Current Affairs | चालू घडामोडी | 07 AUG 2024
1) 7 ऑगस्ट दिनविशेष
1.1) 7 ऑगस्ट 1905 = स्वदेशी चळवळीची सुरुवात
- कलकत्ता टाऊन हॉलमध्ये परकीय मालावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय
- बंगालच्या फाळणीची घोषणा = 7 जुलै 1905 (लॉर्ड कर्जन)
- फाळणी रद्द घोषणा = 1911 (लॉर्ड हार्डिंग)
2) बांगलादेशातील हंगामी सरकारचे नेतृत्व हे नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांनी करावे अशी मागणी विद्यार्थी संघटना करत आहेत.
- सध्या बांगलादेशात राजकीय अस्थिरता आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना आपला देश सोडून पलायन करावे लागले आहे. बांगलादेशमध्ये सध्या कुठलेच सरकार नाही.
- युनूस यांनी हंगामी पंतप्रधानपद स्वीकारावे किंवा त्यांनी प्रमुख सल्लागार व्हावे अशी मागणी विद्यार्थी संघटना करत आहेत.
- मोहम्मद युनूस यांना जगभरात ‘गरिबांचा बँकर’ या नावानं ओळखलं जातं. श्रीमंतांप्रमाणेच गरिबांनाही कर्ज दिलं जाणं फक्त गरजेचंच नव्हे तर आर्थिक शहाणपणाचं देखील आहे, हे त्यांनी आपल्या ग्रामीण बँक चळवळीतून दाखवून दिलं.
- 2006 साली त्यांना याच कारणासाठी शांततेचं नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं होतं.
3) BIMSTEC बिझनेस समिटचे आयोजन भारत करणार आहे
- भारतीय उद्योग महासंघ ( CII ) च्या सहकार्याने भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय 6 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्ली येथे 1ली BIMSTEC बिझनेस समिट आयोजित करेल.
- बिझनेस समिटच्या पहिल्या आवृत्तीचे उद्दिष्ट अधिकाधिक प्रादेशिक सहकार्याला चालना देण्याचे आहे.
- बहु-क्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी (BIMSTEC) बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्हच्या सदस्य देशांमधील मजबूत व्यापार आणि गुंतवणूक संबंध.
4) स्वप्नील कुसाळे : कांस्य पदक
- कोल्हापूर, महाराष्ट्र मधील
- 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स प्रकारात
- भारताला तिसरे कांस्य पदक मिळाले
- राज्यशासनाकडून 1 कोटीचे बक्षीस जाहीर
- यातील थ्री पोझिशन म्हणजे काय
- यामध्ये तीन प्रकारे नेमबाजी करावी लागते.
- पहिला : एक गुडघा टेकून नेमबाजी
- दुसरा: जमिनीवर झोपून नेमबाजी
- तिसरा :उभे राहून नेमबाजी
- ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा महाराष्ट्रातील दुसरा खेळाडू ठरला आहे
- खाशाबा जाधव : कांस्यपदक(कुस्ती 23 जुलै 1952)
- स्वप्निल कुसळे : कांस्यपदक (नेमबाजी 1 ऑगस्ट 2024)
- पाहिलं कांस्यपदक :
- मनू भाकर
- 10 मीटर एअर पिस्तूल
- दुसरं कांस्यपदक :
- मनू भाकर आणि सरबज्योत सिंग
- 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक
- तिसर कांस्यपदक
- स्वप्नील कुसाळे
- 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स प्रकारात
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel