Current Affairs | चालू घडामोडी | 09 OCT 2024
अनुक्रमणिका
1) 9 ऑक्टोबर दिनविशेष
1.1) 9 ऑक्टोबर 1892 = गोपाळ हरी देशमुख पुण्यतिथी
- टोपण नाव = लोकहितवादी
- प्रभाकर मासिकात शतपत्रे लिखाण
- ग्रंथ = लक्ष्मीज्ञान, ग्रामरचना, लंका इतिहास, पानिपत, गुजरात देशाचा इतिहास
2) जगासमोर नव्या युद्धतंत्राचा धोका
- मोसाद या इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेने लेबनॉनमधील हिजबुल्लाहाच्या दहशतवाद्यांना टार्गेट करण्यासाठी नवीन युद्धतंत्राचा अवलंब केला आहे.
- पेजर आणि वॉकीटॉकीच्या साहाय्याने लेबनॉनमध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात ४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, ४०० जखमी झाले आहेत.
- मोसादने पेजर कंपन्यांवर नियंत्रण प्रस्थापित करून पेजरमधील बॅटरीद्वारे बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे बोलले जाते.
3) बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे बंजारा विरासत नंगारा म्युझियमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
4) अहमदनगर आता अहिल्यानगर
- अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर केले आहे
- जिल्हा आणि तालुका मात्र अहमदनगर नावानेच ओळखला जाईल
- केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार राज्याला त्यांच्या जिल्ह्याचं नाव बदलायचं असेल तर त्यांना विधानसभेत तसा निर्णय घ्यावा लागेल. त्यानंतर केंद्र सरकारच्या पाच विभागांकडून त्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र मिळवावं लागेल. यानंतर नामांतरावर अंतिम निर्णय केंद्र सरकार घेईल.
5) यंदाचा वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना संयुक्तरित्या जाहीर.
- मायक्रो आरएनएचा शोध आणि ट्रान्सक्रिप्शनल जीन रेग्युलेशनमधील त्यांची भूमिका यातील योगदानासाठी हे दोघे पुरस्काराचे मानकरी ठरले
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel