Current Affairs | चालू घडामोडी | 06 JULY 2024
1) 6 जुलै
1.1) भारत बर्ड फ्ल्यू मुक्त घोषित = 6 जुलै 2017
- घोषणा = कृषी मंत्रालय
- विषाणू = H5N1, (H1N1 = swine flue)
1.2) महाकवी कालिदास दिन
- साहित्य = कुमारसंभव, अभिज्ञान शाकुंतल, मेघदूत, रघुवंश, विक्रमोवर्षी
2) ब्रिटनमध्ये हुजूर पक्षाचा ऐतिहासिक पराभव : कीर स्टार्मर नवे पंतप्रधान
- ब्रिटनमधील मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांनी या निवडणुकीत झालेला पराभव स्वीकरला आहे.
- कन्झर्वेटीव्ह पक्षाची या निवडणुकीत मोठी घसरण झाली.
- लेबर पार्टीनं 1997 नंतर पुन्हा एकदा चारशे जागांचा टप्पा पार केला आहे. लेबर पार्टीला 1997 मध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी पक्षाचे नेते टोनी ब्लेअर होते.
- पक्षानं त्यावेळी 419 जागा मिळवल्या होत्या. तर हुजूर पक्षाला 165 जागा मिळाल्या होत्या.
3) हार्दिक पांड्या अव्वल अष्टपैलू
- आंतरराष्ट्रीय T-२० क्रिकेटमध्ये अव्वल अष्टपैलू ठरणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.
4) भारत प्रथमच युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे आयोजन करणार
- दिनांक : 21 जुलै ते 23 जुलै 2024
- UNESCO = United Nations Educational, Scientific and Cultural Organization.
- स्थापना : 4 November 1946
- सध्या महासंचालक : ऑड्रे अझौले
- UNESCO मध्ये समाविष्ट केलेले पहिले जागतिक वारसा स्थळ इक्वेडोरचे गॅलापागोस बेटे होते.
5) नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवास विकसित करण्याचा निर्णय
- प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
- कांदळवने ही फ्लेमिंगोंचे (रोहित पक्षी) अधिवास आहेत.
- मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील फ्लेमिंगोंचे हे अधिवास पार्क विकासित आणि संरक्षित करण्याकरिता आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी वन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल.
- कांदळवन हे फ्लेमिंगोंचे सुरक्षा कवच असल्याने ते जपले पाहिजे. त्यामुळे या क्षेत्राचे नुकसान करणाऱ्यांना आर्थिक दंडासोबतच आता शिक्षेची तरतूद करण्याबाबतचा विचार केला जात असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
6) शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी विशेष जनसुरक्षा कायदा
- राज्यातील शहरी भागात विशेषत: मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या महानगरांमध्ये पसरणारा शहरी नक्षलवाद मोडून काढण्यासाठी विशेष जनसुरक्षा कायदा आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
- काय आहे कायद्यात?
- नव्या कायद्यात नक्षलवादी चळवळीला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हातभार लावणाऱ्या आणि माओवादी प्रणीत संघटनांवर बंदी घालण्याची, त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार सरकारला मिळणार आहेत.
- विशेष म्हणजे अशा संघटनांवर कोणतेही कारण न देता बंदी घालण्याचे अधिकार सरकारला मिळणार असले तरी सरकारच्या या निर्णयाविरोधात सल्लागार मंडळाकडे दाद मागण्याची मुभा संघटनांना असेल. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक सल्लागार मंडळ असेल.
- बंदी घाललेल्या संघटनेचा सदस्य नक्षवादी कृत्यात सहभागी झाल्यास किंवा त्यांना मदत करीत असल्याचे सिद्ध झाल्यास त्याला तीन वर्षांची शिक्षा आणि तीन लाखाचा दंड, एखादी व्यक्ती संघटनेचा सदस्य नाही. मात्र त्या संघटनेची मदत घेत असल्यास त्याला दोन वर्षांची शिक्षा आणि दोन लाख रुपये दंड, तर नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी होणे किंवा शहरी भागात नक्षवादी चळवळीच्या प्रसारात सक्रीय असणाऱ्यास सात वर्षांचा कारावास आणि पाच लाखापर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.
- या कायद्यानुसार दाखल होणारे सर्व गुन्हे अजामीनपात्र असून याबाबतचे विधेयक लवकरच विधिमंडळात मांडण्यात येणार असल्याचे समजते
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel