Current Affairs | चालू घडामोडी | 10 DEC 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 10 DEC 2023

1) पुणे देशात सर्वाधिक धुके असलेले विमानतळ.

2) महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीच्या तज्ज्ञ संचालकपदी दत्तात्रय पडसलगीकर.

  • मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 2009 मध्ये महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली.

3) गरवारे बालभवनच्या संचालिका शोभा भागवत यांचे निधन.

  • शोभा भागवत यांची पुस्तके
    ● आपली मुलं (मार्गदर्शनपर)

● गंमतजत्रा (बालसाहित्य)

● गारांचा पाऊस (मार्गदर्शनपर)

● बहुरूप गांधी (अनुवादित बालसाहित्य, मूळ इंग्रजी लेखक – अनु बंदोपाध्याय). या पुस्तकाला जवाहरलाल नेहरूंची प्रस्तावना आहे.

● मूल नावाचं सुंदर कोडं (मुलांच्या बोलांचे संकलन)

● विश्व आपलं कुटुंब (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक – कृष्णकुमार). – मार्गदर्शनपर.

● सारं काही मुलांसाठी (मार्गदर्शनपर)

4) सलग पाचव्या द्विमासिक बैठकीत रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणताही बदल केला नाही.

  • देशातील व्यापारी बँकांना अल्पावधीसाठी आवश्यकता भासल्यास रिझर्व्ह बँकेकडून ज्या व्याजदराने कर्ज दिले जाते तो दर म्हणजे ‘रेपो दर’. त्याआधारे बँकांचे कर्ज सर्वसामान्य ग्राहक आणि उद्याोग-व्यावसायिकांसाठी महाग वा स्वस्त होत असल्याने रेपो दरालाच व्याजदरही म्हटले जाते. व्याजदर कमी असल्याने साठेबाज बँकांकडून कर्ज घेतात आणि साठेबाजीमुळे पुरवठा नियंत्रित करून वस्तू आणि अन्नधान्यांच्या किमती वाढवतात. अशा परिस्थितीत, पैशांचा पुरवठा कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक रेपो दर वाढवते. व्याजदर वाढतात तेव्हा कर्ज घेणे महाग होते आणि साठेबाजांचा नफा कमी होतो. त्यामुळे साठेबाजी कमी होऊन महागाई कमी होते.
  • ‘मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी’ हे रिझर्व्ह बँकेने बँकांसाठी मंजूर केलेली एक प्रकारची ओव्हरड्राफ्ट सुविधा आपत्कालीन पर्याय असून ती बँक इतर बँकांकडून कर्ज घेऊ शकत नाहीत तेव्हा बँकांना एका रात्रीसाठी (ओव्हर नाईट) पैसे मिळण्यास मदत होते. त्यामुळे, त्यांना एमएसएफद्वारे रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळू शकतात.

5) नवीन वर्षात दुय्यम बाजारासाठी ‘अस्बा’ प्रणाली – सेबी

  • अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट म्हणजेच ‘अस्बा’ (ASBA) प्रणाली सध्या प्राथमिक बाजारात प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) प्रसंगी वापरात येते.

6) परकीय चलन गंगाजळी 600 अब्ज डॉलरवर.

  • मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात परकीय गंगाजळीने ६४२ अब्ज डॉलरची ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली होती.

7) राष्ट्रीय बियाणे परिषद छत्रपती संभाजीनगर मध्ये.

8) जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार.

  • जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहचविण्यासाठी सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी पुरस्कार सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना जाहीर करण्यात आला आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment