Current Affairs | चालू घडामोडी | 07 JULY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 07 JULY 2024

1) 7 जुलै

1.1) बॉम्बे स्पिनिंग अँड वेव्हविंग मिल स्थापना = 7 जुलै 1854

  • संस्थापक = कावसजी नानाभाई दावर
  • भारतातील पहिली सूतगिरणी

1.2) दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन स्थापना = 7 जुलै 1948

  • स्वतंत्र भारतातील पहिला बहुउद्देशीय नदीखोरे प्रकल्प

2) देशातील सर्वोतकृष्ट कृषी राज्य म्हणून महाराष्ट्राची निवड.

  • १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे.
  • भारताचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने ही घोषणा केली आहे.
  • नवी दिल्ली येथे १० जुलै रोजी होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.
  • या पुरस्कारांसाठी समितीने राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेतली असल्याची माहिती राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे.

3) केंद्र सरकारचे मुख्य प्रवक्ते म्हणून धीरेंद्र ओझांची नियुक्ती

  • धीरेंद्र ओझा : प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे डीजी
  • वरिष्ठ भारतीय माहिती सेवा (IIS) अधिकारी धीरेंद्र ओझा यांची प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • श्री ओझा हे शेफली शरण यांची जागा घेतील, ज्यांची प्रकाशन विभागाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • PIB ही मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांना माहिती प्रसारित करण्यासाठी भारत सरकारची नोडल एजन्सी आहे.
  • मुख्यालय: दिल्ली.

4) इराणमध्ये सुधारणावादी अध्यक्ष

  • पेझेश्कियान यांचा जहालवादी जलिलींविरोधात विजय
  • पेझेश्कियान यांनी पाश्चात्त्य देशांशी संबंध सुधारण्याचे तसेच इराणमधील महिलांना केस झाकणे अनिवार्य करणाऱ्या हिजाबसंबंधी कायद्याच्या तरतुदी शिथील करण्याचे आश्वासन दिले आहे.
  • निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी इराणी जनतेला एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.

5) ब्रिटिशकालीन ‘ट्यूनिक गणवेश’ अखेर बंद !

  • IPS ते PSI समान गणवेश
  • गणवेशावर क्रॉस बेल्ट व तलवार लावण्याची सूचना.

6) वजनाने हलका असलेला स्वदेशी ‘जोरावर’ रणगाडा तयार

  • चीन सीमेवर होणार तैनात
  • निर्मिती = DRDO आणि ‘लार्सन अँड टुब्रो’ (L&T)

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment