इंडेक्सनुसार विक्रमी १९५ जागतिक स्थानांवर व्हिसा-मुक्त प्रवेश देत, जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून त्याचे शीर्षक पुन्हा मिळवले आहे.
5) मोदी 3.0 चा पहिला अर्थसंकल्प (2024-25) जाहीर
- सर्वाधिक सलग 7 वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या अर्थमंत्री = निर्मला सीतारामन
- सर्वाधिक अर्थसंकल्प = मोरारजी देसाई (10 वेळा)
6) रिलायन्स फाऊंडेशच्या संस्थापिका नीता अंबानी यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (IOC) सदस्यपद मिळाले आहे.
- पॅरिसमधील 142 व्या IOC अधिवेशनात नीता अंबानी यांची भारतातून IOC सदस्य म्हणून एकमताने पुन्हा निवड करण्यात आली.
- यापूर्वी २०१६ मध्ये त्यांना हा बहुमान मिळाला होता.
7) INS त्रिपुट लॉन्च
- ही युद्धनौका समुद्रात ताशी 59 किलोमीटर वेगाने जाऊ शकते.
- 24 जुलै रोजी, भारतीय नौदलाने गोव्यात नवीन युद्धनौका INS त्रिपुट लाँच करण्याची घोषणा केली.
- हे तलवार वर्ग फ्रिगेटचे 9 वे स्टेल्थ गाइडेड मिसाइल फ्रिगेट आहे.
- त्याचे बांधकाम 29 जानेवारी 2021 रोजी सुरू झाले.
- INS त्रिपुट ऑक्टोबर 2026 मध्ये नौदलात सामील होईल, तोपर्यंत त्याच्या चाचण्या घेतल्या जातील.
- या जहाजाचे समुद्र वजण 3850 टन आहे.
8) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन
- ‘नाही मी एकला’ हे त्यांचे आत्मकथन
- जानेवारी 2020 मध्ये धाराशीव (उस्मानाबाद) येथे पार पडलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिब्रिटो अध्यक्ष होते.
- दिब्रिटो 1983 ते 2007 या कालावधीत ‘सुवार्ता’ या प्रामुख्याने मराठी कॅथलिक समाजाशी संबंधित असलेल्या वार्तापत्राचे मुख्य संपादक होते.
- ‘हरित वसई संरक्षण समिती’च्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली.
- वसईतील ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण’ यांच्या विरोधातही त्यांनी पुढाकार घेतला आणि मोठी मोहीम राबवली.
- संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची हे पुस्तक लिहिण्यासाठी दिब्रिटो यांनी बराच काळ इस्रायलमध्ये राहून संशोधन केलं होतं.
9) नवीन कर रचना
- नव्या कर प्रणालीत (Income Tax) स्टँडर्ड डिडक्शन हे 50 हजारांवरुन 75 हजार करण्यात आलं आहे.
- 3 लाखापर्यंतच्या उत्पनावर कुठलाही कर लागणार नाही.
- नवी करप्रणाली कशी असेल? (वार्षिक उत्पन्नानुसार)
- १५ लाखांपेक्षा अधिक- ३० टक्के कर
- ०-३ लाख- कुठला कर नाही
- ३-७ लाख – ५ टक्के
- ७-१० लाख – १० टक्के
- १०-१२ लाख – १५ टक्के
- १२-१५ लाख- २० टक्के
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel