1. G 20 परिषदेच्या पहिल्याच दिवशी भारताला राजनैतिक यश
- संघर्षाऐवजी सामायीकतेची भाषा वापरुन रशिया – युक्रेन संघर्षावर ‘G-7’ समूह आणि रशिया – चीन यांच्यात एकमत घडवून आणण्याचे राजनैतीकदृष्ट्या आव्हानात्मक कार्य तडीस नेण्यात भारताला यश आले. त्यामुळे ‘G-20’ देशांच्या दिल्ली जाहिरनाम्यावर शिक्कामोर्तब होऊन मतैक्य झाले.
- 2022 मध्ये बाली ( इंडोनेशिया ) येथे झालेल्या परिषदेमध्ये युक्रेन युद्धाच्या मुद्यामुळे सहमतीने घोषणापत्र जाहीर करण्यात अपयश आले होते. यावर्षी मात्र सहमतीने घोषणापत्र सर्व देशांनी मान्य केले.
- या शिक्कामोर्तबची माहिती पंतप्रधान मोदींनंतर G-20 चे शेर्पा ‘अमिताभ कांत’ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
- G 20 परिषदेवेळी सर्व राष्ट्र प्रमुखांचे स्वागत करतेवेळी मागील बाजूस ‘कोणार्क सूर्य मंदिर चक्र’ व संध्याकाळी स्नेहभोजनेला जाताना ‘नालंदा विद्यापीठाचे म्यूरल’ दर्शवण्यात आले.
- परिषदेदरम्यान ‘G-20 उपग्रह’ प्रक्षेपणाचा भारताचा प्रस्ताव.
- G-20 च्या पहिल्या दिवशी खालील महत्वाच्या घटना घडल्या.
1.1 आफ्रिकन महासंघ (African Union) बनला G 20 चा स्थायी सदस्य. आता ‘G-21’ म्हणून ओळख.
- G-20 चे आता 21 सदस्य असतील ( 19 देश, 2 संघटना )
- आफ्रिकन महासंघामध्ये 55 देशांचा समावेश आहे.
- भारताने ‘ग्लोबल साऊथ’ चा नारा दिला असल्याने आफ्रिकेतील देशांनाही G-20 मध्ये सामील करून घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
- आफ्रिकन महासंघ विषयी
- स्थापना = 1963 साली आफ्रिकन एकता संघ ( OAU ). 9 जुलै 2002 साली त्याचेच ‘आफ्रिकन महासंघ’ झाले.
- सदस्य = 55
- मुख्यालय = आदिस अबाबा ( इथिओपिया )
- सध्याचे अध्यक्ष= ‘अझील असॅोमनी’
1.2 भारत, पश्चिम आशिया आणि युरोप यांना जोडणारी दळणवळण मार्गिका (Economic Corridor)
- भारत, UAE सौदी अरेबिया, EU ( युरोपियन महासंघ ), फ्रांस, इटली, जर्मनी व अमेरिका यांच्यातील दळणवळण आणि पायाभूत सुविधांमधील सहकार्याच्या दृष्टीने हा पहिला ऐतिहासिक उपक्रम असेल.
- चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटीव्ह’ ( BRI ) या योजनेला आव्हान देणारी ही योजना मानली जात आहे.
1.3. जागतिक जैवइंधन आघाडी ( Global Biofuel Alliance )
- भारताने 9 सप्टेंबर रोजी G-20 परिषदेदरम्यान ‘जागतिक जैवइंधन आघाडी’ स्थापनेची घोषणा केली.
- आघाडीत भारत, अमेरिका, ब्राझील हे संस्थापक सदस्य.
1.4. दिल्ली जाहीरनामा स्वीकृत
1.5. युक्रेन युद्धावर एकमत
2. मोरोक्कोमध्ये भूकंप
- 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप
- 1000 पेक्षा अधिक जणांनी जीव गमावला.