Current Affairs | चालू घडामोडी | 28 SEPT 2024
अनुक्रमणिका
1) 28 सप्टेंबर दिनविशेष
1.1) 28 सप्टेंबर 1907 = भगतसिंग जयंती
- क्रांतिकारी कार्य= साँडर्स हत्या (1928), केंद्रीय विधिमंडळात बॉम्ब फेकला (1929)
1.2) 28 सप्टेंबर 2003 = 89 वी घटनादुरुस्ती
- राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे विभाजन
- नवीन कलम = 338A समाविष्ट
2) रत्नागिरीतील कर्दे ठरले सर्वोत्कृष्ट कृषी पर्यटन गाव
- महाराष्ट्रातील रत्नागिरी मधील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे.
- भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली होती.
- रत्नागिरीच्या किनारपट्टीवर वसलेले कर्दे हे गाव स्वच्छ समुद्रकिनारे, पांढरी वाळू आणि नयनरम्य परिसर यामुळे पर्यटकांना आकर्षित करत आहे. • 2023 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेचा उद्देश ग्रामीण पर्यटनाला चालना देणे आणि त्यांच्या भागातील पर्यटनाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या गावांच्या प्रयत्नांना मान्यता देणे हा आहे.
3) भारत जगातील तिसरा शक्तिशाली देश
- जपानला टाकले मागे
- आशियातील शक्तिशाली देशांच्या निर्देशांकात (एशिया पॉवर इंडेक्स) भारताने जपानला मागे टाकत तिसरे स्थान पटकाविले.
- केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने ही माहिती दिली.
- भारताच्या वाढत्या विकास दराबाबत ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूट या संस्थेने 27 देशांच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना या क्रमवारीमध्ये भारत ही तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असल्याचे वर्णन केले आहे.
- 27 देश आणि प्रदेशांचा समावेश
- कोरोना साथीनंतर भारताने केलेली आर्थिक सुधारणा उल्लेखनीय
- आर्थिक क्षमतेच्या आधारे निर्देशांकात 4.2 गुणांनी वाढ
- पहिले 5 शक्तिशाली देश आणि गुण (2024 मधील)
- 81.7 अमेरिका
- 72.7 चीन
- 39.9 भारत
- 38.9 जपान
- 31.9 ऑस्ट्रेलिया
4) ब्रिटनचाही भारताला पाठिंबा : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व
- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे यासाठी ब्रिटननेही पाठिंबा दिला आहे.
- अमेरिका, फ्रान्स या देशांनी यापूर्वीच पाठिंबा दिला आहे.
- भारताला सदस्यत्व मिळाल्यास ही अधिक प्रातिनिधिक संस्था बनेल, असे ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी सांगितले.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel