Current Affairs | चालू घडामोडी | 04 JULY 2024
1) 4 जुलै दिनविशेष
1.1) 1963 = पिंगली वेंकय्या यांची पुण्यतिथी
- राष्ट्रध्वजाच्या रचनेचे निर्माते
1.2) 1902 – स्वामी विवेकानंदांनी बेलूर मठात अंतिम श्वास घेतला
1.3) 1776 – अमेरिका स्वतंत्र झाली. अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन (Independence Day) म्हणून 4 जुलै दरवर्षी साजरा होतो
1.4) 4 जुलै 2005 – राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता.
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्याच्या उद्देशाने ही योजना पुढे NHM (राष्ट्रीय आरोग्य अभियान) मध्ये विलीन झाली.
2) राज्यनिहाय जून 2025 चे GST संकलन
- सर्वाधिक GST संकलन करणारे राज्य महाराष्ट्र आहे.
- उत्तर प्रदेश
- महाराष्ट्र
- कर्नाटक
- गुजरात
- तमिळनाडू

३) स्मृती मानधना क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला
- एकूण = सहावी भारतीय खेळाडू
- जगातील पाचवी महिला खेळाडू

४) भारताचा जेंडर बजेटिंग उपक्रम 👩💼📊
- लक्ष्य: महिलांचे सक्षमीकरण आणि लिंग समानता
- जेंडर बजेटिंग म्हणजे काय?
- सरकारच्या अर्थसंकल्पाचे लिंगदृष्टीकोनातून विश्लेषण करून महिलांसाठी अनुकूल योजना व खर्च आखणे.
- तरतूदीतील भरीव वाढ:
- ₹0.98 लाख कोटी (2014-15) ➡️ ₹4.49 लाख कोटी (2025-26)
- बजेटमधील वाटा: 5.46% ➡️ 8.86%
- संस्थात्मक चौकट (2005-06 पासून):
- भाग अ: 100% महिलांसाठी योजना
- भाग ब: 30–99% महिलांसाठी
- भाग क (नवीन): 30% पेक्षा कमी महिलांसाठी
- जेंडर बजेटिंग नॉलेज हब पोर्टल
- सुरुवात: जून 2025 – महिला व बालकल्याण मंत्रालय
- विविध सरकारी यंत्रणांमधील समन्वयासाठी उपयुक्त
- जेंडर बजेटिंग = सशक्त महिला = मजबूत भारत 🇮🇳

5) आयुषने जिंकले पुरुष अमेरिकन जेतेपद
- भारताचा उद्द्योन्मुख बॅडमिंटनपटू आयुष शेट्टी याने शानदार कामगिरी करताना यूएस ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
- आयुषने पहिल्यांदाच बीडब्ल्यूएफ टूरमध्ये जेतेपद पटकावले, यासह यंदाच्या वर्ल्ड दूर सत्रातील भारताचेही पहिलेच जेतेपदही ठरले.
- त्याने अंतिम सामन्यात कॅनडाच्या ब्रायन यांगला पराभूत केले
- तन्वी शर्मा = महिला अमेरिकन upavijetepad

6) डिजिटल इंडिया अभियान – 10 वर्षांचा प्रवास
- शुभारंभ: 1 जुलै 2015
- 2025 मध्ये 10 वर्षे पूर्ण
- उद्दिष्ट:
- सर्व नागरिकांना डिजिटल सशक्तीकरण, पारदर्शक व जलद सेवा
- प्रमुख 3 स्तंभ:
- डिजिटल पायाभूत सुविधा निर्मिती
- सेवा आणि माहितीचे डिजिटल वितरण
- नागरिकांचे डिजिटल सशक्तीकरण
- 10 वर्षांतील महत्त्वाच्या घडामोडी –
- 1 जुलै 2015 = डिजिटल इंडिया अभियानाचा शुभारंभ
- – पंतप्रधान नरेंद्र मोदी
- डिसेंबर 2016 = BHIM UPI अपचे उद्घाटन
- – कॅशलेस व्यवहारासाठी
- 2017 = DigiLocker चा प्रसार – शाळा, कॉलेज, वाहन दस्तऐवज ऑनलाइन
- 2017 = GSTN सुरुवात
- नोव्हेंबर 2017 = UMANG अप लाँच – 100+ सरकारी सेवा एका अपमध्ये
- 24 एप्रिल 2018 = eNAM पोर्टल – शेतकऱ्यांना डिजिटल बाजारपेठ
- 2018 = PMGDISHA योजना प्रारंभ
- 2019 = National Policy on Electronics
- 2020 = आरोग्य सेतू ॲप
- जानेवारी 2021 = CoWIN पोर्टल सुरू – कोविड लसीकरणासाठी डिजिटल व्यवस्था
- 2022 = ONDC (Open Network for Digital Commerce) सुरू – ई-कॉमर्समधील क्रांती

7) केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२५’ला मंजुरी
- राष्ट्रीय क्रीडा धोरण २००१ ला मागे टाकत सरकारने हे नवे धोरण स्वीकारले आहे.
- भारताला जागतिक क्रीडा महासत्ता बनवणे आणि २०३६ च्याऑलिम्पिक खेळांसह आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी दूरदर्शी आणि धोरणात्मक रोडमॅप तयार करणे, हे धोरणाचे उद्दिष्ट असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
- ५ प्रमुख स्तंभांवर आधारित धोरण
- १. जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि सोयी-सुविधा
- २. आर्थिक विकासासाठी खेळ
- ३. सामाजिक विकासासाठी खेळ
- ४. खेळाला लोकांची चळवळ बनवणे
- ५. शिक्षणाशी एकात्मता (एनईपी २०२०)

8) रग्बी प्रीमियर लीग 2025
(Rugby Premier League – 2025)
- भारतामध्ये रग्बीसारख्या जलद व ताकदीच्या खेळासाठी एक ऐतिहासिक पर्व
- मुख्य वैशिष्ट्ये:
- संपूर्ण भारतातील पहिलंवहिलं रग्बी प्रीमियर लीग (RPL)
- आयोजन वर्ष – 2025
- आयोजक शहर – मुंबई, महाराष्ट्र
- विविध सामन्यांचे आयोजन मुंबईतील प्रमुख स्टेडियममध्ये पार पडले.
- विजेता संघ:
- चेन्नई बुल्स (Chennai Bulls)
- अंतिम फेरीत उत्कृष्ट खेळ दाखवत विजेतेपद पटकावले.
- संघाने दमदार आक्रमण आणि शिस्तबद्ध रक्षणामुळे सर्वांची मने जिंकली.
- उपविजेता संघ:
- दिल्ली रेडस् (Delhi Reds)
- अंतिम सामन्यात अत्यंत चुरशीचा खेळ केला, परंतु थोडक्यात विजेतेपद हुकले.
- टीप:
- भारतात रग्बीसारख्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरतात.
- भविष्यात यामुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळू शकते.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel