Current Affairs | चालू घडामोडी | 06 AUG 2024
अनुक्रमणिका
1) 6 ऑगस्ट दिनविशेष
1.1) 6 ऑगस्ट 1945 = जपानवर अणुबॉम्ब हल्ला
- 6 ऑगस्ट= हिरोशिमा
- 9 ऑगस्ट= नागासाकी
1.2) 6 ऑगस्ट 1952 = राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना
- उद्देश = पंचवार्षिक योजनेच्या अंतिम आराखड्याचा आकार देण्यासाठी
2) अविनाश साबळेने इतिहास रचला, ऑलिम्पिकमध्ये 3,000 मीटर स्टीपलचेस अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला पुरुष भारतीय ठरला
- लांब पल्ल्याच्या धावपटू अविनाश साबळेने ऑलिम्पिकच्या इतिहासात 3,000 मीटर स्टीपलचेस अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला पुरुष भारतीय बनून इतिहास रचला आहे.
- पॅरिस ऑलिम्पिकमधील पुरुषांच्या 3,000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेच्या पात्रता फेरीत 29 वर्षीय खेळाडूने 8:15.43 अशी वेळ नोंदवली.
- 8 ऑगस्ट (IST) रोजी सकाळी 1.13 वाजता अंतिम सामना होईल. (7 ऑगस्ट च्या मध्यरात्री)
3) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू
- सुरुवात – 2024
- लाडक्या बहिणीच्या कुटुंबाला वर्षात तीन गॅस सिलेंडर दिले जाणार
- Note:- केंद्राची अन्नपूर्णा योजना ही वेगळी असून ती 2000-2001 ला सुरू झाली होती.
- त्या योजनेअंतर्गत 10 किलो धान्य दिले जाते.
- अशा वृद्धांना दिले जाते ज्यांचे वय 65 पेक्षा जास्त आहे व त्यांना कोणतेही पेन्शन मिळत नाही
4) श्रीलंकेच्या महिला ‘आशिया चॅम्पियन’
- महिला टी-२० क्रिकेट; भारतीयांचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले
- जेतेपद पटकावनारा श्रीलंका हा भारत आणि बांगलादेश यानंतर केवळ तिसरा देश आहे
- सामनावीर : हर्षिता समरविक्रमा
- मालिकावीर : चमारी अट्टापटू
- भारत कर्णधार : हरमनप्रीत कौर
- श्रीलंका कर्णधार : चमारी अट्टापटू
5) 98 वे मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली मध्ये पार पडणार
- मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राबाहेर आतापर्यंत 23 वेळा झालेले आहे
- सर्वाधिक 6 वेळा महाराष्ट्राबाहेरील संमेलने मध्य प्रदेश मध्ये झालेले आहेत
- नवी दिल्ली मध्ये संमेलन आयोजित करण्याची दुसरीच वेळ. या अगोदर 1954 मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन पार पडले होते
- 1878 साली पहिले मराठी साहित्य संमेलन पार पडले होते
6) ज्येष्ठ गांधीवादी समाजसेविका शोभना रानडे यांचे निधन
- जन्म २६ ऑक्टोबर १९२४ रोजी पुण्यात झाला होता.
- वयाच्या १८ व्या वर्षी त्यांची आगाखान पॅलेस येथे महात्मा गांधी यांच्याशी भेट झाली.
- आसाममधील उत्तर लखीमपूर येथे १९५५ मध्ये त्या विनोबा भावे यांच्यासमवेत पदयात्रेत सहभागी.
- पुण्यातील सासवड येथे स्थापन केलेला बालगृह आणि बालसदन हा आणखी एक बालकल्याण प्रकल्प सुरू
- गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीच्या माध्यमातून गंगा वाचवा चळवळ
- गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीच्या नेतृत्वाखाली रानडे यांनी १९९८ मध्ये कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालय ही निराधार महिलांसाठी एक संस्था सुरू केली.
- पुरस्कार आणि सन्मान :
- पद्मभूषण
- जमनालाल बजाज पुरस्कार
- रवींद्रनाथ टागोर पुरस्कार
- राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार
- प्राईड ऑफ पुणे पुरस्कार
- बाल कल्याण कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार महात्मा गांधी पुरस्कार
7) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित !
- फिजीचे अध्यक्ष रातू विलियम मैवाली काटोनिवेरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी प्रदान केले.
- हा फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
- फिजीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती मुर्मू यांनी या सन्मानाचे वर्णन भारत आणि फिजी यांच्यातील “मैत्रीच्या खोल बंधांचे प्रतिबिंब” म्हणून केले आहे.
- या द्वीपसमूह राष्ट्राला भारतीय राष्ट्रप्रमुखाची ही पहिलीच भेट आहे.
8) विनेश फोगट (50 किलो) ऑलिम्पिक फायनलमध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू.
- क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझचा 5-0 असा पराभव केला.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel