Current Affairs | चालू घडामोडी | 13 MAR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 13 MAR 2024

1) क्षयरोग मुक्त भारत मोहीम

 • सुरुवात = 13 मार्च 2018
 • उद्देश = 2025 पर्यंत भारतातून क्षयरोगाचे निर्मूलन

2) पीएम-उषा (प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान) योजनेंतर्गत राज्याला ५४० कोटींचा निधी

 • पीएम उषा (पूर्वीची राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान = RUSA) ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची योजना आहे
 • देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, गुणवत्ता वाढविण्यासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) ही योजना २०१३ मध्ये सुरू केली होती. त्यानंतर २०१८ मध्ये या योजनेचा दुसरा टप्पा राबविण्यात आला.
 • आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या पार्श्वभूमीवर या योजनेचे नामकरण पीएम-उषा असे केले आहे.
 • या योजनेंतर्गत देशातील राज्यांना निधी दिला आहे. त्यात देशात उत्तर प्रदेशला सर्वाधिक ७६० कोटी, त्या खालोखाल महाराष्ट्राला ५४० कोटी, तर मध्य प्रदेशला ४०० कोटी, गुजरातला २८० कोटींचा निधी मंजूर केला आहे.

3) हरियाणात नेतृत्वबदल

 • हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी कुरुक्षेत्रचे खासदार नायबसिंह सैनी यांना मुख्यमंत्री करण्यात आले
 • हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी सैनी यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.
 • खट्टर सरकारमध्ये सहभागी झालेले दुष्यंत चौताला यांच्या ‘जननायक जनता पक्षा’शी (JJP) असलेली भाजपची युती तुटली असून आता अपक्षांच्या मदतीने भाजप सत्तेवर आहे.

4) पोखरण येथे ‘भारत शक्ती’ सराव

 • ‘पोखरण फील्ड फायरिंग रेंज’ येथे तिन्ही संरक्षण दलांचा ‘भारत शक्ती’ हा समन्वयित सराव सुमारे ५० मिनिटे चालला.

5) साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

 • प्रसिद्ध लेखक, कादंबरीकार कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ या कादंबरीसाठी मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • नवी दिल्लीत झालेल्या सोहळ्यात ओडिसातील प्रख्यात साहित्यिक प्रतिभा राय यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • कोंकणी भाषेसाठी प्रकाश पर्येंकर यांना पुरस्कार
  • प्रकाश एस पर्येंकर यांना ‘वर्सल’ या लघुकथा संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलं.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment