Current Affairs | चालू घडामोडी | 08 APR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 08 APR 2024

1) 8 एप्रिल

1.1) मंगल पांडे फाशी = 8 एप्रिल 1857

 • 34 नेटिव्ह इन्फंट्री मध्ये शिपाई
 • बराकपूर छावणी उठाव

1.2) बंकिमचंद्र चॅटर्जी पुण्यतिथी = 8 एप्रिल 1894

 • वंदे मातरम चे लेखक, आनंदमठ कादंबरी

2) स्वच्छ पर्यावरण जगण्याचा अधिकार!

 • नागरिकांचा स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार आणि हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामाविरोधात अधिकार यांचा अनुच्छेद १४ आणि २१मध्ये समावेश करून त्यांची व्याप्ती वाढवणारा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.

3) पंतप्रधान सूर्यघर योजनेला राज्यात प्रतिसाद कमी का?

 1. घरांचा/ छपरांचा आकार
 2. वीजवापर/ योजनेसाठीची गुंतवणूक
 3. छतावर सोलर पॅनल लावण्यासाठी सोसायटीची परवानगी मिळण्यास अडचण
 4. योजनेसाठी ग्राहकाला एकाच वेळी प्रतिकिलोवॅट ५५ हजार रुपये स्वत: गुंतवावे लागतात. त्यामुळे तीन किलोवॅटच्या प्रकल्पाची योजना घेतो म्हटल्यास त्याला प्रथम एकाच वेळी १ लाख ६५ हजार रुपये गुंतवावे लागतात. प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर सुमारे एक ते दीड महिन्यांनी केंद्र सरकारकडून ग्राहकाच्या खात्यात ७८ हजार रुपये ‘अनुदान’ म्हणून परत मिळतात.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी ही योजना सुरू करण्यापूर्वीही ‘ग्रिड कनेक्टेड रूफटॉप्स अॅण्ड स्मॉल सोलर पॉवर प्लान्ट्स प्रोग्राम’ या नावाने २०१२ पासून ही योजना होती, तिच्या अनुदानात २०१६ मध्ये वाढही झाली.
 • परंतु ‘सौरघर’ नावाने २०२४ पासून सुरू झालेल्या योजनेतून ‘देशातील एक कोटी कुटुंबांना महिन्याला तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज’ पुरवण्याचा सरकारचा उद्देश आहे.

4) शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) सदस्य देशांची सुरक्षा परिषद संपन्न

 • दिनांक : 2 ते 3 एप्रिल 2024
 • ठिकाण : अस्ताना, कझाकस्तान
 • भारताचे नेतृत्व : भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी केले.
 • 2024 ची 19 वी वार्षिक बैठक आहे
 • शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO)
  • ही एक कायमस्वरूपी आंतरशासकीय आंतरराष्ट्रीय संस्था आहे
  • स्थापना = 15 जून 2001 रोजी शांघाय (चीन) येथे
  • मुख्यालय = बीजिंग
 • संस्थापक सदस्य
 1. कझाकस्तान
 2. चीन
 3. किर्गिस्तान
 4. रशिया
 5. ताजिकिस्तान
 6. उझबेकिस्तान
 • भारत आणि पाकिस्तान 2017 मध्ये सदस्य झाले
 • सध्या SCO मध्ये 8 सदस्य आहेत
 • 17 सप्टेंबर 2021 रोजी, इराण हा SCO चा पूर्ण सदस्य होईल अशी घोषणा करण्यात आली

5) पॅरिस ऑलिम्पिक ज्युरीवरील पहिली भारतीय महिला : बिल्कीस मीर

 • पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य म्हणून त्यांच्या भूमिकेव्यतिरिक्त, बिल्कीस मीर यांनी महिला कॅनोइंग संघाचे प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment