Current Affairs | चालू घडामोडी | 08 SEPT 2024
अनुक्रमणिका
1) 8 सप्टेंबर दिनविशेष
1.1) जागतिक साक्षरता दिवस
- शिक्षणाविषयी लोकांमध्ये जागरुकता वाढवण्यासाठी दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी साक्षरता दिवस साजरा केला जातो.
- युनेस्कोने 26 ऑक्टोबर 1966 रोजी दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.
1.2) 8 सप्टेंबर 2009 = साक्षर भारत योजनेचा प्रारंभ
2) बोईंगचे ‘स्टारलाइनर’ पृथ्वीवर
- बोईंगने पाठवलेले ‘स्टारलाइनर कॅप्सुल’ रिकामेच परत आले असून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावरच राहिले आहेत.
- त्यांचा परतीचा प्रवास धोकादायक असल्याचा नासाचा अंदाज असल्याने ते दोघेही पुढील वर्षापर्यंत तेथेच राहणार आहेत.
- आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक सोडल्यानंतर ‘स्टारलाइनर कॅप्सुल’ला घेऊन येणारे पॅराशूट सहा तासांनंतर न्यू मेक्सिकोच्या ‘व्हाइट सँड्स मिसाईल रेंज’ येथे उतरले.
- बोईंगचे ‘स्टारलाइनर’ जूनमध्ये सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन अवकाशात गेले.
- मात्र, थ्रस्टरमध्ये बिघाड आणि हेलियम गळती यामुळे ते परत येण्यात अडचण येत होती.
- बरेच दिवस बोईंगच्या अभियंत्यांना नेमकी समस्या लक्षात येत नव्हती.
- भरपूर चाचण्यांनंतर अंतराळवीरांना सुखरूप परत आणणे शक्य असल्याचे बोईंगकडून सांगण्यात आले.
3) नागालँडच्या होकाटोने भारतासाठी जिंकले कांस्यपदक
- शॉटपुट F57 मध्ये रचला इतिहास
- होकाटोने 14.65 मीटर फेक करून या स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले, जे त्याचे वैयक्तिक सर्वोत्तम देखील होते.
- होकाटो हा नागालँडचा एकमेव ॲथलीट आहे जो पॅरालिम्पिक खेळांमधील भारतीय दलाचा भाग आहे.
- होकाटो यांनी भारतीय सैन्यात अधिकारी पदावर काम केले आहे. 2002 मध्ये, जम्मू-काश्मीरमधील चौकीबाल येथे दहशतवादविरोधी कारवाईत भाग घेत असताना भूसुरुंगाच्या स्फोटात त्यांचा डावा पाय गमवावा लागला.
4) अग्नी- 4 क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण
- ठिकाण: ओडिशा मधील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी तळावरून
- दिनांक : 06 सप्टेंबर 2024
- अग्नी -4 या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
- या क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणानंतर सर्व कार्यान्वयन आणि तांत्रिक बाबींची यशस्वीपणे पडताळणीही करण्यात आली. ‘स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड’च्या नेतृत्वाखाली हे प्रक्षेपण करण्यात आले.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel