Current Affairs | चालू घडामोडी | 26 NOV 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 26 NOV 2023

1) 26 नोव्हेंबर = संविधान दिन

  • 9 डिसेंबर 1946 = घटना समितीची पहिली बैठक
  • 25 नोव्हेंबर 1949 = घटना समितीची शेवटची बैठक
  • 26 नोव्हेंबर 1949 = राज्यघटनेचा अधिकृतपणे स्वीकार केलेला दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

2) 2 ते 5 डिसेंबर 2023 दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती (आयसीएसी) चे अधिवेशन होणार आहे.

3) पंतप्रधान मोदींनी घेतली तेजस विमानातून भरारी.

  • भारतात निर्मित झालेल्या विमानातून भरारी घेणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरलेले आहेत.

4) भारतीय अंडर 19 क्रिकेट संघात एशिया कप साठी महाराष्ट्रातील तीन जणांची निवड.

  • बीडचा सचिन धस, सोलापूरचा हर्षल कुलकर्णी आणि ठाण्याच्या प्रेम देवकर ची निवड.

5) आगामी काळात साधारण पंधरा समूह विद्यापीठे स्थापन होणार.

  • नव्या शिक्षण धोरणात निश्चित केलेली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समूह विद्यापीठ ही संकल्पना मांडण्यात आली आहे
  • त्यामुळे 2035 पर्यंत विद्यापीठाशी संलग्न सर्व शिक्षण संस्था या स्वतः पदवी प्रदान करणाऱ्या संस्था म्हणजेच विद्यापीठे व्हावीत असे उद्दिष्ट आहे
  • राज्यात 2018 मध्येच समूह विद्यापीठांचे अंमलबजावणी सुरू झाली . सध्या राज्यात तीन समूह विद्यापीठे आहेत
  • एका जिल्ह्यातील किमान तीन महाविद्यालय एकत्र येऊन समूह विद्यापीठ स्थापन करू शकते. त्यातील एक महाविद्यालय हे अनुदानित असणे आवश्यक आहे.
  • या विद्यापीठांना प्रत्येक वर्षी एक कोटी रुपये याप्रमाणे पाच वर्षासाठी पाच कोटी रुपये शासन देणार आहे.

6) 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला पंधरा वर्षे पूर्ण.

  • 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानातील लष्करे तय्यबाच्या दहा दहशतवाद्यांनी सागरी मार्गाने मुंबईत घुसून हल्ला केला होता
  • 26 नोव्हेंबर 1949 मध्ये संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारल्याच्या स्मरणार्थ 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून 2015 पासून साजरा केला जातो.
  • 2015 च्या आधी हा दिवस कायदा दिवस म्हणून ओळखला जात असे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment