Current Affairs | चालू घडामोडी | 03 APR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 03 APR 2024

1) 3 एप्रिल

1.1) छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी = 3 एप्रिल 1680

1.2) राकेश शर्मा अंतराळात प्रवेश = 3 एप्रिल 1984

  • अंतराळात जाणारे पहिले भारतीय
  • मिशन सोयुज टी 11 (USSR)
  • अंतराळातील एकूण वेळ सात दिवस 21 तास 40 मिनिट

2) ‘जूडीथ सुमिनवा तुलूका’ यांची काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक या आफ्रिकन देशाची पहिली महिला पंतप्रधान म्हणून नियुक्ती

3) ‘व्हीव्हीपॅट’चा मुद्दा ऐरणीवर

  • सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. मतदान यंत्रांना जोडलेल्या सर्व ‘व्हीव्हीपॅट’मधील मतदानाच्या कागदी पावत्यांची पडताळणी करता येऊ शकेल का, अशी विचारणा न्यायालयाने आयोगाकडे केली आहे.
  • निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ने (एडीआर) मतमोजणीसोबत मतदानाच्या सर्व पावत्यांच्या मोजणीच्या मागणीसाठी नवी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
  • सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील यादृच्छिकपणे (रॅण्डम) पाच ‘व्हीव्हीपॅट’ची पडताळणी केली जाते. एकावेळी फक्त एका ‘व्हीव्हीपॅट’ची पडताळणी होते.
  • VVPAT = Voter Verifiable Paper Audit Trail
  • VVPAT चा 2013 पासून अवलंब सुरू
  • सात सेकंद पावती आपल्याला दिसते
  • 2013 च्या नागालँड मधील ‘नोकसेन’ विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा याचा वापर करण्यात आला
  • 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील आठ निवडक संसदीय मतदार संघात वापर

4) जीएसटी संकलनात 2023 – 24 मध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी कायम

  • जीएसटी लागू झाल्यापासून प्रथम स्थान कायम

5) निवडणुकीचा इतिहास 15

  • भाजपने आजवरचा सर्वात मोठा विजय 2019 ला प्राप्त केला
  • 2019 ची लोकसभा निवडणुकीत भाजपने 303 तर त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ने 353 जागा मिळवल्या
  • काँग्रेसला 2019 साली 52 जागा मिळाल्या तर यूपीए ला केवळ 91 जागा मिळाली
  • या निवडणुकीत भाजप व नरेंद्र मोदी यांनी “मै भी चौकीदार हू” अशी घोषणा दिली होती

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment