Current Affairs | चालू घडामोडी | 13 JULY 2025

Current Affairs | चालू घडामोडी | 13 JULY 2025

1) UPI (युपीआय) – Unified Payments Interface

  • भारतातील क्रांतिकारी डिजिटल पेमेंट प्रणाली!
  • सुरुवात –
    • भारतीय राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन (NPCI) ने 11 एप्रिल 2016 रोजी UPI ची सुरुवात केली.
  • उद्दिष्ट –
    • बँक खात्यामधून दुसऱ्या बँकेत रिअल टाइम मध्ये पैसे पाठवण्याची सोपी व जलद प्रणाली निर्माण करणे.
  • विशेषता –
    • २४x७ सेवा – सुट्टीच्या दिवशीसुद्धा व्यवहार शक्य
    • फक्त मोबाइल क्रमांक / UPI ID वापरून व्यवहार
    • QR कोड, मोबाईल अ‍पद्वारे सहज व्यवहार
    • इन्स्टंट पेमेंट – काही सेकंदात व्यवहार पूर्ण
    • अनेक बँक खाती एकाच अ‍पमध्ये लिंक करता येतात
  • UPI व्यवहारासाठी प्रसिद्ध अ‍प्स –
    • BHIM, Google Pay, PhonePe, Paytm, Amazon Pay इ.
  • 2024 मधील मोठा टप्पा –
    • UPI च्या माध्यमातून दरमहा १०० कोटीहून अधिक व्यवहार!
  • आंतरराष्ट्रीय वापर –
    • भारताने UPI सेवा सिंगापूर, भूतान, UAE, फ्रान्स, नेपाळ, श्रीलंका यांसारख्या देशांत सुरू केली आहे.
  • UPI = ‘भारताचा डिजिटल पेमेंटचा चेहरा!’

2) UPI चे जागतिकीकरण – आता कॅरिबियनमध्येही भारतीय डिजिटल पेमेंट!

  • त्रिनिदाद आणि टोबॅगो मध्ये UPI ची सुरुवात
  • आठव्या देशाची भर!
    • त्रिनिदाद आणि टोबॅगो BHIM व जागतिक UPI नेटवर्कमध्ये सहभागी झाला आहे आणि
    • UPI स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश ठरला आहे!
  • डिजिटल भागीदारीचा नवा अध्याय:
    • या भेटीत दोन्ही देशांमध्ये India Stack Solutions (जसे की 👉 डिजीलॉकर, ई-साइन, गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस – GeM) यांचा विस्तारित वापर व सहकार्य करण्यावर सहमती
  • आत्तापर्यंत UPI स्वीकारलेले देश –
    1. फ्रान्स
    2. युनायटेड अरब अमिरात (UAE)
    3. भूतान
    4. नेपाळ
    5. मॉरिशस
    6. श्रीलंका
    7. सिंगापूर
    8. त्रिनिदाद आणि टोबॅगो
  • महत्वाचे
    • UPI स्वीकारणारा पहिला देश – नेपाळ
    • UPI स्वीकारणारा पहिला युरोपियन देश – फ्रान्स
    • UPI स्वीकारणारा पहिला आफ्रिकी देश –  नामेबिया (2025) (प्रस्तावित)
    • UPI स्वीकारनारा पहिला कॅरेबियन देश – त्रिनिदाद आणि टोबॅगोन प्रजासत्ताक

3) NDB मध्ये नवीन देशांचा समावेश!

  • सारांश
  • १७व्या BRICS शिखर परिषदेपूर्वीच कोलंबिया व उझबेकिस्तान यांना NDB मध्ये सामील केले गेले.
  • यामुळे संस्था ११ सदस्यांची झाली, आणि BRICS+ मध्ये नव्या प्रदेशांचा समावेश दिसून येतो.
  • का महत्त्वाचं?
    • नवीन सदस्यांनी NDB च्या कार्यक्षेत्रात भर टाकली – इन्फ्रास्ट्रक्चर, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सतत विकासासाठी निधी वाढणार आहे .
    • ग्लोबल साउथसाठी मोठं पाऊल — NDB आता आणखी विस्तारित, विविध प्रदेशांना सेवा देणारी संस्था बनत आहे .
    • BRICS+ विस्ताराचा भाग — कोलंबिया (दक्षिण अमेरिका) आणि उझबेकिस्तान (प्रादेशिक मध्य आशिया) यांच्या सदस्यत्वामुळे BRICS चे भू-राजकीय स्पॅन मोठं झाले आहे .

4) आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी – हरियाणामध्ये लवकरच सुरू!

  • हरियाणा सरकारने 6 जुलै 2025 रोजी एक ऐतिहासिक घोषणा केली आहे – अरावली पर्वतरांगांमध्ये आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी विकसित केली जाणार आहे!
  • प्रमुख वैशिष्ट्ये:
    • स्थान – अरावली पर्वतरांगा
    • जिल्हा – गुरुग्राम आणि नूह
    • क्षेत्रफळ – तब्बल 10,000 एकर
    • घोषणा दिनांक – 6 जुलै 2025
    • घोषक – मुख्यमंत्री नायब सिंह सैनी
  • काय असेल खास?
    • चार बिग कॅट झोन्स – सिंह, वाघ, बिबटे आणि गाढवांसाठी
    • अंडरवॉटर वर्ल्ड – जलजीवांचे आकर्षण
    • बर्ड पार्क – देश-विदेशातील पक्ष्यांचे आवास
    • हर्बेटेरियम व बॉटॅनिकल गार्डन
    • नेचर ट्रेल्स आणि इको-बायोम्स
    • पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर
  • विकासासाठी प्रेरणा:
    • गुजरातमधील सुप्रसिद्ध “वंतारा प्रकल्प” याचा अभ्यास करून ही जंगल सफारी उभारली जाणार आहे.
  • महत्त्व:
    • पर्यावरणीय संवर्धनाला चालना
    • स्थानिकांना रोजगार संधी
    • इको-टुरिझमचा भक्कम विकास
    • भारताच्या जैवविविधतेला जागतिक स्तरावर स्थान

5) शिवरायांच्या स्वराज्यातील १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत

  • UNESCO ने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील १२ दुर्ग यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे.
  • या १२ किल्ल्यांची यादी:
  • महाराष्ट्रातील ११ किल्ले – रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खदिरी
  • तमिळनाडूतील १ किल्ला – जिंजी
  • महत्त्व:
    • हे किल्ले मराठा लष्करी स्थापत्यशैलीचे सर्वोत्तम उदाहरण.
    • शिवरायांच्या सांस्कृतिक व सामरिक दृष्टिकोनातून अत्यंत मोलाचे.
    • ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ या निकषावर आधारित नामांकन.
  • प्रक्रिया व पाठपुरावा:
  • राज्य पुरातत्त्व विभाग व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडून प्रस्ताव तयार.
  • केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे (ASI) सादर.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्रिय मार्गदर्शन.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशोदेशी राजदूतांशी संपर्क साधून पाठपुरावा केला.
  • उद्दिष्ट:
    • महाराष्ट्राच्या किल्ल्यांना जागतिक ओळख
    • सांस्कृतिक पर्यटनाला चालना
    • मराठा इतिहासाचे जागतिकीकरण

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment