Current Affairs | चालू घडामोडी | 08 FEB 2026

Current Affairs | चालू घडामोडी | 08 FEB 2026

1) ८ फेब्रुवारी दिनविशेष

१.१) निती आयोगाची पहिली बैठक = ८ फेब्रुवारी २०१५

  • स्थापना = १ जानेवारी २०१५

१.२) लॉर्ड मेयोची हत्या = ८ फेब्रुवारी १८७२

  • व्हाइसरॉय = १८६९ – १८७२
  • कार्य =
  • प्रथम जनगणना = १८७२
  • आर्थिक विकेंद्रीकरणाचे धोरण = १८७०

१.३) १८९९: रँडचा खून करण्यार्‍या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्‍या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला

१.४) १८९७: भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्‍न डॉ. झाकिर हुसेन यांचा जन्म.

2) आसाम – भारतातील पहिला राष्ट्रीय UAV चाचणी आणि इनोव्हेशन कॉरिडॉर उभारला जाणार

  • नाव – National UAV Test and Innovation Corridor.
  • ठिकाण: रंगे लुंडा विमानतळ  गंजाम जिल्हा आसाम
  • भारतातील पहिले व्यावसायिक विमानतळ जे लाइव्ह ड्रोन चाचणीसाठी वापरले जाईल
  • उद्देश –  1000 मी. उंचीपर्यंत गतिमान हवाई क्षेत्रात ड्रोन चाचण्या होणार
  • याची घोषणा –  Wings India 2026 (28-31 जानेवारी 2026), हैदराबाद येथे करण्यात आली
  • फायदा -स्वदेशी R&D, कौशल्य विकास, रोजगार, ड्रोन हब
  • करार – ओडिशा सरकार आणि  BonV Aero (बॉनव्ह एरो – भुवनेश्वर मधील टेक स्टार्टअप)

3) प्रो रेसलिंग लीग २०२६

  • स्पर्धा नाव -Pro Wrestling League (PWL) 2026.
  • विजेता – हरियाणा थंडर्स (5-4)
  • उपविजेता –  दिल्ली दंगल वॉरियर्सला
  • सहभागी संघ – 6 संघ
  • अंतिम सामना – नोएडा , उत्तर प्रदेश
  • प्लेयर ऑफ द मॅच – नेहा सांगवान
  • विजेत्या हरियाणा थंडर्सला ₹1.5 कोटी आणि ट्रॉफी
  • आयोजन संस्था – Wrestling Federation of India (WFI).
  • २०१५ – प्रो रेसलिंग लीगची सुरुवात. परंतु मध्यंतरी काही कारणाने बंद झाली होती (२०२६ मध्ये पुन्हा सुरू)

4) पिल्लू AI (Pilloo AI)

  • पिल्लू AI हे भारताचे पहिले व्हॉइस-बेस्ड (Voice-based) बिलिंग आणि अकाउंटिंग AI एजंट आहे
  • वापरकर्ते फक्त आवाजाच्या मदतीने बिल तयार करणे, खाती सांभाळणे यासारखी कामे करू शकतात
  • लहान व्यापारी, दुकानदार, MSME क्षेत्रासाठी अतिशय उपयुक्त तंत्रज्ञान
  • लॉन्च राज्य: आंध्र प्रदेश
    • देशातील प्रथम उपक्रम
  • महत्त्व:
    • डिजिटल व्यवहारांना चालना
    • अकाउंटिंग सुलभ व जलद
    • डिजिटल इंडिया उपक्रमाला बळ

5) कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ – हरित उपक्रम

  • कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट (CIAL) हे हायड्रोजन बस वापरणारे भारतातील पहिले विमानतळ ठरले आहे
  • हा उपक्रम पर्यावरणपूरक (Green Transport) आणि शून्य कार्बन उत्सर्जन दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे
  • ठिकाण: केरळ
    • First in India: हायड्रोजन बस वापरणारा पहिला विमानतळ
  • महत्त्व:
    • प्रदूषणात घट
    • हरित ऊर्जा वापराला प्रोत्साहन
    • Sustainable Aviation चे उदाहरण

6) रुसोमा संत्री महोत्सव

  • रुसोमा संत्री महोत्सव हा नागालँड राज्यात साजरा केला जाणारा स्थानिक व कृषी-आधारित महोत्सव आहे
  • या महोत्सवाचा मुख्य उद्देश संत्री उत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि स्थानिक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा आहे
  • राज्य: नागालँड
  • वैशिष्ट्ये:
    • संत्री उत्पादनाचे प्रदर्शन
    • स्थानिक संस्कृती व परंपरांचे दर्शन
    • कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment