Current Affairs | चालू घडामोडी | 02 JULY 2025

Current Affairs | चालू घडामोडी | 02 JULY 2025

1) २ जुलै १९७२ – शिमला करार

  • महत्त्वाची घटना : भारत आणि पाकिस्तान यांच्यात शिमला करारावर स्वाक्षरी
  • स्वाक्षरी करणारे नेते :
    • भारताची पंतप्रधान इंदिरा गांधी
    • पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख झुल्फिकार अली भुट्टो
  • मुख्य ठळक बाबी :
    • १९७१ च्या भारत-पाक युद्धानंतरचा शांतता करार
  • Ceasefire Line चे नाव बदलून Line of Control (LoC) करण्यात आले
  • वाद मिटवण्यासाठी दोन्ही देशांनी द्विपक्षीय वाटाघाटींचा मार्ग स्वीकारला
  • 🇮🇳➡️🇵🇰 या करारामुळे भारत-पाक संबंध सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

2) राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेशकुमार

  • राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान मिळालेल्या सुजाता सौनिक सेवानिवृत्त होत आहेत
  • ज्येष्ठतेचा निकष पाळून राजेशकुमार यांना तीन महिन्यांसाठी मुख्य सचिवपदाची संधी देण्यात येणार आहे.
  • या पदासाठी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आय. एस. चहल, तसेच भूषण गगराणी यांचेही नाव चर्चेत होते. राजेशकुमार निवृत्त झाल्यानंतर या दोन अधिकाऱ्यांमध्ये मुख्य सचिवपदासाठी स्पर्धा असेल.

3) INS तमाल

  • रशियाने भारतीय नौदलासाठी तयार केलेली युद्धनौका तमाल कालिनिनग्राड येथे दाखल होणार आहे.
  • INS Tamal – भारतीय नौदलाचे जलद आघाडीचे जहाज
  • नावाचा अर्थ
    • “Tamal” = गडद निळसर रंग (समुद्रसदृश)
  • प्रकार
    • Water Jet Fast Attack Craft (WJFAC)
    • जलद गतीने हालचाल करणारे लढाऊ जहाज
  • तैनाती
    • पूर्व नौदल कमांड
    • विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश
  • उद्दिष्टे
    • सीमारेषेवर गस्त
    • तस्करी/घुसखोरीविरोधी कारवाई
    • गुप्त टेहळणी
    • लहान समुद्री लढाया
  • वैशिष्ट्ये
    • 3 जल-जेट इंजिन्स
    • उच्च वेग व चपळता
    • लघुशस्त्रांनी सज्ज
    • जलद प्रतिसाद क्षमता
  • महत्त्व
    • किनारपट्टी सुरक्षा
    • नौदलाची तात्काळ कारवाई क्षमता वाढवते
    • भारताची समुद्री ताकद दर्शवते

4) महाराष्ट्रात तीन राष्ट्रीय विधी विद्यापीठे!

  • मुंबईनंतर आता छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथेही महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन होणार – शासनाचा ऐतिहासिक निर्णय!
  • महाराष्ट्र देशातील तीन विधी विद्यापीठे असणारे एकमेव राज्य ठरले आहे.
  • यामध्ये
    • आधुनिक पायाभूत सुविधा
    • गुणवत्तापूर्ण शिक्षण
    • निसर्गरम्य परिसर
  • या तिन्ही विद्यापीठांची लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यवाही सुरू होणार!

5) दुबईत यशस्वी हवाई टॅक्सी चाचणी!

  • फ्लाइंग टॅक्सी सेवा २०२६ पासून सुरू!
  • दुबईमध्ये ‘जॉबी एरियल टॅक्सी’ची पहिली यशस्वी चाचणी पूर्ण
  • जॉबी एव्हिएशन आणि दुबईच्या वाहतूक प्राधिकरणाचा संयुक्त उपक्रम
  • ही पूर्णपणे इलेक्ट्रिक हवाई टॅक्सी चार प्रमुख ठिकाणांमधील प्रवासाची वेळ लक्षणीय कमी करणार
  • दुबई होणार जगातील पहिले शहर जे व्यावसायिक इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सेवा सुरू करणार!
  • सेवा सुरू: २०२६ पासून पूर्ण वेळ
  • क्षेत्र: वाहतूक | पायाभूत सुविधा | आर्थ‍िक विकास

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment