Current Affairs | चालू घडामोडी | 03 MAY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 03 MAY 2024

1) 3 मे

1.1) इंटक स्थापना = 3 मे 1947

  • संस्थापक = वल्लभभाई पटेल
  • काँगेस ची कामगार विंग

1.2) जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन = 3 मे

  • 2024 ची थीम = “A Press for the Planet: Journalism in the Face of the Environmental Crisis.”

2) उत्तराखंडने भारतातील पहिली खगोल पर्यटन मोहीम ‘नक्षत्र सभा’ सुरू केली.

3) जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन = 3 मे

  • 2024 ची थीम = “A Press for the Planet: Journalism in the Face of the Environmental Crisis.”
  • 1993 मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने दरवर्षी 3 मे रोजी प्रेस स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची स्थापना केली.
  • 1994 मध्ये पहिला प्रेस स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
  • जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2024
  • 3 मे 2024 या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स’तर्फे (RSF) जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2024 (World Press Freedom Index 2023) प्रकाशित करण्यात आला.
  • भारत 180 देशांमध्ये 159 व्या क्रमांकावर
    • 2023 = 161
    • 2022 = 150
  • पहिले 3 क्रमांक
  1. नॉर्वे
  2. डेन्मार्क
  3. स्वीडन
  • पाकिस्तान यादीत भारताच्या पुढे (152)
  • 2024 मध्ये वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्सची 22 वी आवृत्ती
    • 1st = 2002 मध्ये

4) मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्स 2024

  • 60 वर्षीय अलेजांड्रा मारिसा रॉड्रिग्जने मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्स 2024 चा किताब जिंकून इतिहास रचला आहे.
  • अलेजांड्रा रॉड्रिग्ज या व्यवसायाने वकील आणि पत्रकार आहेत.
  • हा प्रतिष्ठेचा मुकुट मिळवणारी अलेजांड्रा रॉड्रिग्ज ही तिच्या वयोगटातील पहिली स्पर्धक ठरली आहे.

5) युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली AI प्रवक्ता सादर केली आहे

  • AI प्रवक्त्याचे नाव – व्हिक्टोरिया शी

6) आकाशवाणी न्यूजच्या महासंचालकपदी मौसमी चक्रवर्ती यांची नियुक्ती

  • 1991 च्या बॅचचे IIS अधिकारी
  • चक्रवर्ती यांना I&B मंत्रालयाच्या अनेक माध्यम संस्थांमध्ये काम करण्याचा मोठा अनुभव आहे

7) केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी 13 मार्च 2024 रोजी PB-SHABD प्रणालीचे केले अनावरण

  • PB-SHABD = Prasar Bharati – Shared Audio Visuals for Broadcast and Dissemination
  • PB-SHABD ची वैशिष्ट्ये :
  1. वृत्तसंस्थांना प्रदान केलेला दूरदर्शनचा लोगो नसलेला स्वच्छ फीड.
  2. विविध प्रदेश आणि भाषांमधून जमा केलेली सामग्री, विस्तृत सामग्री नेटवर्क नसलेल्या छोट्या बातम्या संस्थांना समर्थन देते.
  3. पन्नास श्रेणींमध्ये बातम्यांच्या सामग्रीचा एकल बिंदू स्रोत आणि बातम्यांच्या प्रसारामध्ये समावेशकता वाढवण्यासाठी काम करेल
  • पहिल्या वर्षासाठी मोफत सेवा.

8) भारताची NPCI नामिबियामध्ये UPI सारखी इन्स्टंट पेमेंट प्रणाली विकसित करणार आहे

  • बँक ऑफ नामिबियासोबत करारावर स्वाक्षरी
  • NPCI= National Payment Corporation of India
    • NPCI ची सुरुवात = 2008
  • UPI = Unified Payment Interface
    • UPI ची सुरुवात = 11 एप्रिल 2016

9) सियाचिनच्या शक्सगाम खोऱ्यात बांधकामावरून चीनला खडसावले, परराष्ट्र मंत्रालयाकडून निषेध

  • पाकव्याप्त काश्मीरमधील सियाचीन हिमखंडाचा भाग असलेल्या शक्सगाम खोऱ्यात चीनने मोठ्या रस्त्यांसह अनेक बांधकामे केल्याचे समोर आले आहे.
  • भारताचे स्वामित्व असूनही, १९६३च्या सीमा करारानुसार शक्सगाम खोरे पाकिस्तानने चीनला परस्पर देऊन टाकले. या ठिकाणी चीनकडून लष्करी वाहतुकीसाठी सोयीचे ठरतील असे रस्ते बांधले जात असल्याचे समोर आले आहे.
  • हा भारताचा भाग असून चीनच्या बांधकामांमुळे लडाखमधील सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचे मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जैस्वाल यांनी स्पष्ट केले.

10) सीबीआय केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली नाही : केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात दावा

  • राज्याने सीबीआयला दिलेली सर्वसाधारण संमती मागे घेतली असतानाही सीबीआय एफआयआर दाखल करत आहे आणि त्याचा तपास पुढे चालू ठेवत प्रादेशिक अधिकारक्षेत्रातील प्रकरणांची चौकशी करत असल्याचा आरोप करत पश्चिम बंगाल सरकारने राज्यघटनेच्या कलम 131 अन्वये केंद्र सरकारविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात मूळ दावा दाखल केला आहे
  • केंद्रातर्फे हजर असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायमूर्ती बीआर गवई आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सांगितले की, घटनेचे कलम 131 हे सर्वोच्च न्यायालयाला प्रदान करण्यात आलेले ‘सर्वात पवित्र’ अधिकारक्षेत्र आहे आणि या तरतुदीचा गैरवापर करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही.
    • ते म्हणाले की, राज्याने दाखल केलेला खटला आणि त्यात नमूद केलेले खटले केंद्र सरकारने नोंदवलेले नाहीत.
  • 16 नोव्हेंबर 2018 रोजी, पश्चिम बंगाल सरकारने सीबीआयला तपासाबाबत किंवा राज्यात छापे घालण्याबाबत दिलेली ‘संमती’ मागे घेतली होती

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment