Current Affairs | चालू घडामोडी | 12 JUN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 12 JUN 2024

1) ब्राह्मोस ची पहिली चाचणी = 12 जून 2001

 • ठिकाण = चंदिपुर
 • ब्राह्मोस = ब्रह्मपुत्रा नदी (भारत) + मॉस्को नदी (रशिया)
 • सुपरसॉनिक क्रुझ मिसाईल

2) शालेय पोषण आहारात यंदापासून १५ लज्जतदार पदार्थ

 • केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना राज्यात १९९५ पासून राबविण्यात येत आहे.
  • यापूर्वी या योजनेला शालेय पोषण आहार असे म्हटले जात होते.
  • पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ देण्यात येतो.
 • केवळ खिचडी, वरण-भात, उसळ भात अशा मर्यादित खाद्यपदार्थांऐवजी यंदापासून १५ लज्जतदार पदार्थांची चव ८६ हजार ५०० शाळांमधील १ कोटी ३ लाख विद्यार्थ्यांना चाखता येणार असल्याने त्यांची ज्ञानाच्या जोडीनेच अन्नाची गोडी वाढणार आहे
 • तज्ज्ञ व्यक्तींच्या समितीने सादर केलेल्या शिफारशीनुसार या वर्षीपासून विद्यार्थ्यांना तीनस्तरीय आहार (थ्री कोर्स मिल) दिला जाणार आहे. तो दिल्यास विद्यार्थी शालेय पोषण आहार अधिक आवडीने खातील अशी अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. त्यामध्ये तांदूळ, डाळी, कडधान्यापासून तयार केलेले आहार, मोड आलेले कडधान्य (स्प्राउट्स) आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर, नाचणी सत्त्व याचा समावेश केला आहे.

3) मोहन चरण माझी ओडिशाचे मुख्यमंत्री

 • कनक वर्धन सिंहदेव व प्रवती परिदा हे दोन उपमुख्यमंत्री असतील.
 • ओडिशात पहिल्यांदाच भाजपला बहुमत मिळाले आहे. राज्यातील १४७ पैकी ७८ जागा जिंकल्या.
 • आदिवासी समुदायातून आलेले माझी हे केओंझार मतदारसंघातून विजयी झाले आहेत. गेल्या वेळी विधानसभेत त्यांनी भाजपचे मुख्य प्रतोद म्हणून काम पाहिले आहे.

4) तेलुगु देसम पार्टीचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

 • जनसेना पार्टीचे पवन कल्याण = उपमुख्यमंत्री

5) मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू यांनी आपला पहिला अधिकृत भारत दौरा यशस्वी

 • नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी मुईझ्झू भारत दौऱ्यावर आले होते
 • मुईझ्झू हे चीनकडे झुकलेले असून भारताविषयी ताठर भूमिका घेण्यासाठी ओळखले जातात.
  • 2023 मधील नोव्हेंबरमध्ये अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्यांनी मालदीवमधून भारतीय सैन्याला माघारी जाण्यास सांगितले होते
 • भारत दौऱ्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचीही भेट घेतली. मालदीवला परत गेल्यानंतर त्यांनी भारताविषयी काहीशी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून आले.

6) भारताला परत मिळणार पुरातन मूर्ती

 • ब्रिटनमधील प्रतिष्ठित ऑक्सफर्ड विद्यापीठाने भारताला ५०० वर्षे जुनी कास्याची मूर्ती परत करण्याचे मान्य केले आहे.
 • ही मूर्ती एका साधूची असून ती तामिळनाडूच्या एका मंदिरातून चोरीला गेली होती असे मानले जाते.
 • विद्यापीठाच्या अश्मोलियन संग्रहालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ११ मार्च २०२४ रोजी विद्यापीठाच्या कौन्सिलने सोळाव्या शतकतील संत तिरुमंगाई अल्वर यांची मूर्ती परत मिळावी हा भारताच्या उच्चायुक्तालयाचा हा दावा मान्य केला.
 • ही मूप्ती ६० सेंमी उंचीची असून ती एका लिलावगृहातून १९६७ मध्ये विद्यापीठाच्या वस्तूसंग्रहालयाकडे आली होती.

7) ‘ब्रिक्स’ स्पर्धेसाठी प्रवीण ठिपसे भारतीय बुद्धिबळ संघाचे प्रशिक्षक

 • कझान, रशिया येथे ‘ब्रिक्स’ क्रीडा स्पर्धा होणार
 • ‘ब्रिक्स’ गटात सुरुवातीला ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांचा समावेश होता.
  • पुढे जाऊन ‘ब्रिक्स’चा विस्तार करण्यात आला आणि अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या सहा देशांनाही या गटात समाविष्ट करून घेण्यात आले.
 • या देशांमधील संबंध अधिक घट्ट व्हावेत या दृष्टीने ‘ब्रिक्स’ क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.
 • यंदा प्रथमच या स्पर्धांमध्ये बुद्धिबळ या खेळाचाही समावेश करण्यात आला आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment