Current Affairs | चालू घडामोडी | 06 DEC 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 06 DEC 2023

1) ‘रिज’ (RIZZ) हा शब्द ठरला ऑक्सफर्ड डिक्शनरीचा 2023 मधील ‘वर्ड ऑफ द इयर’

2) युनेस्कोच्या जागतिक अदृश्य वारसा यादीत (Intangible Heritage List) मध्ये गुजरातच्या ‘गरबा’ चा समावेश करण्यात आला आहे .

 • या यादीत समावेश होणारा गरबा हा भारताचा 15 वा सांस्कृतिक वारसा आहे.

3) 6 डिसेंबर = महापरिनिर्वाण दिन

 • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १२-१३ फेब्रुवारी १९३८ रोजी मनमाड येथे भाषण झाले होते. हे ऐतिहासिक भाषण कामगार चळवळीचा जाहीरनामा म्हणून प्रसिद्ध आहे.
 • ९ ऑक्टोबर १९३९ रोजी इंग्रज सरकारचे व्हाइसराय लॉर्ड लीनलिथगो यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी अस्पृश्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली होती. याच काळात बाबासाहेबांच्या शिफारशीवरून अस्पृश्य वर्गातील १५-१६ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठविण्यात आले होते. या विद्यार्थ्यांचा खर्च तत्कालीन सरकारने केला होता. १६ वे विद्यार्थी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे स्वत:च्या खर्चाने परदेशात उच्च शिक्षणासाठी गेले होते.
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर, ६ डिसेंबर १९५६ नंतर बाबासाहेबांच्या समाजाच्या रथाला बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांनी गती दिली. त्यांची चळवळ अखेरपर्यंत अविरत सुरू ठेवली. बाबासाहेबांच्या कार्याला, त्यांनी दिलेल्या धम्माला पुढे नेण्याचे काम बॅ. खोब्रागडे यांनी केले. बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालये काढली आणि या समाजाला शिक्षणाची दारे उघडी करून दिली.

4) हवामान बदलाचा फटका, जागतिक हवामान संघटनेचा अहवाल
‘भारतासाठी 2011-20 दशक अतिवृष्टीचे आणि उष्ण!’

 • भारतासाठी २०११ ते २०२० हे दशक हवामान बदलामुळे भारतासाठी अतिवृष्टीचे (पुरांचे) किंवा उष्णतेचे ठरले. या काळात हवामान बदलाचा वेग चिंताजनकरित्या वाढला. त्यामुळे भारतासाठी सर्वात उष्ण दशकाची नोंद झाली. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत (सीओपी-२८) मंगळवारी जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) सादर केलेल्या ‘२०११ ते २०२० च्या दशकातील पर्यावरणीय स्थिती’ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
 • 2023 ची सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंद

5) सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्रात सर्वाधिक भ्रष्टाचार.

 • देशात महाराष्ट्र नंतर दुसऱ्या स्थानावर राजस्थान तिसऱ्या स्थानावर कर्नाटक आहे.

6) पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना काय आहे?

 • केंद्र सरकारने १ जानेवारी २०२४ पासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय) जाहीर केली आहे.
 • पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना, ही जगातील सर्वांत मोठी समाज कल्याण योजना आहे.
 • या योजनेचे उद्दिष्ट सुमारे १४० कोटी लोकसंख्येपैकी जवळपास ६० टक्के म्हणजे ८१.३५ कोटी लोकांची अन्न आणि पोषण सुरक्षा पुढील पाच वर्षे सुनिश्चित करण्यासाठी अंदाजे ११.८० लाख कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे.
 • १ जानेवारीपासून पुढील पाच वर्षे मोफत तांदूळ, गहू आणि भरडधान्य, तृणधान्यांचे वाटप केले जाणार आहे.
 • ‘एक देश एक शिधापत्रिका’ (वन नेशन वन रेशन कार्ड) योजना राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाला डिजिटल इंडियाची जोड मिळणार आहे. त्यामुळे उपक्रमांतर्गत लाभार्थींना देशातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून मोफत अन्नधान्य घेण्याची परवानगी मिळणार आहे.
 • योजनेअंतर्गत अंत्योदय कुटुंबाला एक महिन्याला ३५ किलो तांदूळ मिळेल. गहू ३५ किलो मिळेल.अन्नधान्यांच्या वाहतुकीवरही अनुदान देणार आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment