Current Affairs | चालू घडामोडी | 05 OCT 2024
अनुक्रमणिका
1) 5 ऑक्टोबर दिनविशेष
1.1) 5 ऑक्टोबर 1948 = IUCN स्थापना
- आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना
- मुख्यालय = ग्लॅंड (स्वित्झर्लंड)
1.2) जागतिक शिक्षण दिन
- 1966 च्या ILO व युनेस्को च्या शिक्षकासंबंधी स्थितीच्या शिफारशीचा स्वीकार
2) NITI आयोगाचा पहिला ‘महिला उद्योजकता मंच’ (WEP) तेलंगणा राज्याने सुरू केला.
- हा उपक्रम महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी महत्त्वाची साधने, संसाधने आणि जोडण्या देऊन त्यांना मदत करण्यावर केंद्रित आहे
3) सर्जन व्हाइस ॲडमिरल आरती सरीन यांनी सशस्त्र दल वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला असून, त्या पहिल्या महिला महासंचालक बनल्या आहेत.
4) संभाजी राजेंच्या स्वराज्य संघटनेला निवडणूक आयोगाची ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून मान्यता
- निवडणूक चिन्ह = सप्तकिरणांसह पेनाची निब
5) ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्यांना ५ कोठी मिळणार.
- आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या पारितोषिकांच्या रक्कमेत भरघोस वाढ करण्याचा निर्णय शुक्रवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
- ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेत्यांना पाच कोटी रुपये, रौप्य पदकासाठी तीन कोटी, कांस्य पदकासाठी दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे पन्नास लाख, तीस लाख व वीस लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
- वरिष्ठ कॉमनवेल्थसाठी सुवर्ण पदक विजेत्यांना सत्तर लाख रुपये, रौप्य पदकासाठी पन्नास लाख, कांस्य पदकासाठी तीस लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे सात लाख, पाच लाख व तीन लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
6) अहमदनगर नव्हे अहिल्यानगर ! महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी
- केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार राज्याला त्यांच्या जिल्ह्याचं नाव बदलायचं असेल तर त्यांना विधानसभेत तसा निर्णय घ्यावा लागेल. त्यानंतर केंद्र सरकारच्या पाच विभागांकडून त्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र मिळवावं लागेल. यानंतर नामांतरावर अंतिम निर्णय केंद्र सरकार घेईल.
- गेल्या वर्षी चोंडी येथे झालेल्या अहिल्यादेवींच्या जयंती दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची घोषणा केली होती.
- अहमदनगर शहराचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने १३ मार्च २०२४ ला घेतला.
7) पाकिस्तानातील ‘शांघाय परिषद’ बैठकीला एस. जयशंकर राहणार उपस्थित
- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला भेट देणार आहेत.
- १९९६ मध्ये शांघाय इनिशिएटिव्हची सुरुवात झाली होती.
- भारत, इराण, कझाकिस्तान, चीन, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि मंगोलियानंतर आता बेलारूसचाही या संस्थेत समावेश करण्यात आला आहे.
- २०१७ मध्ये एससीओमध्ये भारत आणि पाकिस्तानचा समावेश चर्चेचा विषय राहिला.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel