Current Affairs | चालू घडामोडी | 07 APR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 07 APR 2024

1) 7 एप्रिल

1.1) जागतिक आरोग्य दिन

  • प्रारंभ = 1950
  • 2023 ची थीम = हेल्थ फॉर ऑल
  • 2024 ची थीम = MY HEALTH, MY RIGHT (माझं आरोग्य, माझा हक्क)

1.2) जागतिक आरोग्य संघटना स्थापन = 7 एप्रिल 1948

  • मुख्यालय जिनेव्हा

1.3) शंकर आबाजी भिसे निधन = 7 एप्रिल 1935

  • भारतीय शास्त्रज्ञ, भारताचे एडिसन
  • शोध = भिसोटाइप यंत्र, बेसलीन व ॲडोमेडिन औषधाचा शोध

2) माळढोक संवर्धन प्रजनन केंद्रात नवीन ‘पाहुणा’

  • राजस्थानमधील जैसलमेरच्या माळढोक संवर्धन प्रजनन केंद्रात एका पिल्लाचा जन्म झाला
  • माळढोक पक्ष्याचा नष्टप्राय (Extinct) वर्गवारीत समावेश झाल्यानंतर केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्था व राजस्थान वनविभागाने त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू केले.
  • या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून जैसलमेर जिल्ह्यातील सॅम व रामदेवरा येथे माळढोकचे संवर्धन प्रजनन केंद्र उभारले.
  • भारतात जवळपास १५० माळढोक शिल्लक असून निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशेन ऑफ नेचर’च्या (IUCN) लाल यादीत ‘नष्टप्राय’ या वर्गवारीत आहेत.

3) शाळा पूर्वतयारीसाठी ‘पहिले पाऊल’ अभियान

  • महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) शाळा पूर्वतयारी अभियानांतर्गत विविध स्तरावरील प्रशिक्षणाचे वेळापत्रक जाहीर केले आहे
  • महाराष्ट्रात मागील वर्षी एप्रिल ते जून दरम्यान इयत्ता पहिली पात्र मुलांसाठी शाळा पूर्वतयारी अभियानांतर्गत ‘पहिले पाऊल’ कार्यक्रम राबविण्यात आला होता
  • त्यानुसार 2024-25 या शैक्षणिक सत्रातही पहिली मध्ये दाखल होणाऱ्या मुलांसाठी शाळापूर्व तयारी अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे

4) RBI ने पॉलिसी रेट मध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतला

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीने (MPC) बैठकीत हा निर्णय घेतला.
    • रेपो दर = 6.5 %
  • रिझर्व्ह बँकेने सलग सात वेळा व्याजदरात कोणताही बदल केला नाही.
  • रेपो दर म्हणजे काय?
    • RBI ही सर्व बँकांना कर्ज पुरवठा करते. त्याला रेपो दर म्हटले जाते.
    • रिझर्व्ह बँकेने या रेपो दरामध्ये वाढ केली तर बँकांनाही मिळणारे कर्ज महाग होते. त्यामुळे बँका याचा बोजा थेट ग्राहकांवर टाकतात.
    • त्यामुळे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा वाहन कर्जाच्या व्याजदरांमध्ये वाढ होते. याचा फटका ग्राहकांना बसत असतो
  • Monetary policy committe (MPC)
    • RBI Act, 1934 मध्ये वित्त कायदा, 2016 द्वारे सुधारणा
    • केंद्र सरकारला सहा सदस्यीय समिती स्थापन करण्याचा अधिकार आहे.
    • MPC चे सहा सदस्य
  1. RBI गव्हर्नर (अध्यक्ष),
  2. चलनविषयक धोरणाचे प्रभारी RBI डेप्युटी गव्हर्नर,
  3. RBI बोर्डाने नामनिर्देशित केलेला एक अधिकारी
    => उर्वरित तीन सदस्य भारत सरकारचे प्रतिनिधित्व करतील.
  • कार्यकाळ = 4 वर्ष
  • कोरम = 4 सदस्य (त्यापैकी किमान एक राज्यपाल)

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment