Current Affairs | चालू घडामोडी | 06 FEB 2026

Current Affairs | चालू घडामोडी | 06 FEB 2026

1) ६ फेब्रुवारी दिनविशेष

१.१) काश्मीर संविधान सभेचा ठराव = ६ फेब्रुवारी १९५४

  • ठराव = भारतात विलीनीकरणास व दिल्ली कराराला मान्यता
  • कलम ३७०

१.२) संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना = ६ फेब्रुवारी १९५६

  • ठिकाण = पुणे
  • पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखालील सभेत या समितीची स्थापना
  • समिती अध्यक्ष = श्रीपाद अमृत डांगे

१.३) १९३१: भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित मोतीलाल गंगाधर नेहरू यांचे निधन

१.४) २०२२: भारतीय जगप्रसिद्ध पार्श्वगायिका – भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट, दादासाहेब फाळके पुरस्कार – लता मंगेशकर यांचे निधन

१.५) ६ फेब्रुवारी १८९० = खान अब्दुल गफारखान यांचा जन्म

त्यांना ‘सरहद्द गांधी’ म्हणूनही ओळखले जाते आणि ते अहिंसक स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचे नेते होते.

2) ‘चक्र सेंटर ऑफ एक्सलन्स’

  • नाव -CHAKRA – Centre of Excellence
  • SBI ने सुरू केलं आहे
  • सुरवात दिनांक – 31 जानेवारी 2026
  • ठिकाण – मुंबई
  • उद्घाटन – एम. नागराजू (DFS सचिव, भारत सरकार)
  • उद्देश – भारतातील सनराइज सेक्टर्स (उदयोन्मुख क्षेत्रे) साठी फायनान्सिंगला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आले आहे
  • CHAKRA हे खालील 8 क्षेत्रांना फायनान्सिंगमध्ये मदत करेल
  • गुंतवणूक लक्ष्य – 2030 पर्यंत ₹100 लाख कोटी+ (5 वर्षांत ₹20-22 ट्रिलियन कर्ज संधी)

3) थायलंड मास्टर्स 2026 – BWF सुपर 300

  • स्पर्धा नाव – Princess Sirivannavari Thailand Masters 2026
  • महिला एकेरी विजेती – देविका सिहाग (हरियाणा, भारत)
  • महिला एकेरी उपविजेती – गोह जिन वेई (मलेशिया,
  • खेळ – बॅडमिंटन
  • स्पर्धा ठिकाण – थायलंड
  • स्पर्धा तारखा –  27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026
  • फायनल – 1  फेब्रुवारी 2026
  • देविका सिहाग ने आपली पहिली Super 300 ही BWF World Tour स्पर्धा जिंकली.
  • देविका Super 300 स्तरावर महिला एकेरी जिंकणारी तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे.
    • पहिली –  सायना नेहवाल
    • दुसरी –  पी. व्ही. सिंधू
    • पुरुष एकेरी विजेता – मोह. झकी उबैदिल्लाह (इंडोनेशिया)

4) ‘अग्नि परीक्षा’ संयुक्त प्रशिक्षण सराव

  • आयोजन- भारतीय सेना आणि भारत-तिब्बत सीमा पुलिस (ITBP)
  • ठिकाण – अरुणाचल प्रदेश
  • उद्देश – गैर-तोफखाना सैनिकांना (इन्फंट्री आणि ITBP जवान) तोफखाना प्रक्रिया, समन्वय यंत्रणा आणि फायरिंग मिशन कसे चालवावे हे शिकवणे.
  • अश्या प्रकारचा हा पहिला सराव आहे

5) खंजर – संयुक्त लष्करी सराव

  • सहभागी देश – भारत आणि किर्गिस्तान
  • नाव – Exercise KHANJAR
  • आवृत्ती – 13 वी , आसाम
  • मागील आवृत्ती – 12 वी ( मार्च 2025 मध्ये) किर्गिस्तानमध्ये झाली होती.
  • कालावधी – 4 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी  (14 दिवसांचा सराव)
  • दोन्ही देशांच्या Special Forces मधील interoperability (एकत्र काम करण्याची क्षमता) वाढवणे
  • खंजर सरावाबद्दल माहिती
    • सुरवात – 2011 पासून
    • आयोजन – दरवर्षी
    • ठिकाण – दोन्ही देशांमध्ये आलटून पालटून होते

6) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट रद्द केली आहे.

  • दिनांक – 4 फेब्रुवारी 2026
  • राष्ट्रपती राजवट लागू – गेल्या वर्षी 13 फेब्रुवारी 2025 रोजी
  • मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
  • राष्ट्रपती राजवट कलम – कलम 356 नुसार लावली होती
  • मणिपूरमध्ये 11 वी राष्ट्रपती राजवट होती
  • युमनाम खेमचंद यांनी मणिपूरचे १३वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
  • विशेष बाब म्हणजे मैतई समाजाचे मुख्यमंत्री, तर नागा समाजातून लोसी आणि कुकी समाजातून नेमचा यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • ३५६ दिवसांनंतर मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली असून, राज्यात लोकशाही मार्गाने सत्तास्थापना झाली आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment