Current Affairs | चालू घडामोडी | 11 JULY 2025
1) 11 जुलै दिनविशेष
1.1) जागतिक लोकसंख्या दिन
- आयोजक UNDP (१९८९ पासून)
- १९८७ साली जगाची लोकसंख्या ५०० कोटी झाली त्या निमित्ताने साजरा केला जातो
- 2025 Theme= Empowering young people to create the families they want in a fair and hopeful world
2) ‘राजभवन अन्नदान’ योजना – गोव्यातील अनोखी सामाजिक पुढाकार!
- गोव्यात नुकतीच ‘राजभवन अन्नदान’ ही योजना सुरू करण्यात आली आहे.
- राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांच्या पुढाकाराने ही योजना राबवली जात आहे.
- खास गोष्ट म्हणजे, राज्यपाल आपल्या २६० पुस्तकांच्या रॉयल्टीतून निधी देणार आहेत.
- त्यांच्या काही पुस्तकांचे भाषांतरही झाले असून, या उत्पन्नातून ते उपेक्षितांसाठी अन्नदान करणार आहेत.
- पुस्तक रॉयल्टीमधून सामाजिक योजना राबवणारे ते देशातील पहिले राज्यपाल ठरले आहेत!

3) एलोन मस्क यांचा राजकीय प्रवेश – ‘अमेरिकन पार्टी’ची घोषणा!
कोशाध्यक्ष पदी भारतीय
- एलोन मस्क यांनी अमेरिकेत एक नवीन राजकीय पक्ष स्थापन केला आहे –
- याचे नाव आहे “American Party” (अमेरिकन पार्टी)!
- या पक्षाचा उद्देश: अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि नागरिक स्वातंत्र्य यांचा सन्मान आणि प्रसार
- मस्क यांच्या मते, अमेरिकेच्या पारंपरिक राजकीय पक्षांना पर्याय देण्यासाठीच ही नवी चळवळ
- विशेष गोष्ट म्हणजे – या पक्षाचे कोषाध्यक्ष (Treasurer) म्हणून नियुक्ती झाली आहे वैभव तनेजा यांची!
- ते टेस्लाचे मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) देखील आहेत
- भारतीय वंशाचे वैभव तनेजा आता अमेरिकन राजकारणातही महत्वाची भूमिका बजावणार!

4) एलोन मस्क VS डोनाल्ड ट्रम्प – ‘बिल’पासून भांडणापर्यंत!
- कशामुळे झाले भांडण?
- कारण ठरले ‘One Big Beautiful Bill’ – अमेरिकेत नुकतेच मंजूर झालेले विधेयक
- या विधेयकात इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) मिळणाऱ्या सबसिडी रद्द करण्याचा निर्णय घेतला
- यामुळे टेस्ला प्रमुख एलोन मस्क नाराज, आणि ट्रम्प यांच्यावर त्यांनी टीका केली
- ट्रम्प यांनीही मस्कवर जोरदार पलटवार करत खळबळ उडवून दिली!
- “एलोन मस्क राष्ट्राध्यक्ष का नाही होऊ शकत?”
- कारण – ते अमेरिकेत जन्मलेले नाहीत, त्यांचा जन्म झाला आहे दक्षिण आफ्रिकेत
- अमेरिकन संविधानानुसार, राष्ट्राध्यक्ष किंवा उपराष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी फक्त अमेरिकन जन्मांनाच देता येते
- मात्र, मस्क सेनेटर, गव्हर्नर किंवा काँग्रेस सदस्य होऊ शकतात
- ट्रम्प यांना निवडून आणण्यात मस्क यांचा मोठा वाटा होता, तरीही आता दोघांत सुरू झाली आहे ‘सत्तेचे शीतयुद्ध’!

5) ब्रिटिश F‑35B लाइटनिंग फायटर जेट केरळमध्ये अडकले!
- स्थळ – त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ, केरळ
- तारीख – 14 जून 2025 पासून
- घडले काय?
- एक ब्रिटिश F‑35B Lightning फायटर जेट, जो जगातील सर्वात आधुनिक आणि महागड्या लढाऊ विमानांपैकी एक आहे, तो केरळमधील त्रिवेंद्रम विमानतळावर अडकून पडला आहे.
- हायड्रॉलिक सिस्टीममध्ये गंभीर बिघाड झाल्याने या विमानाचे टेक-ऑफ शक्य झाले नाही.
- तांत्रिक अडचण:
- F‑35B हे जेट शॉर्ट टेकऑफ आणि व्हर्टिकल लँडिंग (STOVL) तंत्रज्ञानासह सुसज्ज आहे, मात्र त्यासाठी हायड्रॉलिक प्रणालीची अचूक कार्यक्षमता अत्यावश्यक असते.
- ही प्रणाली बिघडल्यामुळे विमान सुरक्षितपणे उड्डाण करू शकत नाही, त्यामुळे ते 14 जूनपासून तेथेच पार्क करून ठेवण्यात आले आहे.
- आंतरराष्ट्रीय लक्ष:
- ही घटना भारत-UK संरक्षण सहकार्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
- F‑35B ची वैशिष्ट्ये:
- अदृश्यता (Stealth Technology)
- 1,200 किमी/ता वेग
- प्रगत सेंसर आणि रडार प्रणाली
- शॉर्ट टेकऑफ/व्हर्टिकल लँडिंग क्षमता (STOVL)

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel