Current Affairs | चालू घडामोडी | 08 MAY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 08 MAY 2024

1) 8 मे

1.1) क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी = 8 मे 1899

2) रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुतीन पाचव्यांदा विराजमान. 2030 पर्यंत भुषवणार पद

 • डिसेंबर 1999 मध्ये ते कार्यवाहक राष्ट्रपती झाले.
 • पुतिन यांनी 2000 मध्ये पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. त्यानंतर ते 2004, 2012 आणि 2018 मध्येही राष्ट्राध्यक्ष झाले.
 • आता पाचव्यांदा त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्षपद भूषवले आहे.
 • पुतिन यांनी 1991 मध्ये सेंट पीटर्सबर्गचे महापौर म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी गुप्तचर अधिकारी म्हणूनही काम केले आहे

3) सुनीता विल्यम्स यांची अंतराळ सफर रद्द.

4) UPI पेमेंट मध्ये सर्वात अग्रस्थानी फोन पे

 1. फोन पे
 2. गुगल पे
 3. पेटीएम

5) पारादीप बंदर हे वर्ष 2023-24 मध्ये कार्गो थ्रूपुटमधील सर्वात मोठे भारतीय बंदर म्हणून उदयास आले आहे

 • ओडिशातील सरकारी मालकीच्या पारादीप बंदरने गुजरातमधील दीनदयाल बंदर कांडला प्राधिकरणाला मागे टाकले
 • FY24 मध्ये 145.38 दशलक्ष टन मालवाहतूक

6) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने  डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सी (DIGITA) स्थापणा केली

 • उद्देश : सायबर फसवणूक आणि बेकायदेशीर कर्ज देणाऱ्या ॲप्सचा सामना करण्यासाठी
 • DIGITA चा “verified” टॅग नसणारे कोणतेही ॲप अनधिकृत मानले जाईल

7) इस्रो ने सेमी क्रायोजेनिक प्री-बर्नर इग्निशन टेस्ट आर्टिकल (PITA) वर यशस्वी प्रज्वलन चाचणी घेतली

 • यामुळे LVM – 3 रॉकेटची शक्ती आणखी वाढणार
 • लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटर (LPSC) हे सेमी-क्रायोजेनिक प्रोपल्शन सिस्टम्सच्या विकासासाठी प्रमुख केंद्र आहे.
 • सेमी क्रायोजेनिक इंजिन म्हणजे काय ?
  • ‘इस्रो’चे सेमी क्रायोजेनिक इंजिन द्रवरूप ऑक्सिजन आणि केरोसीनच्या मिश्रणावर चालते.
  • हे इंजिन २ हजार kN थ्रस्ट (शक्ती) निर्माण करते.
  • महेंद्रगिरी येथे झालेल्या या चाचणीअंती हे इंजिन ‘इस्रो’च्या LVM – 3 रॉकेटची पेलोड क्षमता वाढवण्यास मदत करेल, हे स्पष्ट झाले आहे.
 • LVM रॉकेटच्या माध्यमातूनच भारताने ‘चांद्रयान- ३’ मोहीम प्रक्षेपित केली होती.

8) अर्थव्यवस्थेची क्षेत्रे (व्यवसायानुसार)

 1. प्राथमिक क्षेत्र
 • नैसर्गिक साधनसामग्रीशी संबंधित कृषी व संलग्न व्यवसाय
 • शेती, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, रेशीम उत्पादन, जंगल संपत्ती, खाणी व खनिज उत्पादने (कोळसा, पेट्रोलियम, लोह खनिज इत्यादींचे उत्खनन)

2. द्वितीयक क्षेत्र / उद्योग क्षेत्र

 • प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त वस्तूंवर प्रक्रिया करून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात
 • कारखानदारी, बांधकाम, वीज निर्मिती, पाणीपुरवठा इ.

3. तृतीयक क्षेत्र / सेवा क्षेत्र

 • प्राथमिक व द्वितीयक क्षेत्रांना पूरक असणाऱ्या विविध सेवांचा समावेश
 • व्यापार, वाहतूक, दळणवळण, संरक्षण, प्रशासकीय, व्यावसायिक, सामाजिक इत्यादी सेवा

4. चतुर्थक क्षेत्र

 • उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर ज्या व्यवसायात होतो त्यांचा समावेश
 • उच्च ज्ञानाशी संबंधित. त्यांचा संबंध संकल्पनांची निर्मिती, संशोधन व विकास यांच्याशी असतो.
 • आयटी, R&D, सॉफ्टवेअर, कर प्रबंधक, म्युच्युअल फंड प्रबंधक, पोर्टफोलिओ प्रबंधक, संख्याशास्त्रज्ञ इत्यादी.

5. पंचक क्षेत्र

 • समाजातील व अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रियेचा समावेश
 • सरकार, विज्ञान, विद्यापीठे, गैर सरकारी संस्था (एनजीओ), आरोग्यसेवा, संस्कृती, प्रसार माध्यमे इत्यादी क्षेत्रातील उच्चस्तरीय कार्यकारी संचालक व अधिकाऱ्यांचा समावेश

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment