Current Affairs | चालू घडामोडी | 05 DEC 2023
1) 🌿जागतिक मृदा दिवस – 5 डिसेंबर
🌿Theme 2023 – Soil and water : a source of life
- 2002 मध्ये, इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉईल सायन्स (IUSS) ने 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस म्हणून साजरा (Celebrate) करण्याचा प्रस्ताव दिला. जेणेकरुन लोकांना मातीच्या बिघडलेल्या स्थितीबद्दल जागरूक केले जाईल. यानंतर, जून 2013 मध्ये, अन्न आणि कृषी संघटना (FAO) परिषदेने 68 व्या संयुक्त राष्ट्र महासभेत जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचा आग्रह केला. शेवटी असेंब्लीने 5 डिसेंबर 2014 हा पहिला अधिकृत जागतिक मृदा दिवस म्हणून घोषित केला. त्या दिवसापासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
2) ISRO ने चांद्रयान-3 चे प्रोपल्शन मॉड्यूल परत पृथ्वीच्या कक्षेत आणले.
- ही एक उपलब्धी आहे जी दर्शवते की ISRO चंद्रावर इंजिन रीस्टार्ट करू शकते आणि उपकरणे चालवू शकते, या दोन्ही गोष्टींचा या अगोदर इस्रो ने केलेल्या नव्हत्या.
3) नौदलातील हुद्यांचे भारतीयीकरण
- पंतप्रधान मोदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण-तारकर्ली किनाऱ्यावर आयोजित केलेल्या नौदल दिनाच्या सोहळ्यात सहभागी झाले होते.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
4) हुद्द्यांच्या नावात बदल केल्यास अडसर निर्माण होण्याची शक्यता.
- आंतरराष्ट्रीय पातळीवर नौदलातील ऍडमिरल, रिअर ऍडमिरल, कमांडोर अशा हुद्यांची (रँक) सध्या एक ओळख आहे.
- भारतीय नौदलातील मुद्द्यांची नावे ब्रिटिशांच्या शाही नौदलाकडून आलेली आहेत. तशीच नावे भारतीय लष्कर आणि हवाई दलात आहे.
- ऍडमिरल हा अरबी तर लेफ्टनंट हा फ्रेंच भाषेतील शब्द आहे.
5) मिझोराम विधानसभा निवडणुकांचा निकाल.
- मिझो नॅशनल फ्रंटचा (एमएनएफ) पराभव करून झोराम पीपल्स मुव्हमेंट (झेडपीएम) हा पक्ष सत्तेत आलेला आहे.
- सविस्तर निकाल
- एकूण जागा = 40
- झेड पी एम = 27
- एम एन एफ =10
- भाजपा = 2
- काँग्रेस = 1
6) श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापूर ऐवजी बारामती मध्ये होण्याची शक्यता.
- संयुक्त राष्ट्रांनी या वर्षाला (2023) ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोलापूर येथे ‘श्री अन्न उत्कृष्टता केंद्र’ सुरू करण्याची घोषणा केलेली होती.
7) राष्ट्रीय स्मारकासाठी भिडेवाडा पाडण्यात आला.
- महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी एक जानेवारी 1848 रोजी बुधवार पेठ परिसरातील भिडे वाड्यात मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली होती.
8) शंभरावे नाट्यसंमेलन राज्यभर होणार. परंतु महत्वाचे संमेलन पिंपरी चिंचवड येथे.
- सध्या प्रशांत दामले हे नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष आहेत.
- मुंबई बाहेरची पहिली शाखा म्हणून नाट्य परिषदेच्या पुणे शाखेला शंभराव्या नाट्य संमेलनाच्या आयोजनाची संधी देण्यात आलेली आहे.
9) राज्यातील नागरी सहकारी बँकांना येत असलेल्या अडचणींचा अभ्यास करून त्यांना सरकारकडून कोणती मदत करता येईल, याबाबत अहवाल देण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.
- राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
10) एनसीआरबी (NCRB) अहवाल.
- अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) देशात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
- अॅट्रोसिटीचे सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात दाखल झाले असून दुसऱ्या स्थानावर राजस्थान आहे. यामध्ये महाराष्ट्राचा सहावा क्रमांक लागतो.
- महिला अत्याचारातील गुन्ह्यांमध्ये देखील उत्तर प्रदेश पुढे . महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी.
- राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनआरसीबी) जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
- बलात्काराचे सर्वाधिक गुन्हे राजस्थानात
- देशातील महानगरांचा विचार केल्यास आर्थिक गुन्ह्यांबाबत मुंबई आघाडीवर आहे.
- आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये राज्यांत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel