Current Affairs | चालू घडामोडी | 01 JULY 2025

Current Affairs | चालू घडामोडी | 01 JULY 2025

1 जुलै

  • महाराष्ट्र कृषी दिन – 1 जुलै
    • महाराष्ट्रात 1 जुलै रोजी “कृषी दिन” म्हणून साजरी केली जाते.
      हा दिवस माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो.
    • वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते होते.
    • त्यांनी हरित क्रांतीत मोलाची भूमिका बजावली आणि कृषी धोरणात क्रांतिकारी बदल घडवले.
    • या दिवशी शेतकऱ्यांच्या समस्या, कृषी विकास, आधुनिक शेतीतंत्रज्ञान यावर विविध उपक्रम राबवले जातात.
  • राष्ट्रीय डॉक्टर दिन – 1 जुलै
    • 1 जुलै रोजी भारतभर राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो.
    • हा दिवस डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ पाळला जातो. ते एक नामांकित डॉक्टर, स्वातंत्र्यसैनिक आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री होते.
  • राष्ट्रीय GST दिन – 1 जुलै
    • 1 जुलै 2017 रोजी भारतात वस्तू आणि सेवा कर (GST) लागू झाला, आणि म्हणून हा दिवस राष्ट्रीय GST दिन म्हणून ओळखला जातो.
    • GST हा ‘एक राष्ट्र, एक कर’ या तत्त्वावर आधारित करप्रणाली आहे.
    • यामुळे अप्रत्यक्ष करांची गुंतागुंत कमी झाली आणि कर व्यवस्थेत पारदर्शकता आली

2) देशातील पहिल्या ई-ट्रॅक्टरची नोंदणी – ठाणे (2025) – शाश्वत शेतीकडे एक मोठं पाऊल!

  • पहिला ई-ट्रॅक्टर:
    • AutoNext कंपनीने भारतात पहिला ई-ट्रॅक्टर बाजारात आणला
    • पहिली अधिकृत नोंदणी – ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात
  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन:
    • ई-ट्रॅक्टर पर्यावरणपूरक व खर्चवाचक
    • कृषी क्षेत्रात क्रांतीकारी बदल घडवणारा
    • 2030 पर्यंत 20-30% वाहने विजेवर असावीत – शासनाचे उद्दिष्ट
  • शासनाच्या महत्त्वाच्या योजना:
    • यावर मिळणार टोल माफी
    • ई-ट्रॅक्टर खरेदीवर थेट अनुदान (₹1.5 लाखांपर्यंत)
    • बिनव्याजी कर्ज – अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळामार्फत
  • फायदे:
    • डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत देखभाल खर्च जवळजवळ शून्य
    • 1 एकर नांगरणीसाठी खर्च फक्त ₹300
    • हा उपक्रम शेतीला स्वच्छ, स्मार्ट व टिकाऊ बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरतो.

3) पराग जैन – नवीन RAW प्रमुख (2025)

  • पूर्व अधिकारी: 1990 बॅचचे IPS अधिकारी (AGMUT कॅडर)
  • पूर्वीचे पद: विशेष सचिव, कॅबिनेट सचिवालय
  • पूर्व RAW प्रमुख: समंत गोयल (2019–2024) – यांची मुदत पूर्ण
  • 2024 – 25 = रवी सिन्हा
    • पराग जैन यांच्याकडे आंतरराष्ट्रीय गुप्तचर, राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक विश्लेषण याचा अनुभव आहे.
    • देशाच्या बाह्य सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली आहे.
  • RAW – Research and Analysis Wing
    • स्थापना: 21 सप्टेंबर 1968
    • स्थापक: इंदिरा गांधी सरकारने Intelligence Bureau (IB) पासून स्वतंत्र केले
    • मुख्यालय: नवी दिल्ली
  • कार्य:
    • परदेशी गुप्तचर माहिती संकलन
    • आंतरराष्ट्रीय धोरण विश्लेषण
    • सीमावर्ती सुरक्षा
    • अतिरेकी कारवायांवर नजर ठेवणे
    • भारताचे परराष्ट्रीय हित जपणे
  • Motto of RAW = “धर्मो रक्षति रक्षितः”
  • RAW हे केवळ गुप्तचर संस्था नसून, भारताच्या संरक्षण व सामरिक धोरणांचे मूक रक्षणकर्ते आहेत

4) पाकिस्तान-चीनकडून नवीन प्रादेशिक गटाची तयारी!

  • ‘सार्क’ निष्क्रिय झाल्यानंतर पाकिस्तान आणि चीन नव्या प्रादेशिक राष्ट्रगटाची स्थापना करण्याच्या हालचालीत.
  • चीनमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश यांच्यात नव्या गटासंदर्भात चर्चा सुरू.
  • उद्दिष्ट – सार्कमधील इतर देशांनाही नव्या गटात सहभागी करून घेणे.
  • सार्क (SAARC) – थोडक्यात ओळख
    • पूर्ण रूप: South Asian Association for Regional Cooperation (दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना)
    • स्थापना: 8 डिसेंबर 1985, ढाका (बांगलादेश)
    • मुख्यालय: काठमांडू, नेपाळ
  • सदस्य देश:
    • भारत
    • पाकिस्तान
    • नेपाळ
    • भूतान
    • बांगलादेश
    • श्रीलंका
    • मालदीव
    • अफगाणिस्तान
  • सध्याची स्थिती:
    • २०१४ नंतर कोणतीही शिखर परिषद झालेली नाही
    • २०१६ मधील उरी हल्ल्यामुळे इस्लामाबाद परिषद रद्द
    • भारतासह अनेक देशांचा सहभाग नकार
  • त्यामुळेच आता पाकिस्तान-चीनकडून नव्या प्रादेशिक गटाची हालचाल!

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment