1) महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
लोकसभेमध्ये आणि राज्यांतील विधानसभांमध्ये 33% महिला आरक्षणाच्या विधेयकाला केंद्रिय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
2010 मध्ये UPA सरकारने हे विधेयक त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपच्या पाठिंब्याने राज्यसभेत मंजूर केले होते. परंतु त्यावेळी लोकसभेत हे मांडण्यात आले नाही.
राज्यसभेत मंजूर झाल्याने हे विधेयक संसदेत कायम राहणार असून आता ते लोकसभेत मांडले जाईल.
महिला आरक्षण लागू झाल्यास – लोकसभा 543 जागांपैकी 181 जागा महिलांच्या असतील तर महाराष्ट्र विधानसभेत 288 जागांपैकी 96 जागा महिलांच्या असतील.
याअगोदर देवेगौडा सरकार, वाजपेयी सरकार यांनी विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही.
सध्या लोकसभेत 78 महिला खासदार असून हे प्रमाण लोकसभेच्या एकूण संख्याबळाच्या 15 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. राज्यसभेत तर फक्त 14% प्रमाण आहे.
महाराष्ट्रासह अनेक राज्यांत महिला आमदारांचे प्रमाण 10% पेक्षा कमी आहे.
सध्या स्थानिक स्वराज संस्थामध्ये 33% आरक्षण लागू आहे. हा निर्णय राजीव गांधी सरकारने घेतला होता.
2) आजपासून (19 सप्टेंबर 2023) गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नवीन संसदेमध्ये कामकाज चालणार.
जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताच्या लोकशाहीचे मंदिर म्हणजे संसद भवन. सध्याची संसद भवनाची इमारत 100 वर्ष जुनी असल्याने याच इमारती जवळ संसद भवनाची नवी इमारत बनवण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 28 मे 2023 रोजी याचे उद्घाटन झाले.
18 सप्टेंबरपासूनच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली असून दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थीच्या मंगल दिवशी संसदेच्या नव्या वास्तूत कामकाजाचा श्रीगणेशा होणार आहे.
नवीन संसदेत आसन क्षमता
राज्यसभा = 384 (अगोदर 245)
लोकसभा = 888 (अगोदर 545)
नवीन संसद भवन टाटा समूहाच्या ‘टाटा प्रोजेक्ट लिमिटेड’ या भारतीय कंपनीने बांधले आहे.
या इमारतीचे मुख्य वास्तुविशारद = बिमल पटेल (बिमल पटेलांना 2019 मध्ये स्थापत्यशास्त्रासाठी पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे.)
3) ‘अमृता शेरगिल’ यांनी रेखाटलेल्या तैलचित्राला 61.8 कोटी इतके विक्रमी मूल्य मिळाले.
अमृता शेरगिल यांच्या ‘द स्टोरी टेलर’ या तैलचित्राला ‘सॅफ्रॉनआर्ट’ च्या लिलावामध्ये 61.8 कोटी रुपये मिळाले.
शेरगिल यांनी 1938 मध्ये हे चित्र रेखाटले आहे.
या चित्राला मिळालेली ही किंमत कोणत्याही भारतीय कलाकाराच्या कलाकृतीला जगभरात मिळालेली सर्वोच किंमत आहे.
4) भाजप व AIDMK यांची युती संपुष्टात.
5) ‘होयसळ मंदिरांना’ जागतिक वारसा स्थळात स्थान.
कर्नाटकातील बेलूर, हळेबीड आणि सोमनाथपुरा येथील प्रसिद्ध होयसळकालीन मंदिरांना ‘यूनेस्कोने’ वारसास्थळ म्हणून घोषित केले.
भारतातील हे 42 वे वारसास्थळ असून कर्नाटकातील चौथे वारसास्थळ आहे.