Current Affairs | चालू घडामोडी | 04 JUN 2024
1) विशेष शिक्षक, कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्त्यासाठी ३२ लाख रुपयांचा निधी
- अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत (प्राथमिक स्तर) करार पद्धतीने कार्यरत विशेष शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू केला आहे
- केंद्रीय समग्र शिक्षा योजना
- केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि शिक्षक शिक्षण या योजनांचे एकत्रिकरण करून २०१८-१९ पासून केंद्रीय समग्र शिक्षा योजना राबवण्यात येत आहे.
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील शिफारशींच्या अनुषंगाने समग्र शिक्षा योजनेची पुनर्रचना करण्यात आली आहे.
- या योजनेचे केंद्र आणि राज्य हिस्सा ६०:४० असा आहे.
2) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ६४.२ कोटी मतदारांनी मतदान केले. त्यात ३१.२ कोटी महिलांचा सहभाग होता.
- लोकसभा निवडणुकीत जम्मू-काश्मीरमध्ये ५८.५८ टक्के मतदान झाले, जे चार दशकांतील सर्वाधिक आहे
3) क्लॉडिया शेनबाम बनल्या मेक्सिकोच्या पहिल्या महिला अध्यक्ष
- त्या मेक्सिकोच्या २०० वर्षांच्या इतिहासात पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होणार आहेत.
4) केदार जाधवची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती
- चार वर्षांपूर्वी तो भारताकडून अखेरचा सामना खेळला होता
- पुण्यातूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलेल्या ३९ वर्षीय केदारने नोव्हेंबर २०१४ मध्ये भारताकडून पहिला एकदिवसीय सामना श्रीलंकेविरुद्ध खेळला. त्यानंतर केदारने ७३ एकदिवसीय आणि नऊ ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले.
- यामध्ये एकदिवसीय सामन्यात केदारने दोन शतके आणि सहा अर्धशतकांसह १,३८९ धावा केल्या. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १२२ धावा आहेत.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel