Current Affairs | चालू घडामोडी | 01 MAY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 01 MAY 2024

1) 1 मे 2024

1.1) महाराष्ट्र दिन

 • महाराष्ट्र राज्य स्थापन = 1 मे 1960
 • 18 वे राज्य
 • एकुण हुतात्मे = 105

1.2) आंतरराष्ट्रीय कामगार दिन

 • शिकागो कामगार संप = 1 मे 1886

2) आजपासून जन्मनाऱ्या बालकांच्या सर्व कागपत्रांच्या वरती आईचे नाव पहिला नंतर वडिलांचे

 • “1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांना” आता आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि नंतर आडनाव अशा स्वरूपात नोंदणी करणे बंधनकार

3) पर्यावरण संस्थांचाही ‘ग्रीन क्रेडिट योजने’ला विरोध

 • केंद्र सरकारची ‘ग्रीन क्रेडिट योजना’ जंगलतोडीस प्रोत्साहन देणारी आणि वननिवासी समुदायांचे हक्क पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करणारी आहे, असा आरोप सुमारे शंभरहून अधिक पर्यावरण संस्थांनी केला आहे.
 • योजना काय ?
  • ऑक्टोबर 2023 मध्ये केंद्र सरकारने ‘ग्रीन क्रेडिट योजना’ सुरू केली.
  • ही एक बाजार आधारित यंत्रणा असून व्यक्ती, समुदाय आणि खासगी क्षेत्राद्वारे विविध स्वयंसेवी पर्यावरणीय कृतींना पुरस्कृत करते.
  • कोणतीही वैयक्तिक किंवा खासगी संस्था आता खुले जंगल, झुडपी जमीन, पडिक जमीन आणि पाणलोट क्षेत्रासह निकृष्ट जमिनीवर वृक्षारोपण करू शकते आणि ग्रीन क्रेडिट मिळवू शकते, असे ‘ग्रीन क्रेडिट योजने’च्या नियमांमध्ये म्हटले आहे.
  • या वृक्षलागवडीनंतर ते ‘ग्रीन क्रेडिट’ मिळवू शकतात. तसेच ही लागवड व्यापारी तत्त्वावर केली जाऊ शकते आणि सामाजिक जबाबदारीसाठी म्हणून काम करू शकते, असे २२ फेब्रुवारीच्या अधिसूचनेत म्हटले आहे.

4) कोविशिल्ड लशीचे अतिदुर्मीळ दुष्परिणाम!

 • कोविड लस निर्माती कंपनी ॲस्ट्राझेनेकाची ब्रिटनच्या न्यायालयात कबुली
 • कोविड-१९पासून संरक्षण करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहयोगाने विकसित केलेल्या लशीमुळे अतिशय दुर्मीळ प्रकरणांमध्ये ‘थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमसह थ्रोम्बोसिस’ (टीटीएस) होऊ शकतो असे लंडन हायकोर्टामध्ये सादर करण्यात आलेल्या कायदेशीर दस्तऐवजामध्ये ॲस्ट्राझेनेकाने कबूल केले आहे.
 • ॲस्ट्राझेनेकाने ऑक्सफर्ड विद्यापीठाबरोबरच भारतामधील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’बरोबरही लस विकसित केली होती. ब्रिटनमध्ये ही लस अॅस्ट्राझेनेका ‘वॅक्सझेव्हरिया’ या नावाने तर भारतात ‘कोविशिल्ड’ या नावाने ओळखली गेली.

5) अडथळ्यांमुळे सूर्यकिरणांच्या तीव्रतेत घट, हवामानशास्त्रज्ञांचे संशोधन

 • एकीकडे जगभरातील तापमान वाढत असताना, उन्हाच्या झळा तीव्र होत असताना देशभरात पडणाऱ्या सूर्यकिरणांची तीव्रता हळूहळू कमी होत असल्याचे गंभीर निरीक्षण हवामानशास्त्रज्ञांनी मांडले आहे.
 • त्यासाठी १९८५ ते २०१९ या काळातील माहितीचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार देशभरात पडणाऱ्या सूर्यकिरणांची तीव्रता हळूहळू कमी होत आहे.
 • कारणे काय ?
  • कार्बनडाय ऑक्साईड, मिथेन वायूच्या उत्सर्जनाचे प्रमाण वाढले आहे.
  • देशभरात रस्ते, उड्डाणपुलांसह विविध प्रकारच्या बांधकामांमुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे.
  • हवामान बदलांमुळे वर्षभरातील पावसाचे, ढगाळ हवामानाचे दिवसही वाढले आहेत.
  • परिणामी सूर्यकिरणे थेट जमिनीवर पडण्यात अडथळे वाढून सूर्यकिरणांची तीव्रता कमी झाल्याचे निरीक्षण
 • सौरऊर्जेवर होणार परिणाम
  • हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर औष्णिक ऊर्जा निर्मिती कमी करून अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला चालना देण्याचे केंद्र सरकारचे धोरण
  • देशात २०३० पर्यंत २८० गिगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट्य

6) ट्वेन्टी२० विश्वचषक, 2024 साठी भारतीय संघ जाहीर

 • ट्वेन्टी२० विश्वचषकासाठी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान.

 • स्पर्धा = जून महिन्यात वेस्ट इंडीज आणि अमेरिका येथे
  • क्रिकेट विश्वचषक स्पर्धा पहिल्यांदाच अमेरिकेत भरवण्यात येत आहे

7) देशात सर्वात श्रीमंत उमेदवार ‘तेलगू देसम’चा

 • गुंटूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पेम्मासानी चंद्रशेखर यांच्याकडे 5785 कोटींची संपत्ती.
 • आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभा मतदार संघातून तेलुगू देसम पक्षाकडून ते निवडणूक लढवत आहेत.

8) भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर : संयुक्त राष्ट्राचा अहवाल

 • आकडे
  • ४ टक्के लोकसंख्या ० ते १४ वर्षे वयोगटातील आहे.
  • १५-६४ वर्षांची संख्या सर्वाधिक ६४ टक्के आहे.
  • ७१ वर्षे देशातील पुरुषांचे सरासरी वय आहे.
  • ७४ वर्षे महिलांचे सरासरी वय आहे.
  • २००६-२०२३ दरम्यान २३ टक्क्यांनी बालविवाहांचे प्रमाण कमी झाले आहे.
  • ८ टक्के (जगापैकी) प्रसूतीदरम्यानचे मृत्यू भारतात होतात. प्रसूतीदरम्यान मृत्यूचे प्रमाण भारतात घटलेले आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment