Current Affairs | चालू घडामोडी | 27 NOV 2023
1) नगर परिषदेच्या सभा फेसबुक लाईव्ह पद्धतीने घेणारे राज्यातील एकमेव शहर = बार्शी
2) ‘आयुष्यमान भारत’चे नाव आता ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’
3) कोल्हापूर जिल्ह्यात भुदरगड तालुक्यातील पाटगाव या गावात राज्यातील दुसरे मधाचे गाव होण्याचा मान मिळालेला आहे
- राज्यातील पहिले मधाचे गाव महाबळेश्वर तालुक्यातील मांघर
4) ‘गावाकडे चला’ या महात्मा गांधी यांच्या संकल्पनेवर आधारित ग्रामीण भागात कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारच्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडे मागील पाच वर्षात 2943 खादी संस्थांनी नोंदणी केली.
- सर्वाधिक नोंदणी उत्तर प्रदेश मध्ये त्यानंतर पश्चिम बंगाल व नंतर कर्नाटकचा क्रमांक लागतो.
- या यादीत महाराष्ट्र अकराव्या क्रमांकावर आहे
- केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या आखत्यारीत येत असलेल्या खादी ग्रामोद्योग आयोगाकडून ग्रामीण भागातील कुटीर उद्योगांना चालना देण्यासाठी आर्थिक मदत व कारागिरांना प्रशिक्षण तांत्रिक सहाय्य केले जाते.
- गावे रोजगाराच्या संदर्भात स्वयंभू व्हावीत आणि स्थानिक कारागिरांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्याचे रूपांतर रोजगार निर्मिती व्हावी ही खादी ग्राम उद्योगाची संकल्पना आहे.
5) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. मुंबई = पंचवीस वर्षे पूर्ण
- स्थापना 1998
6) जगातील 92 टक्के लोकसंख्या अतिसूक्ष्म धुलीकणांनी त्रस्त
- संयुक्त राष्ट्रांच्या वातावरणाविषयी अहवालातील नोंद.
- युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रॅम (यु एन इ पी) ने 2021 मध्ये ॲक्शन ऑन एअर क्वालिटी हा आपला 2016 चा अहवाल अद्ययावत केला आहे. त्यात विविध देश हवेची गुणवत्ता कशी सुधारू शकतात यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे.
- जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार सर्वाधिक प्रदूषण असलेले ठिकाणे दक्षिण आणि पूर्व आशिया पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका म्हणून ओळखली गेली आहेत.
- या भागात पीएम 2.5 चे प्रमाण उत्तर अमेरिकेच्या तुलनेत आठ ते नऊ पट अधिक असल्याचे आढळले आहे.
- शहरांमध्ये वाढत्या वायू प्रदूषणाच्या मुख्य कारणांमध्ये वाहने उद्योग ,वीजप्रकल्प आणि कचरा किंवा पिकांचे अवशेष जाळणे इत्यादींमधून निघणारा धूर यांचा समावेश आहे
- वाहतूक हे शहरांमध्ये वायु प्रदूषणाचे एक प्रमुख कारण आहे वाहनांतून होणाऱ्या वायू उत्सर्जनामुळे वातावरणात नायट्रोजन ऑक्साईड आणि अस्थिर सेंद्रिय संयुगे वाढतात.
- उद्योगामुळे सल्फर डाय ऑक्साईड आणि जड धातूचे कण हवेत सोडले जातात.
7) मणिपूर सरकारची बंडखोर गटाशी चर्चा
- मणिपूर राज्यात ३ मे 2023 रोजी वार्षिक हिंसाचार उफाळल्यानंतर सरकार अशा प्रकारची बोलणी प्रथमच करत आहे.
- युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (यु एन एल एफ) या प्रतिबंधित संघटनेच्या एका गटाशी सरकार बोलणे करत आहे.
- अनुसूचित जमातीचा दर्जा मिळण्याच्या मैतेई समुदायाच्या मागणीच्या निषेधार्थ राज्याच्या पर्वतीय जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मोर्चा’ काढण्यात आल्यानंतर मे महिन्यापासून उफाळलेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत 180 हून अधिक लोक ठार झालेले आहेत.
8) सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात संविधान दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यात आले.
- हा पुतळा सात फुटांपेक्षा अधिक उंचीचा आहे.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel