Current Affairs | चालू घडामोडी | 12 JULY 2025

Current Affairs | चालू घडामोडी | 12 JULY 2025

1) 12 जुलै दिनविशेष

1.1) 1982 = नाबार्ड ची स्थापना

  • बी. शिवरामन समिती यांची शिफारस
  • नाबार्ड (NABARD) म्हणजेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (National Bank for Agriculture and Rural Development) याची स्थापना झाली.
  • नाबार्ड विषयी थोडक्यात
    • मुख्यालय – मुंबई
    • उद्देश – भारतातील ग्रामीण आणि कृषी विकासासाठी वित्तपुरवठा व योजना अंमलबजावणी
    • पूर्व संस्था – RBI व ARDC (Agricultural Refinance and Development Corporation) मधील ग्रामीण भागातील क्रियाकलाप नाबार्डकडे वर्ग करण्यात आले
    • अधिपत्य – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) व भारत सरकार यांच्या संयुक्त नियंत्रणाखाली
  • महत्त्वाच्या योजना –
    • ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी (RIDF)
    • स्वयं-सहायता गट (SHG-Bank Linkage)
    • कृषी व ग्रामीण स्टार्टअपसाठी निधी
    • विकासात्मक प्रकल्पांचे पुनर्वित्त पुरवठा

2) महाराष्ट्र जिंकला, गड जिंकले 🧡🚩

  • महाराष्ट्रतील ११ गड व जिंजी मिळून १२ गड जागतिक वारसा स्थळात नोंद झाले.
  • अभिनंदन भारत
  • जय शिवराय जय शंभूराजे 🚩
  • साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णगड, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला.
  • आपल्या राष्ट्रंची ही स्वातंत्र्य प्रतिके यांचे जागतिक वारसा (युनेस्को) मध्ये स्थान प्राप्त झाल्याबदल सर्वांचे अभिनंदन 🍂
  • जय शिवराय 🧡

3) 🛳️ प्रथम ASEAN-भारत क्रूझ संवाद – चेन्नईत ऐतिहासिक सुरुवात!

  • उद्घाटन:
  • 30 जून 2025 रोजी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते चेन्नईच्या MV Empress जहाजावर पहिल्या ASEAN
  • India Cruise Dialogue चे उद्घाटन झाले.
  • महत्वाचे मुद्दे:
    • ठिकाण: चेन्नई बंदर, MV Empress जहाज
    • कालावधी: 30 जून ते 1 जुलै 2025
    • सहभाग: ASEANचे सर्व 10 देश + तिमोर-लेस्तेचे 30+ प्रतिनिधी
    • विशेष भेट: मामल्लपुरम
    • उद्दिष्ट: किनारपट्टी पर्यटन आणि सांस्कृतिक वारशावरील चर्चा
  • ASEAN ची थोडक्यात माहिती:
    • पूर्ण नाव: Association of Southeast Asian Nations
    • स्थापना: 8 ऑगस्ट 1967, बँकॉक, थायलंड
    • मुख्यालय: जकार्ता, इंडोनेशिया
    • 2025 चे अध्यक्षपद: मलेशिया
    • ब्रीदवाक्य: One Vision, One Identity, One Community
    • संस्थापक देश: इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड
    • सदस्य देश: 10 (वरील + ब्रुनेई, कंबोडिया, लाओस, म्यानमार, व्हिएतनाम)
  • भारत आणि ASEAN संबंध:
    • भारत ASEAN सदस्य नाही, पण संवाद भागीदार आहे
    • भारताचे ASEAN देशांशी सामरिक, आर्थिक व सांस्कृतिक संबंध दृढ आहेत
    • क्रूझ संवादामुळे पर्यटन व व्यापारी संधी वाढणार

4) NASA ने TOI-4465 b या नवीन ग्रहाचा शोध लावला!

  • कोणता ग्रह?
    • TOI-4465 b – एक नवीन गॅस जायंट ग्रह, NASA च्या TESS उपग्रहाने (Transiting Exoplanet Survey Satellite) दिलेल्या डेटावरून नागरिक शास्त्रज्ञांच्या टीमने शोधला.
  • मूलभूत माहिती:
    • अंतर: पृथ्वीपासून 400 प्रकाशवर्ष दूर
    • वजन: गुरूपेक्षा 6 पट जड
    • कक्षा कालावधी: सुमारे 102 दिवस
    • कक्षा: अंडाकृती
    • ताऱ्यापासूनचे अंतर: पृथ्वी-सूर्य अंतराच्या 0.4 पट
  • ग्रहाची वैशिष्ट्ये:
    • व्यासाने गुरूपेक्षा 25% मोठा
    • अंदाजे तापमान: 93°C ते 204°C
    • प्रकार: मोठा, घन आणि तुलनात्मक थंड गॅसयुक्त ग्रह – असा संयोजन दुर्मिळ
  • प्रकाशवर्ष म्हणजे काय?
    • प्रकाशवर्ष = प्रकाश एका वर्षात जितके अंतर पार करतो
    • वेग: 3,00,000 km/sec
    • 1 प्रकाशवर्ष ≈ 9 ट्रिलियन किलोमीटर

उदा. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर यायला 8 मिनिटे लागतो – म्हणजे आपण सूर्याला 8 मिनिटांपूर्वीचा पाहतो!

  • स्पर्धा परीक्षांसाठी लक्षात ठेवा:
    TOI-4465 b = NASA + TESS + गॅस जायंट + 400 प्रकाशवर्ष दूर
  • दुर्मिळ प्रकारचा थंड व घन गॅस ग्रह
  • प्रकाशवर्ष = अंतर मोजण्याचे खगोलशास्त्रीय एकक

5) 1 जानेवारी 2026 पासून बुल्गेरिया युरो स्वीकारणारा 21 वा युरोझोन देश ठरणार

  • युरो (€) चलन स्वीकारण्यास अधिकृत मंजुरी मिळाली
  • EU अर्थमंत्र्यांनी 8 जुलै 2025 रोजी अंतिम मंजुरी दिली
  • 21 वा देशा – बुल्गारिया (2026)
  • 20 वा देश –  क्रोएशिया (2023)
  • बुल्गारियाचे आताचे चलन “लेव (lev)” आहे आता यापुढे याऐवजी युरो (€) स्वीकारले जाईल
  • निश्चित विनिमय दर असेल 1 युरो = 1.95583 बुल्गेरियन लेव
  • बुल्गारिया पंतप्रधान – रोसेन झेलिआझकोव्ह
  • युरोपियन युनियन प्रमुख – उर्सुला वॉन डेर लेयेन
  • युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुख – ख्रिस्तीन लागार्ड

6) मुख्यमंत्री “सेहत विमा योजना” पंजाब सरकारने सुरू केली

  • योजना नाव –  मुख्यमंत्री सेहत बीमा योजना
  • योजना सुरवात -2 ऑक्टोबर 2025 (गांधी जयंती)
  • उद्देश – दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला ₹10 लाखांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा.
  • यामध्ये सर्व प्रकारचे हॉस्पिटलायझेशन, सर्जरी, तपासणी यांचा समावेश.
  • पंजाबमधील सर्व कुटुंबाना (कोणत्याही उत्पन्नाची अट नाही)
  • यामध्ये प्रत्येक सेहत कार्ड दिले जाईल.
  • आयुष्मान भारत योजनांचे लाभार्थी ₹5 लाख अतिरिक्त लाभ
  • पंजाबचे मुख्यमंत्री: भगवंत मान (आम आदमी पार्टी)

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment