Current Affairs | चालू घडामोडी | 01 SEPT 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 01 SEPT 2024

1) 1 सप्टेंबर दिनविशेष

1.1) 1 सप्टेंबर 1961 = NCERT ची स्थापना

  • राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
  • पूर्वीच्या सात संस्थांचे एकत्रीकरण
  • मुख्यालय = दिल्ली

1.2) 1 सप्टेंबर 1956 = LIC ची स्थापना

2) पॅरालिम्पिक कांस्य पदक

  • रुबिना फ्रान्सिस
  • शूटिंग
  • महिला 10 मी एअर पिस्तूल SH1

3) रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2024

  1. द रुरल डॉक्टर्स मूव्हमेंट :- थायलंड (डॉक्टरांचा गट)
  2. फरविजा फरहान :- इंडोनेशिया
  3. मियाझाकी हायाओ :- जपान (ॲनिमेटर)
  4. गुयेन थी न्गोक फुओंग :- व्हिएतनाम (डॉक्टर)
  5. कर्मा फुंटशो :- भूतान
  6. फिलिपीन्सची राजधानी मनिला येथे 16 नोव्हेंबर रोजी या पुरस्काराचा वितरण सोहळा होणार आहे.

4) भारताची दुसरी आण्विक पाणबुडी INS ‘अरिघात’ नौदलात समाविष्ट

  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते एका शानदार कार्यक्रमात भारताची दुसरी आण्विक पाणबुडी आयएनएस ‘अरिघात’ नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली.
  • या पाणबुड्यांद्वारे शत्रू देशांवर आण्विक क्षेपणास्त्रे डागता येतात. 
  • बांधणी : विशाखपट्टणम येथे
  • 750 किमी पल्ल्याच्या S- 15 क्षेपणास्त्रांनी सुसज्ज
  • अरिघात : S-3 हे नाव
  • पाणबुडी वजन : 6000 टन
  • पहिली आण्विक पाणबुडी : INS अरिहंत (2009 मध्ये लॉन्च केले 2016 साली नौदल मध्ये सामील केले)
  • अरिघात म्हणजे : शत्रू चा नायनाट करणारे
  • भारत आता जगातील सहावा आण्विक पाणबुडीधारक देश बनला आहे.
  • आण्विक पाणबुडी असलेले 6 देश : भारत अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन

5) भारतीय अब्जाधिशांच्या संख्येत वाढ, तर चीनच्या घट

  • अंबानी यांना मागे टाकत अदानी अव्वल स्थानी
  • चौथ्या स्थानावरून थेट पहिल्या क्रमांकावर अदानी यांनी झेप घेतल्याचे हुरून इंडिया रिच लिस्टच्या अहवाल नमूद करण्यात आले आहे.
  • जगातील श्रीमंताच्या यादीत भारतातील अब्जाधिशांमध्ये २९ टक्क्यांनी वाढ झाली असून, चीनमध्ये अब्जाधिशांमध्ये २५ टक्क्यांनी घट झाली आहे.
  • हरुन इंडिया रिच लिस्ट अहवाल 2024, ठळक वैशिष्ट्ये
    • भारतात सर्वाधिक अब्जाधीश मुंबईत रहातात(92)
    • शाहरुख खानने पहिल्यांदाच या यादीत स्थान
    • राधा वेम्बू (झोहो) महिलांमध्ये पहिल्या 47,500 कोटी
    • झेप्टोचे संस्थापक कैवल्य वोहरा सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत सर्वात तरुण आहे.
  • भारतातील पाहिले 5 श्रीमंत लोक ( कोटीमध्ये संपत्ती)
    • गौतम अदानी (अदानी)
    • मुकेश अंबानी : (रिलायन्स)
    • शिव नाडर : (HCL)
    • सायरस पुनवला : (सिरम इन्स्टिट्यूट)
    • दिलीप सिंघवी : (सन फार्मा)

6) शिवपुतळ्यासाठी 2 समित्या स्थापन

  • मालवण तालुक्यातील राजकोट किल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी चौकशीसाठी नौदलाचे कमोडोर पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
    • तर शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच ठिकाणी पुन्हा उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती स्थापन करण्यात आली आहे.

7) मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा दोन

  • कालावधी = 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2024
    • 5 सप्टेंबर पासून मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू
  • रोख पारितोषिके
    • तालुका जिल्हा विभाग व राज्यस्तरावर शासकीय शाळा व अन्य शाळा या दोन वर्गवारी करता स्वतंत्र पारितोषिके
    • पारितोषिकांची एकूण रक्कम रु. 73.82 कोटी
  • अभियानाची उद्दिष्टे
    • शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य स्वच्छता पर्यावरण क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे.
    • शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे
    • शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण अशा शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीला प्रोत्साहन देणे

8) राज्यातील महिलांसाठी ‘हर घर दुर्गा अभियान’

  • राज्यातील प्रत्येक शासकीय औद्याोगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) ‘हर घर दुर्गा अभियान’ राबविण्यात येणार आहे.
    • या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना वर्षभर आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
  • शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षणाच्या खास तासिकेप्रमाणेच मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणसासाठी राखीव तासिका असावी, यासाठी राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला होता.

9) सातवा राष्ट्रीय पोषण महिना =1 ते 30 सप्टेंबर 2024

  • सहा प्रमुख मुद्दे
    1. Technology for better Governance
    2. ॲनिमिया
    3. पोषण भी, पढाई भी
    4. एक पेड मा के नाम
    5. Growth Monitoring
    6. Complementary Feeding

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment