Current Affairs | चालू घडामोडी | 10 AUG 2024
1) 10 ऑगस्ट दिनविशेष
1.1) 10 ऑगस्ट 1894 = व्ही व्ही गिरी यांचा जन्म
- भारताचे चौथे राष्ट्रपती (1969 ते 1974)
- भारताचे तिसरे उपराष्ट्रपती (1967 ते 1969)
2) पैलवान अमन सेहरावतला कांस्य पदक, 16 वर्षांची परंपरा कायम
- जन्म : 16 जुलै 2003 बिरोहर, हरियाणा
- भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील एकूण सहावं तर कुस्तीतील पहिलं पदक मिळालं आहे.
- अमन 57 किलो वजनी गटात स्पर्धा करतो.
- 2022 U23 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले आणि 2023 आशियाई चॅम्पियन होता.
- अमन सेहरावतने पोर्तो रिकोच्या पैलवानावर एकतर्फी विजय मिळवला.
- अमन सेहरावत हा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताकडून सहभागी झालेला एकमेव पुरुष पैलवान होता.
- त्यामुळे एकट्या अमनवर भारताला कुस्तीत पदक मिळवून देण्याची जबाबदारी होती.
3) ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवणारे भारतीय कुस्तीपटू
- खाशाबा जाधव-कांस्य, 1952 हेल्सिकी
- सुशील कुमार-कांस्य, 2008 बीजिंग
- सुशील कुमार-रौप्य, 2012 लंडन
- योगेश्वर दत्त-कांस्य, 2012 लंडन
- साक्षी मलिक-कांस्य, 2016 रियो
- रवी दहिया-रौप्य, 2020 टोकियो
- बजरंग पूनिया-कांस्य, 2020 टोकियो
- अमन सेहरावत-कांस्य, 2024 पॅरिस
4) भारतीय स्क्वॉशपटूने रचला इतिहास
- ह्युस्टन येथे झालेल्या चॅम्पियनशिप 2024 मध्ये देशासाठी कांस्यपदक जिंकणारा शौर्य गेल्या 10 वर्षांतील पहिला भारतीय ठरला आहे.
- शौर्याने जागतिक ज्युनियर स्क्वॉड चॅम्पियनशिप 2024 मध्ये चमकदार कामगिरी करून भारताचा दुष्काळ संपवला आणि ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले.
- खुश कुमारनंतर वर्ल्ड ज्युनियर सेमीफायनलमध्ये पोहोचून कांस्यपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय पुरुष खेळाडू आहे. खुश कुमारने 2014 मध्ये कांस्यपदक जिंकले होते.
5) ओडिशा मध्ये देशातील पहिले धान्य एटीएम सुरू
- 5 मिनिटांत 50 किलो धान्य वितरित करू शकते
- यामध्ये प्रत्येक राज्याचे रेशन कार्ड काम करेल
- कोणताही शिधापत्रिकाधारक त्याचा/तिचा आधार किंवा शिधापत्रिका क्रमांक टाकून आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण नंतर धान्य गोळा करू शकतो.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel